OPPO A92 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 23 Jun 2020 11:18:21 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 5,000एमएएच बॅटरी आणि 8जीबी रॅम सह, OPPO A92 झाला लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/oppo-a92-officially-launched-5000mah-battery-8gb-ram-specs-price-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a92-officially-launched-5000mah-battery-8gb-ram-specs-price-sale-offer/#respond Mon, 04 May 2020 12:19:28 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7350 Oppo A92 कंपनी द्वारे सीरीज मध्ये अलीकडेच जोडलेल्या डिवाईस ओपो ए72 सारख्या लुक वर सादर केला आहे.

The post 5,000एमएएच बॅटरी आणि 8जीबी रॅम सह, OPPO A92 झाला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Oppo ब्रँडने गेल्या महिन्यात अंर्तराष्ट्रीय टेक बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत ‘ए सीरीज’ अंतर्गत दोन स्मार्टफोन Oppo A52 आणि Oppo A72 लॉन्च केले आहेत. हे दोन्ही फोन मिडबजेट सेग्मेंट मध्ये सादर झाले आहेत जे चीन मध्ये सेलसाठी उपलब्ध झाले आहेत. तर आज ओपो ने मे महिन्यातील आपला पहिला स्मार्टफोन पण मार्केट मध्ये आणला आहे. कंपनीने हा फोन पण ‘ए सीरीज’ मध्ये लॉन्च केला आहे जो Oppo A92 नावाने मार्केट मध्ये आला आहे. ओपो ए92 कंपनीने सध्या मलेशिया मध्ये लॉन्च केला आहे जो येत्या काही दिवसांत जगातील इतर देशांसह भारतात पण लॉन्च केला जाऊ शकतो.

लुक व डिजाईन

Oppo A92 कंपनी द्वारे सीरीज मध्ये अलीकडेच जोडलेल्या डिवाईस ओपो ए72 सारख्या लुक वर सादर केला आहे. ओपो ए92 पंच-होल डिस्प्ले डिजाईन वर लॉन्च केला गेला आहे. हा होल स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपरीवर आहे. फोन डिस्प्लेच्या तीन कडा पूर्णपणे बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला चिन पार्ट आहे. कंपनीने हा फोन 3डी क्वॉड कर्व्ड डिजाईन वर सादर केला आहे.

ओपो ए92 च्या बॅक पॅनल वर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर उजवीकडे आहे. सेटअप चौकोनी आकाराचा आहे ज्यात तीन कॅमेरा सेंसर साईड ऐज कडे एका रांगेत वर्टिकल शेप मध्ये देण्यात आले आहेत. या रांगेच्या डावीकडे सर्वात वर फ्लॅश लाईट आणि सर्वात खाली चौथी कॅमेरा लेंस आहे. या दोन्हींच्या मध्ये सेंसरची माहिती लिहिण्यात आली आहे. Oppo A92 च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर नाही. फोनच्या उजव्या पॅनल वर पावर बटण देण्यात आला आहे जो फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड आहे. त्याचप्रमाणे डाव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आहे.

स्पेसिफिकेशन्स

Oppo A92 कंपनीने 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.55 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे ज्याचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90:5 टक्के आहे. ओपोने या स्क्रीनला नियो डिस्प्लेचे नाव दिले आहे. कंपनीने हा फोन एंडरॉयड 10 आधारित कलर ओएस 7.1 वर सादर केला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर चालतो. Oppo A92 8 जीबी रॅम व 128 जीबी इंटरनल स्टोरेज वर लॉन्च केला गेला आहे.

Oppo A92 फोटोग्राफीसाठी क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.7 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या मोनो लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या पोर्टरेट लेंसला सपोर्ट करतो. तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वर एफ/2.0 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

ओपो ए92 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या साईड पॅनल वर फिंगरप्रिंट बटण देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या 5,000एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. Oppo A92 कपंनीने Twilight Black आणि Shining White कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे. मलेशियन बाजारात हा फोन 1199 रिंगिट म्हणजे जवळपास 21,000 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल.

