Oppo A11 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 15 Oct 2019 12:42:01 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 5000एमएएच बॅटरी आणि 4 जीबी रॅम सह लॉन्च झाला 4 रियर कॅमेरा असलेला OPPO A11 https://www.91mobiles.com/marathi/oppo-a11-officially-launched-with-5000mah-battery-quad-rear-camera-4gb-ram-price/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a11-officially-launched-with-5000mah-battery-quad-rear-camera-4gb-ram-price/#respond Tue, 15 Oct 2019 12:42:01 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5527 OPPO A11 चे कॅमेरा सेंसर भारतात लॉन्च झालेल्या स्मार्टफोनपेक्षा वेगळे आहेत. OPPO A11 चीन मध्ये प्री-बुकिंग साठी उपलब्ध झाला आहे तसेच फोनचा सेल 17 ऑक्टोबर पासून होईल.

The post 5000एमएएच बॅटरी आणि 4 जीबी रॅम सह लॉन्च झाला 4 रियर कॅमेरा असलेला OPPO A11 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO ने आज अंर्तराष्ट्रीय बाजारात आपल्या ‘ए सीरीज’ अंतर्गत नवीन स्मार्टफोन आणला आहे. कंपनीने या फोनचे नाव OPPO A11 ठेवले आहे जो चीनी मार्केट मध्ये आला आहे. क्वॉड रियर कॅमेरा असलेला हा स्मार्टफोन गेल्या महिन्यात भारतात लॉन्च झाला OPPO A5 2020 चा रिब्रांडेड वर्जन आहे, पण OPPO A11 चे कॅमेरा सेंसर भारतात लॉन्च झालेल्या स्मार्टफोनपेक्षा वेगळे आहेत. OPPO A11 चीन मध्ये प्री-बुकिंग साठी उपलब्ध झाला आहे तसेच फोनचा सेल 17 ऑक्टोबर पासून होईल.

OPPO A11 चीन मध्ये एकाच वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे ज्यात 4 जीबी रॅम मेमरी सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. या फोनची किंमत 1499 युआन आहे जी भारतीय करंसीनुसार 15,000 रुपयांच्या आसपास आहे. OPPO A11 चीन मध्ये फ्लो क्लाउड वाईट आणि लेक लाइट ग्रीन कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार OPPO A11 च्या लॉन्च ऑफर अंतर्गत कंपनी या किंमतीत एन6 ब्लूटूथ स्पीकर पण सोबत देत आहे.

OPPO A11 लुक

OPPO A11 कंपनी द्वारा वॉटरड्रॉप नॉच डिजाईन सह लॉन्च केला गेला आहे. फोनचा डिस्प्ले तिन्ही बाजूंनी पूर्णपणे बेजल लेस आहे तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट आहे. हा फोन ‘वी’ शेप असलेल्या नॉचला सपोर्ट करतो. OPPO A11 चा बॅक पॅनल ग्रेडियंट फिनिश सह येतो तसेच यात रियर कॅमेरा सेटअप पॅनलच्या मध्ये वर्टिकल शेप मध्ये देण्यात आला आहे. कॅमेरा सेटअपच्या उजवीकडे फ्लॅश लाईट आणि चौथा सेंसर देण्यात आला आहे. तर सेटअपच्या खाली फिंगरप्रिंट सेंसर आहे. बॅक पॅनल वर OPPO ची ब्रॅण्डिंग देण्यात आली आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर पावर बटण आणि डाव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर देण्यात आला आहे.

OPPO A11 स्पेसिफिकेशन्स

फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता OPPO A11 6.5 इंचाच्या एचडी+ वॉटरड्रॉप नॉच वर लॉन्च केला गेला आहे. हा स्मार्टफोन एंडरॉयड 9 पाई आधारित कलरओएस 6 वर लॉन्च केला गेला आहे जो 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर चालतो. हा स्मार्टफोन 4 जीबी रॅम मेमरी सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता OPPO A11 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 12 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच ओपो ए11 मध्ये 8 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सलचे तीन सेंसर्स आहेत. हा फोन वाइड अँगल लेंस आणि डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी OPPO A11 मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

OPPO A11 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत फोनच्या बॅक पॅनल वर फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. OPPO A11 मध्ये पावर बॅकअप साठी 5000एमएएच ची ताकदवान बॅटरी देण्यात आली आहे. तसेच गेमिंगच्या चाहत्त्यांसाठी या फोन मध्ये गेम बूस्ट 4.0 टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.

The post 5000एमएएच बॅटरी आणि 4 जीबी रॅम सह लॉन्च झाला 4 रियर कॅमेरा असलेला OPPO A11 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a11-officially-launched-with-5000mah-battery-quad-rear-camera-4gb-ram-price/feed/ 0