Oppo A83 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 10 Oct 2018 09:55:42 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 फक्त 8,990 रुपयांमध्ये लॉन्च झाला ओपो चा फोटो सेंट्रिक स्मार्टफोन ओपो ए83, यात आहे 2.5गीगाहर्ट्ज चा दमदार प्रोसेसर https://www.91mobiles.com/marathi/oppo-a83-2gb-ram-16gb-storage-launch-in-india-at-price-rs-8990-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a83-2gb-ram-16gb-storage-launch-in-india-at-price-rs-8990-in-marathi/#respond Wed, 10 Oct 2018 09:54:00 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2429 2जीबी रॅम सह हा फोन 16जीबी इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो. कंपनी ने रॅम व मेमरी व्यतिरिक्त फोनचे अन्य स्पेसिफिकेशन्स तेच ठेवले आहेत.

The post फक्त 8,990 रुपयांमध्ये लॉन्च झाला ओपो चा फोटो सेंट्रिक स्मार्टफोन ओपो ए83, यात आहे 2.5गीगाहर्ट्ज चा दमदार प्रोसेसर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी ओपो ने एप्रिलमध्ये आपला बेजल लेस बजेट स्मार्टफोन ए83 4जीबी रॅम सह बाजारात आणला होता. हा फोन 4जीबी रॅम सह 64जीबी स्टोेरेजला सपोर्ट करतो तसेच कंपनी ने हा फोन 15,990 रुपयांमध्ये लॉन्च केला होता. तर आज कंपनी ने आपल्या या हिट स्मार्टफोनचा अजून एक नवीन मॉडेल भारतात सादर केला आहे. ओपो ए83 2जीबी रॅम सह लॉन्च केला आहे. हा फोन फक्त 8,990 रुपयांमध्ये आॅनलाईन शॉपिंग साइट्स सोबतच आॅफलाईन रिटेल स्टोर्स वरून पण विकत घेता येईल.

ओपो ए83 चा हा नवीन वेरिएंट कपंनी ने 2जीबी रॅम मेममरी सह सादर केला आहे. 2जीबी रॅम सह हा फोन 16जीबी इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो. कंपनी ने रॅम व मेमरी व्यतिरिक्त फोनचे अन्य स्पेसिफिकेशन्स तेच ठेवले आहेत. हा फोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या 5.7-इंचाच्या एचडी+ डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे जो 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन कलर ओएस 3.2 आधारित एंडरॉयड नुगट वर लॉन्च झाला आहे ज्या सोबत हा 2.5गीगाहर्ट्ज 64बिट्स आॅक्टा-कोर मीडियाटेक एमटी6763टी चिपसेट वर चालतो.

ओपो ए83 कंपनी ने फोटो सेंट्रिक स्मार्टफोन म्हणून सादर केला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सोबत 13-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच सेल्फी साठी हा फोन 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोनचा सेल्फी कॅमेरा आपल्या ब्यूटी इंटेलिजेंस मुळे चांगले फोटो घेऊ शकतो. तसेच यात एआई ब्यूटीफिकेशन्स टेक्नॉलॉजी आहे.

ओपो ए83 मध्ये कंपनी ने फिजिकल फिंगरप्रिंट स्कॅनर च्या ऐवजी फक्त फेशियल अनलॉक टेक्नॉलॉजी दिली आहे. कंपनीच दावा आहे कि हा फोन 128 प्वाइंट्स सह यूजरचा चेहरा स्कॅन करून फक्त 0.18 सेकेंड मध्ये फोन अनलॉक होऊ शकतो. हा फोन बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह 4जी वोएलटीई व डुअल सिम ला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी यात 3,090एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post फक्त 8,990 रुपयांमध्ये लॉन्च झाला ओपो चा फोटो सेंट्रिक स्मार्टफोन ओपो ए83, यात आहे 2.5गीगाहर्ट्ज चा दमदार प्रोसेसर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a83-2gb-ram-16gb-storage-launch-in-india-at-price-rs-8990-in-marathi/feed/ 0
4जीबी रॅम आणि 64जीबी मेमरी सह लॉन्च झाला ओपो ए83 https://www.91mobiles.com/marathi/oppo-a83-launched-in-india-price-specification-and-features-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a83-launched-in-india-price-specification-and-features-in-marathi/#respond Thu, 26 Apr 2018 11:31:00 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=99 काही दिवसांपूर्वीच ओपो च्या एका नवीन मॉडेल ची माहिती समोर आली होती ज्यात दावा करण्यात आला होता कि कंपनी लवकरच ए83 मॉडेल सादर करणार आहे आणि आज हा मॉडल भारतात लॉन्च करण्यात आला आहे. या फोनची किंमत 15,990 रुपये आहे आणि हा आॅनलाइन स्टोर फ्लिपकार्ट, अमेजॉन आणि पेटीएम व्यतिरिक्त आॅफलाइन स्टोर वर पण उपलब्ध होईल. […]

The post 4जीबी रॅम आणि 64जीबी मेमरी सह लॉन्च झाला ओपो ए83 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही दिवसांपूर्वीच ओपो च्या एका नवीन मॉडेल ची माहिती समोर आली होती ज्यात दावा करण्यात आला होता कि कंपनी लवकरच ए83 मॉडेल सादर करणार आहे आणि आज हा मॉडल भारतात लॉन्च करण्यात आला आहे. या फोनची किंमत 15,990 रुपये आहे आणि हा आॅनलाइन स्टोर फ्लिपकार्ट, अमेजॉन आणि पेटीएम व्यतिरिक्त आॅफलाइन स्टोर वर पण उपलब्ध होईल. कंपनी ने ही पण माहिती दिली आहे की या फोन मध्ये तुम्हाला एफ7 प्रमाणे एआई ब्यूटी मोड मिळेल जो उत्तम सेल्फी साठी ओळखला जातो.

ओपो ए83 मध्ये 5.7—इंचाची एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे ज्याचे स्क्रीन रेजल्यूशन 1440 X 720 पिक्सल आहे. यात 18:9 आसपेक्ट रेशियो वाला फूल व्यू डिसप्ले देण्यात आला आहे. पण कंपनी ने स्क्रीन प्रोटेक्शन ची माहिती दिली नाही.

हा फोन मीडियाटेक एमटी6763टी हेलियो पी23 चिपसेट वर चालतो आणि फोन मध्ये 2.5गीगाहट्र्ज चा आॅक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. फोन ला 4जीबी रॅम ची ताकद देण्यात आली आहे आणि यात 64जीबी ची इंटरनल मेमरी आहे. यात मेमरी कार्ड सपोर्ट आहे आणि तुम्ही 256जीबी पर्यंतचे कार्ड वापरू शकता.

फोटोग्राफी साठी या फोन मध्ये 13—मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर 8—मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. कॅमेरा सोबत एआई ब्यूटी टेक्नोलॉजी आहे जी प्रकाश, रंग आणि स्कीन टोन नुसार स्वतः च फोटो अडजस्ट करते ज्यामुळे तुम्हाला उत्तम फोटो मिळतील.

डुअल सिम आधारित ओपो ए83 मध्ये तुम्हाला 4जी वोएलटीई सपोर्ट मिळेल. त्याचबरोबर ब्लूटू​थ आणि वाईफाई पण देण्यात आले आहेत. डाटा व कनेक्टिविटी साठी माइक्रो यूएसबी पोर्ट देण्यात आला आहे. तर पावर बॅकअप साठी 3,180 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post 4जीबी रॅम आणि 64जीबी मेमरी सह लॉन्च झाला ओपो ए83 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a83-launched-in-india-price-specification-and-features-in-marathi/feed/ 0