The post 5,000एमएएच बॅटरी आणि 8जीबी रॅम सह, OPPO A92 झाला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a92-officially-launched-5000mah-battery-8gb-ram-specs-price-sale-offer/feed/ 0
4 जीबी रॅम आणि 4230एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला ओपोचा लो बजेट फोन OPPO A12 https://www.91mobiles.com/marathi/oppo-a12-officially-launched-4gb-ram-4230-mah-battery-price-sale-specs/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a12-officially-launched-4gb-ram-4230-mah-battery-price-sale-specs/#respond Fri, 17 Apr 2020 11:15:55 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7533 OPPO A12, OPPO A92 आणि OPPO Reno 3 Pro इंडोनेशियन बाजारात लॉन्च केले जाणार असल्याची घोषणा ओपोने आपल्या ट्वीटर वर केली आहे.

The post 4 जीबी रॅम आणि 4230एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला ओपोचा लो बजेट फोन OPPO A12 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO येत्या काही दिवसांत अंर्तराष्ट्रीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ओपो ए12 स्मार्टफोन बद्दल लीक्स समोर येत आहेत, तर आता ओपोने हा फोन समोर ठेवला आहे. कंपनीने OPPO A12 टेक मंचावर सादर केला आहे. ओपोने हा फोन इंडोनेशिया मध्ये अधिकृत केला आहे जो येत्या काही दिवसांत जागतिक बाजारात येईल. OPPO A12 सोबतच कंपनी OPPO A92 आणि OPPO Reno 3 Pro पण इंडोनेशियन मार्केट मध्ये घेऊन येत आहे जो येत्या 21 एप्रिल पासून तिथे लॉन्च होईल.

OPPO A12 च्या लॉन्चची माहिती कंपनीच्या ट्वीटर हँडल वरून मिळाली आहे. ओपो इंडोनेशियाने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडल वर एका फोटोच्या माध्यमातून OPPO A12 ची किंमत आणि याच्या स्पेक्सची माहिती अधिकृत केली आहे. ओपो ए12 इंडोनेशियन मार्केट मध्ये आला आहे पण कंपनी येत्या 21 एप्रिलला हा अधिकृतपणे लॉन्च करेल. या दिवशी OPPO A12, OPPO A92 आणि OPPO Reno 3 Pro इंडोनेशियन बाजारात लॉन्च केले जाणार असल्याची घोषणा ओपोने आपल्या ट्वीटर वर केली आहे.

OPPO A12

ओपो ए12 पाहता फोन डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. स्क्रीनच्या वर ‘वी’ शेप नॉच आहे. फोनच्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो पॅनलच्या डावीकडे हॉरिजॉन्टल शेप मध्ये आहे. कॅमेरा सेंसर्सच्या बाजूला फ्लॅश लाईट आहे. OPPO A12 च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट देण्यात आला आहे. फोनचा बॅक पॅनल बऱ्याचअंशी Realme 3 सारखा आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर पावर बटण देण्यात आला आहे तर डाव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आहे. फोनच्या लोवर पॅनल वर यूएसबी पोर्ट, 3.5एमएम जॅक आणि स्पीकर आहे.

स्पेसिफिकेशन्स पाहता OPPO A12 6.22 इंचाच्या एचडी+ आईपीएस एलसीडी डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. हा फोन एंडरॉयड 9 पाई आधारित आहे जो कलरओएस 6 वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी ओपो ए12 मध्ये 1.8गीगाहर्ट्ज + 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकचा हीलियो पी35 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी हा फोन आईएमजी जीई8320 जीपीयू ला सपोर्ट करतो.

OPPO A12 इंडोनेशिया मध्ये 4 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे. तसेच हा फोन 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता ओपो ए12 च्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/2.2 अपर्चर असलेला 13-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2-मेगापिक्सलचा सेकंडरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 5-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

OPPO A12 डुअल सिम फोन आहे जो 4जी ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी सह सिक्योरिटीसाठी इथे फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर पावर बॅकअपसाठी हा फोन 4,230एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. कंपनीने हा फोन इंडोनेशिया मध्ये ब्लॅक आणि ब्लू कलर मध्ये लॉन्च केला आहे. किंमत पाहता ओपो ए12 Rp.2,499,000 मध्ये लॉन्च केला गेला आहे. हि किंमत भारतीय करंसी नुसार 12,000 रुपयांच्या आसपास आहे.

The post 4 जीबी रॅम आणि 4230एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला ओपोचा लो बजेट फोन OPPO A12 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a12-officially-launched-4gb-ram-4230-mah-battery-price-sale-specs/feed/ 0