OnePlus Smart TV - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 06 Sep 2019 13:17:27 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 OnePlus चा यूनिक आणि स्टाईलिश Smart Remote आला समोर, येत आहे Smart TV https://www.91mobiles.com/marathi/oneplus-smart-tv-remote-official-unique-design-usb-type-c-port-google-assistant-button-ceo-pete-lau/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-smart-tv-remote-official-unique-design-usb-type-c-port-google-assistant-button-ceo-pete-lau/#respond Fri, 06 Sep 2019 13:17:27 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5248 भारतात OnePlus Smart TV अमेझॉन इंडिया वर सेल साठी उपलब्ध होईल.

The post OnePlus चा यूनिक आणि स्टाईलिश Smart Remote आला समोर, येत आहे Smart TV first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
फ्लॅगशिप कीलर नावाने ओळखली जाणारी टेक कंपनी OnePlus भारतातील हाईएंड स्मार्टफोन बाजारात खूप प्रसिद्ध आहे. आता फ्लॅगशिप सेग्मेंटच्या एंडरॉयड स्मार्टफोन घेण्याचा विचार येतो तेव्हा त्यात OnePlus च्या नावाचा उल्लेख असतो. स्मार्टफोन बाजारात नाव कमवल्यानंतर आता OnePlus स्मार्ट टेलीविजन क्षेत्रात पण हात अजमावणार आहे. कंपनीने अधिकृत घोषणा केली आहे कि OnePlus या महिन्यात भारतात आपला पहिला Smart TV लॉन्च करेल. आज स्मार्ट टीव्हीच्या आधी कंपनीने या टीव्हीच्या रिमोटचा फोटो शेयर केला आहे जो यूनिक आणि स्टाईलिश आहे.

OnePlus CEO Pete Lau ने ऑफिशियल ट्वीटर हँडेल वरून OnePlus TV च्या Remote चा फोटो शेयर केला आहे. हा टीव्ही रिमोट दिसायला इतर टीव्ही रिमोट पेक्षा वेगळा आणि स्टाईलिश दिसत आहे. OnePlus TV Remote चा फोटो समोर आल्यामुळे असे बोलले जात आहे कि जेव्हा टीव्हीचा रिमोट इतका एडवांस आणि स्टाईलिश आहे तर कंपनीचा आगामी Smart TV किती एडवांस आणि स्टाईलिश असेल.

यूनिक डिजाईन

OnePlus Smart TV चा Remote पाहता हा खूप स्लिक आहे. या रिमोटची रुंदी आणि जाडी खूप कमी आहे. OnePlus TV च्या या रिमोट मध्ये फक्त 5 बटण आणि एक नेविगेशन बार देण्यात आला आहे. रिमोटची सर्वात यूनिक बाब अशी कि यात एखाद्या स्मार्टफोन प्रमाणे साईड पॅनल वर वॉल्यूम बटण देण्यात आला आहे. दुसरी आश्चर्यकारक बाब अशी कि या रिमोट मध्ये यूएसबी टाईप-सी पोर्ट पण आहे.

OnePlus TV Remote मधील यूएसबी पोर्ट बघून बोलले जात आहे कि हा रिमोट इनबिल्ट बॅटरी सह येईल. म्हणजे या रिमोट मध्ये वारंवार ‘सेल’ बदलावे लागणार नाहीत तर स्मार्टफोन प्रमाणे हा चार्ज करता येईल. तसेच Smart TV सह येणारा हा रिमोट ब्लूटूथला सपोर्ट करेल. तसेच रिमोट मधील बटण्स प्लेसमेंट पाहता असे बोलले जात आहे कि कदाचित हा रिमोट टीव्ही मध्ये गेम खेळण्यासाठी एखाद्या जॉयस्टीक प्रमाणे वापरता येईल.

असे असतील बटण

OnePlus Smart TV च्या Remote वरील बटणांबद्दल बोलायचे झाले तर यात सर्वात वर नेविगेशन बार देण्यात आला आहे. यात चार ऍरो बटण आहेत आणि मधोमध ‘सलेक्ट/ओके’ बटण देण्यात आला आहे. या बार खाली उजवीकडे एक लांब बटण आहे ज्यावर वरचा भाग ‘बॅक’ की आहे आणि खालच्या भागावर ‘होम’ की आहे. या बटणाच्या डावीकडे ‘गूगल असिस्टेंट’ शार्टकट बटण देण्यात आला आहे. इथे अजून एक बटण पण आहे ज्यावर ‘OnePlus’ चा लोगो आहे.

काही दिवसांपूर्वी आम्ही OnePlus Smart TV संबंधित एक एक्सक्लूसिव रिपोट केला होता आणि त्यात सांगितले होते कि OnePlus TV को OnePlus स्मार्टफोनशी पण कनेक्ट करता येईल. त्यामुळे असा अंदाज लावला जात आहे कि हा OnePlus लोगो वाला बटण, टीव्हीला स्मार्टफोनशी कनेक्ट करण्याची शार्टकट की असेल. रिमोट मध्ये एक ऑप्शन बटण देण्यात आला आहे आणि त्यासोबत एक बटण पण आहे.

OnePlus Smart TV

OnePlus आपली पहिली स्मार्टटीव्ही भारतात येत्या 26 सप्टेंबरला लॉन्च करू शकते. OnePlus Smart TV बद्दल अधिकृत माहिती अजून समोर आली नाही पण लीक्स नुसार या टीव्ही मध्ये 3जीबी रॅम दिला जाईल त्याचबरोबर हा स्मार्टटीव्ही मीडियाटेकच्या एमटी5670 चिपसेट वर चालेल. OnePlus Smart TV मध्ये ओएलईडी डिस्प्ले मिळू शकतो. भारतात OnePlus Smart TV अमेझॉन इंडिया वर सेल साठी उपलब्ध होईल.

वनप्लस 7 प्रो वीडियो

The post OnePlus चा यूनिक आणि स्टाईलिश Smart Remote आला समोर, येत आहे Smart TV first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-smart-tv-remote-official-unique-design-usb-type-c-port-google-assistant-button-ceo-pete-lau/feed/ 0