OnePlus 9 Pro 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 18 Mar 2021 11:59:37 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 दमदार स्नॅपड्रॅगन 888 5G चिपसेटसह लॉन्च होतील OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro, 23 मार्चला येतील भारतात https://www.91mobiles.com/marathi/oneplus-9-series-will-support-qualcomm-snapdragon-888-soc-specs-leaked-23-march-launch/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-9-series-will-support-qualcomm-snapdragon-888-soc-specs-leaked-23-march-launch/#respond Thu, 18 Mar 2021 11:59:37 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10353 वनप्लसने स्पष्ट सांगितले आहे कि सीरीजमध्ये लॉन्च होणारे दोन्ही स्मार्टफोन OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro क्चॉलकॉमच्या पावरफुल आणि 5G नेटवर्क सपोर्ट असलेल्या स्नॅपड्रॅगन 888 चिपसेटला सपोर्ट करतील.

The post दमदार स्नॅपड्रॅगन 888 5G चिपसेटसह लॉन्च होतील OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro, 23 मार्चला येतील भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OnePlus ने सांगितले आहे की कंपनी येत्या 23 मार्चला आपली ‘वनप्लस 9’ सीरीज सादर करणार आहे. या सीरीजअंतर्गत OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro स्मार्टफोन लॉन्च केले जातील. फ्लॅगशिप कीलर म्हणून लोकप्रिय असलेल्या वनप्लसचे हे दोन्ही मोबाईल फोन हाईएंड सेग्मेंट मध्ये येतील जे पावरफुल स्पेसिफिकेशन्ससह आले आहेत. आज लॉन्चपुर्वी वनप्लसने स्वतःहून खुलासा केला आहे की OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro दोन्ही 5G फोन असतिल आणि क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 888 चिपसेटसह भारतात लॉन्च होतील.

लॉन्च डिटेल
लॉन्चबद्दल बोलायचे तर OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro स्मार्टफोन येत्या 23 मार्चला टेक मार्केट मध्ये येतील. हा एक ग्लोबल लॉन्च असेल ज्याच्या मंचावरून अनेक देशांमध्ये वनप्लस 9 सीरीज एंट्री करेल. भारतात हा लॉन्च ईवेंट 23 मार्च संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरू होईल ज्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. OnePlus च्या अधिकृत वेबसाइटसोबत कंपनीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा लॉन्च ईवेंट लाईव बघता येईल.

असे असतिल स्पेसिफिकेशन्स
वनप्लसने स्पष्ट सांगितले आहे कि सीरीजमध्ये लॉन्च होणारे दोन्ही स्मार्टफोन OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro क्चॉलकॉमच्या पावरफुल आणि 5G नेटवर्क सपोर्ट असलेल्या स्नॅपड्रॅगन 888 चिपसेटला सपोर्ट करतील. हा चिपसेट 5 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनला आहे जो 2.84गीगाहर्ट्ज पर्यंतचा क्लॉक स्पीड देऊ शकतात. हा चिपसेट तिसर्‍या जेनरेशनच्या स्नॅपड्रॅगन एक्स60 5जी मॉडमला सपोर्ट करतो तसेच यात क्वॉलकॉमचा स्प्रेक्ट्रा 580 आईएसपी कॅमेरा फीचर पण आहे.

OnePlus 9 Pro बद्दल सांगण्यात आले आहे की हा स्मार्टफोन 6.7 इंचाच्या क्वॉडएचडी+ एलटीपीओर डिस्प्लेवर लॉन्च केला जाईल जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करेल. त्याचबरोबर हा फोन एचडीआर10+ आणि 1300निट्स ब्राइटनेस सारखे फीचर्स पण असतिल. तसेच दुसरीकडे OnePlus 9 मध्ये 6.55 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले असल्याचे बोलले जात आहे जो 120हर्ट्ज रिफ्रेशसह येईल.

क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 888 चिपसेटसोबत वनप्लस 9 सीरीजमध्ये 12 जीबी पर्यंतचा रॅम आणि 256 जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज असल्याचे बोलेल जात आहे. OnePlus 9 सीरीजमध्ये 50 मेगापिक्सल प्राइमरी रियर कॅमेर्‍यासह 50 मेगापिक्सलची वाइड एंगल लेंस दिली जाईल. तसेच हा फोन 65वॉट फास्ट चार्जिंगसह 50वॉट वायरलेस चार्जिंगला पण सपोर्ट करतील. फोनच्या संपूर्ण स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीसाठी 23 मार्चची वाट बघावी लागेल.

The post दमदार स्नॅपड्रॅगन 888 5G चिपसेटसह लॉन्च होतील OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro, 23 मार्चला येतील भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-9-series-will-support-qualcomm-snapdragon-888-soc-specs-leaked-23-march-launch/feed/ 0