OPPO A31 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 25 Feb 2020 16:55:40 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 6 जीबी रॅम, 4230एमएएच बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह OPPO A31 भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/oppo-a31-officially-launched-in-india-triple-rear-camera-6gb-ram-p35-chipset-full-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a31-officially-launched-in-india-triple-rear-camera-6gb-ram-p35-chipset-full-specifications/#respond Tue, 25 Feb 2020 16:55:40 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6674 कंपनीने OPPO A31 ऑफिशियल तर केला आहे पण अजूनही या फोनची किंमत सांगितली नाही.

The post 6 जीबी रॅम, 4230एमएएच बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह OPPO A31 भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO ने काही दिवसांपूर्वी अंर्तराष्ट्रीय बाजारात आपली ‘ए सीरीज’ वाढवत नवीन डिवाईस OPPO A31 सादर केला होता. आर्कषक लुक आणि शानदार स्पेसिफिकेशन्स असलेला हा स्मार्टफोन आज कंपनीने भारतीय बाजारात पण ऑफिशियल केला आहे. OPPO च्या आधिकारिक वेबसाइट वर ओपो ए31 चे प्रोडक्ट पेज बनवण्यात आले आहे जिथे फोनच्या सर्व डिटेल्सचा खुलासा झाला आहे. कंपनीने OPPO A31 ऑफिशियल तर केला आहे पण अजूनही या फोनची किंमत सांगितली नाही. आशा आहे कि येत्या काही दिवसांत या स्मार्टफोनची किंमत पण समोर येईल.

OPPO A31

ओपो ए31 कंपनीने वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला आहे. फोन डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला चिन पार्ट आहे. ओपो ए31 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या मोठ्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे. OPPO A31 एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे जो 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या मीडियाटेकच्या हेलीयो पी35 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये जीई8320 जीपीयू आहे.

OPPO A31 इंडियन मार्केट मध्ये दोन रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनच्या बेस वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम देण्यात आला आहे तसेच दुसरा वेरिएंट 6 जीबी रॅम वर सादर केला गेला आहे. तसेच ओपो ए31 मध्ये स्टोरेज ऑप्शन्स म्हणून 64 जीबी मेमरी आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. दोन्ही वेरिएंट्स मध्ये स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 256 जीबी पर्यंत वाढवता येईल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता OPPO A31 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो बॅक पॅनल वर उजवीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलचा प्राइमरी वाइड अँगल लेंस सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोन मध्ये एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी ओपो ए31 एफ/2.0 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

OPPO A31 कंपनीच्या वेबसाइट वर Mystery Black आणि Fantasy White कलर मध्ये लिस्ट केला गेला आहे. सिक्योरिटीसाठी OPPO A31 च्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी OPPO A31 4,230एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. असे जरी असेल तरी हा फोन कोणत्या तारखेला बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल आणि फोनची किंमत किती असेल यासाठी कंपनीच्या पुढील घोषणेची वाट बघितली जात आहे.

The post 6 जीबी रॅम, 4230एमएएच बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह OPPO A31 भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a31-officially-launched-in-india-triple-rear-camera-6gb-ram-p35-chipset-full-specifications/feed/ 0
4230एमएएच बॅटरी आणि 4 जीबी रॅम सह लॉन्च झाला ट्रिपल रियर कॅमेरा असलेला OPPO A31 https://www.91mobiles.com/marathi/oppo-a31-launched-in-indonesia-with-4gb-ram-4230mah-battery-specs-price-sale-availability/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a31-launched-in-indonesia-with-4gb-ram-4230mah-battery-specs-price-sale-availability/#respond Fri, 14 Feb 2020 12:16:43 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6594 कंपनीने OPPO A31 स्मार्टफोन इंडोनेशिया मध्ये ऑफिशियल केला आहे. हा स्मार्टफोन लोवर मीड बजट मध्ये आला आहे जो शानदार लुक आणि स्पेसिफिकेशन्सना सपोर्ट करतो.

The post 4230एमएएच बॅटरी आणि 4 जीबी रॅम सह लॉन्च झाला ट्रिपल रियर कॅमेरा असलेला OPPO A31 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO संबंधित बातमी गेल्या काही दिवसांपासून समोर येत होती कि कंपनी आपल्या ‘ए सीरीज’ च्या नवीन फोन वर काम करत आहे जो OPPO A31 नावाने टेक मंचावर सादर केला जाईल. या स्मार्टफोन संबंधित अनेक लीक्स समोर आले होते ज्यात फोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि डिजाईनचा खुलासा झाला होता. आज सर्व लीक्स वर पूर्णविराम लावत ओपो ने आपला नवीन फोन अधिकृतपणे इंटरनेशनल मार्केट मध्ये सादर केला आहे. कंपनीने OPPO A31 स्मार्टफोन इंडोनेशिया मध्ये ऑफिशियल केला आहे. हा स्मार्टफोन लोवर मीड बजट मध्ये आला आहे जो शानदार लुक आणि स्पेसिफिकेशन्सना सपोर्ट करतो.

OPPO A31

ओपो ए31 कंपनीने वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला आहे. फोन डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला चिन पार्ट आहे. ओपो ए31 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या मोठ्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. OPPO A31 एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे जो 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या मीडियाटेकच्या हेलीयो पी35 चिपसेट वर चालतो.

OPPO A31 इंडोनेशिया मध्ये 4 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे. हा फोन 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने 512 जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो बॅक पॅनल वर उजवीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. ओपो ए31 चा प्राइमरी सेंसर एक वाइड अँगल लेंस आहे.

फोनच्या रियर कॅमेरा सेटअप मध्ये एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी ओपो ए31 एफ/2.0 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी OPPO A31 4,230एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो.

