OPPO A12e - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 03 Apr 2020 11:57:11 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 4,230mAh बॅटरी आणि डुअल कॅमेऱ्यासह लॉन्च झाला बजेट स्मार्टफोन Oppo A12e https://www.91mobiles.com/marathi/oppo-a12e-launch-with-snapdragon-450-3gb-ram-64gb-storage-know-full-specification-and-price/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a12e-launch-with-snapdragon-450-3gb-ram-64gb-storage-know-full-specification-and-price/#respond Fri, 03 Apr 2020 11:57:11 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6985 वेबसाइट लिस्टिंगनुसार OPPO A12e चे स्पेसिफिकेशन्स दोन वर्षांपूर्वी लॉन्च केल्या गेलेल्या Oppo A3s सारखेच आहेत.

The post 4,230mAh बॅटरी आणि डुअल कॅमेऱ्यासह लॉन्च झाला बजेट स्मार्टफोन Oppo A12e first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO A12e बाबत गेल्या महिन्यातच 91mobiles ने एक्सक्लूसिव माहिती दिली होती. आता हा फोन अधिकृतरित्या ओप्पो वियतनामच्या वेबसाइट वर स्पेसिफिकेशन्स सह लिस्ट केला गेला आहे. OPPO A12e एक बजेट स्मार्टफोन आहे जो एंट्री-लेवल स्पेसिफिकेशन्स सह सादर केला गेला आहे.

अजूनतरी OPPO A12e ची किंमत आणि उपलब्धतेबाबत कंपनीने कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. पण आशा आहे कि लवकरच हि माहिती पण समोर येईल. चला पुढे फोनचे स्पेसिफिकेशन्स बघूया.

स्पेसिफिकेशन्स

वेबसाइट लिस्टिंगनुसार OPPO A12e चे स्पेसिफिकेशन्स दोन वर्षांपूर्वी लॉन्च केल्या गेलेल्या Oppo A3s सारखेच आहेत. फोन मध्ये 6.2-इंच HD+ वाइड नॉच डिस्प्ले 19:9 आस्पेक्ट रेश्यो सह मिळतो. तसेच फोन मध्ये Snapdragon 450 SoC प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये 3GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

OPPO A12e कंपनीने कलरओएस 5.1 बेस्‍ड एंडरॉयड 8 Oreo वर सादर केला आहे. फोन मध्ये फोटोग्राफीसाठी फोनच्या मागे 13MP चा मेन सेंसर आणि 2MP डेप्थचा सेंसर देण्यात आला आहे. तसेच OPPO A12e मध्ये पावर बॅकअपसाठी 4,230mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

फोन मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस अनलॉक फीचर देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोन मध्ये म्यूजिक पार्टी फंक्शन आहे ज्याच्या मदतीने तुम्ही आणि तुमचे मित्र मिळून एकच गाणे आपापल्या फोन वर लावू शकता.

Oppo A12

समोर आलेल्या रिपोर्टनुसार OPPO A12 मध्ये 6.22-इंचाचा IPS LCD डिस्प्ले असेल जो HD+ रिजोल्यूशन सह येईल. फोन मध्ये हीलियो P35 चिपसेट आणि दोन रॅम व स्टोरेज वेरिएंट असतील. डिवाइस मध्ये 3 GB रॅम + 32 GB स्टोरेज आणि 4 GB रॅम + 64 GB स्टोरेजचा ऑप्शन असेल. फोन मध्ये डेडिटकेटिड माइक्रोएसडी कार्ड स्लॉट असेल कि हाइब्रिड सिम स्लॉट हे अजून समजले नाही.

त्याचबरोबर फोनच्या मागे डुअल कॅमेरा सेटअप असेल. यात एक f/2.2 अपर्चर सह 13-मेगापिक्सलची लेंस आणि f/2.4 अपर्चर सह 2-मेगापिक्सल सेकंडरी शूटर असेल. सेल्फीसाठी फोन मध्ये f/2.0 अपर्चर सह 5-मेगापिक्सलचा कॅमेरा असेल.

OPPO A12 मध्ये पावर बॅकअपसाठी 4,230mAh ची बॅटरी दिली जाईल. फोन ColorOS 6.1.2 बेस्ड एंडरॉयड OS वर चालेल. OPPO A12 च्या लॉन्च डेट बाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण आशा आहे कि लवकरच हा अधिकृतरित्या वर लॉन्च केला जाईल.

The post 4,230mAh बॅटरी आणि डुअल कॅमेऱ्यासह लॉन्च झाला बजेट स्मार्टफोन Oppo A12e first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a12e-launch-with-snapdragon-450-3gb-ram-64gb-storage-know-full-specification-and-price/feed/ 0
Exclusive: OPPO घेऊन येत आहे स्वस्त स्मार्टफोन OPPO A12e, फोन मध्ये असेल 4250एमएएच बॅटरी आणि डुअल रियर कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/exclusive-tech-news-oppo-a12e-with-4230mah-battery-13mp-dual-rear-camera-launching-soon-india-specs-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/exclusive-tech-news-oppo-a12e-with-4230mah-battery-13mp-dual-rear-camera-launching-soon-india-specs-price-sale/#respond Thu, 19 Mar 2020 13:22:51 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6839 आज 91मोबाईल्सने आपल्या सूत्रांकडून एका नवीन ओपो फोनची माहिती काढली आहे जो OPPO A12e नावाने लवकरच भारतात लॉन्च होईल.

The post Exclusive: OPPO घेऊन येत आहे स्वस्त स्मार्टफोन OPPO A12e, फोन मध्ये असेल 4250एमएएच बॅटरी आणि डुअल रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO बद्दल कालच एक बातमी समोर आली होती ज्यात ब्रँडच्या ‘ए सीरीज’ मधील दोन नवीन स्मार्टफोन्सची माहिती मिळाली होती. हे दोन्ही फोन आईएमडीए सर्टिफिकेशन साइट वर लिस्ट झाले होते आणि या फोन्सच्या नावाचा खुलासा OPPO A92 आणि OPPO A12 असा झाला होता. आईएमडीए वर कोणत्याही फोनचे स्पेसिफिकेशन्स तर समोर आले नव्हते पण स्पष्ट झाले होते कि OPPO लवकरच आपल्या ‘ए सीरीज’ मध्ये हे नवीन स्मार्टफोन्स लॉन्च करू शकते. आज 91मोबाईल्सने आपल्या सूत्रांकडून एका नवीन ओपो फोनची माहिती काढली आहे जो OPPO A12e नावाने लवकरच भारतात लॉन्च होईल.

OPPO A12e

91मोबाईल्सला ओपो ए12ई संबंधित एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे कि कंपनी लवकरच हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे. OPPO A12e एक लो बजेट डिवाईस असेल, या फोनची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते. हा फोन डुअल रियर कॅमेऱ्यासह मोठ्या बॅटरीने सुसज्ज असेल आणि वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल. OPPO ने हा फोन ऑनलाईन शॉपिंग साइट्स सोबत ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण विकला जाईल.

A11

OPPO A12e चे स्पेसिफिकेशन्स पाहता आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार हा स्मार्टफोन 6.2 इंचाच्या आईपीएस एचडी+ डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल. या फोनचे डायमेंशन 156.2×75.6×8.2एमएम असेल आणि वजन 170ग्राम असेल. ओपो हा फोन तीन कलर वेरिएंट्स मध्ये बाजारात आणेल ज्यात ब्लॅक, पर्पल आणि रेड कलरचा समावेश असेल. इतर स्पेक्स पाहता ओपो ए12ई एंडरॉयड ओएस वर लॉन्च होईल आणि कलरओएस वर चालेल.

प्राप्त माहितीनुसार प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये क्वॉलकॉमचा एंट्री लेवल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 450 दिला जाईल. ओपो OPPO A12e भारतात 3 जीबी रॅम वर लॉन्च करेल तसेच हा फोन 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल. तसेच फोटोग्राफी सेग्मेंट पाहता ओपो ए12ई मध्ये डुअल रियर कॅमेरा दिला जाईल ज्यात एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर असेल.

A11

त्याचप्रमाणे OPPO A12e मध्ये सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी एफ/2.2 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. तर पावर बॅकअपसाठी ओपो ए12ई 4,230एमएएच बॅटरी सह बाजारात येईल. OPPO ने अजूनही ओपो ए12ई च्या लॉन्च संबंधित माहिती दिली नाही पण कंपनी लवकरच या फोनच्या इंडिया लॉन्चची घोषणा करू शकते.

The post Exclusive: OPPO घेऊन येत आहे स्वस्त स्मार्टफोन OPPO A12e, फोन मध्ये असेल 4250एमएएच बॅटरी आणि डुअल रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/exclusive-tech-news-oppo-a12e-with-4230mah-battery-13mp-dual-rear-camera-launching-soon-india-specs-price-sale/feed/ 0