OPPO A31 इंडोनेशिया मध्ये Rp 2,599,000 मध्ये लॉन्च केला गेला आहे. हि किंमत इंडियन करंसी नुसार 13,500 रुपयांच्या आसपास आहे. इंडोनेशियन मार्केट मध्ये हा फोन ऑनलाईन शॉपिंग साइट्स सोबत ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर विक्रीसाठी उपलब्ध होईल. OPPO A31 इंडियन सर्टिफिकेशन्स साइट एनबीटीसी वर पण लिस्ट झाला आहे जो ईशारा करतो कि हा डिवाईस यर्त्या काही दिवसांत भारतीय बाजारात पण लॉन्च केला जाईल.

The post 4230एमएएच बॅटरी आणि 4 जीबी रॅम सह लॉन्च झाला ट्रिपल रियर कॅमेरा असलेला OPPO A31 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a31-launched-in-indonesia-with-4gb-ram-4230mah-battery-specs-price-sale-availability/feed/ 0
लॉन्चच्या आधीच समोर आले OPPO A31 चे स्पेसिफिकेशन्स, 6जीबी रॅम आणि ट्रिपल कॅमेऱ्यासह मिळेल 4230एमएएच बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/oppo-a31-full-specifications-leaked-6gb-ram-mediatek-helio-p35-4200mah-battery/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a31-full-specifications-leaked-6gb-ram-mediatek-helio-p35-4200mah-battery/#respond Wed, 12 Feb 2020 13:31:20 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6579 OPPO A31 बाजारात Mystery Black, Fantasy White आणि Lake Green कलर मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.

The post लॉन्चच्या आधीच समोर आले OPPO A31 चे स्पेसिफिकेशन्स, 6जीबी रॅम आणि ट्रिपल कॅमेऱ्यासह मिळेल 4230एमएएच बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO बद्दल वर्षाच्या सुरवातीला बातमी आली होती कि कंपनी आपल्या ‘ए सीरीज’ च्या नवीन फोन वर काम करत आहे आणि हा फोन OPPO A31 नावाने टेक विश्वात लॉन्च केला जाऊ शकतो. OPPO A31 अमेरिकन सर्टिफिकेशन्स साइट एफसीसी समवेत एनबीटीसी, टीकेडीएन, आईएमडीए आणि ब्लूटूथ सर्टिफिकेशन्स साइट वर पण लिस्ट झाला आहे जिथे फोन संबंधित माहिती समोर आली होती. आता या फोनचा लॉन्च जवळ आहे असे वाटते तसेच कंपनीने ऑफिशियल करण्याआधीच OPPO A31 च्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे.

OPPO A31

ओपो ए31 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता समोर आलेल्या माहितीनुसार हा डिवाईस 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्ले सह लॉन्च केला जाईल. या फोन मध्ये बेजल लेस वॉटरड्रॉप नॉच मिळू शकते. लीक नुसार या फोनचे डायमेंशन 163.9×75.5×8.3एमएम असतील आणि फोनचे वजन 180 ग्राम असेल. समोर आलेल्या डिटेल्सनुसार OPPO A31 बाजारात Mystery Black, Fantasy White आणि Lake Green कलर मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.

OPPO A31 बद्दल सांगण्यात आले आहे कि हा फोन एंडरॉयड 9 पाई वर लॉन्च होईल तसेच कलरओएस 6.1.2 वर चालेल. तसेच प्रोसेसिंग साठी या फोन मध्ये मीडियाटेकचा हेलियो पी35 चिपसेट दिला जाऊ शकतो. मिळालेल्या माहितीनुसार ओपो ए31 दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च होईल. फोनचा बेस वेरिएंट 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल तसेच मोठ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते.

ओपो ए31 चा फोटोग्राफी सेग्मेंट पाहता लीक नुसार हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 16 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर दिला जाईल. तसेच OPPO A31 मध्ये 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर आणि एक मॅक्रो कॅमेरा सेंसर दिला जाईल. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी या फोन मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकते. OPPO A31 मध्ये पावर बॅकअप साठी 4,230एमएएच ची मोठी बॅटरी असल्याचे सांगण्यात आले आहे.

अशी असेल डिजाईन

सर्टिफिकेशन लिस्टिंग मध्ये OPPO A31 ची स्केच ईमेज पण शेयर झाली आहे ज्यावरून फोनच्या लुक आणि डिजाईनची माहिती मिळाली आहे. डिजाईन पाहता एफसीसी वर हा डिवाईस ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. हा कॅमेरा सेटअप बॅक पॅनल वर डावीकडे आहे. या सेटअप मध्ये तीन कॅमेरा सेंसर्स सोबत फ्लॅश लाईट पण देण्यात आली आहे. कॅमेरा सेटअपच्या उजवीकडे ‘Designed For A-Series’ लिहिण्यात आले आहे.

ओपो फोनच्या बॅक पॅनल वर मधोमध फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे. खाली उजवीकडे OPPO ची ब्रॅण्डिंग आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर पावर बटण आणि डाव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर व सिम स्लॉट दाखवण्यात आला आहे. फोनच्या फोटो वरून समजले आहे कि OPPO A31 वॉटरड्रॉप नॉच वर लॉन्च केला जाईल. फोनच्या खालच्या पॅनल वर यूएसबी टाईप सी पोर्ट सह स्पीकर ग्रिल आणि 3.5एमएम जॅक दिला जाऊ शकतो.

The post लॉन्चच्या आधीच समोर आले OPPO A31 चे स्पेसिफिकेशन्स, 6जीबी रॅम आणि ट्रिपल कॅमेऱ्यासह मिळेल 4230एमएएच बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a31-full-specifications-leaked-6gb-ram-mediatek-helio-p35-4200mah-battery/feed/ 0