OPPO A93 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 13 Jan 2021 11:24:18 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 8 जीबी रॅम आणि 5,000एमएएच बॅटरी सह समोर आला स्वस्त नवीन OPPO A93 5G स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/oppo-a93-5g-to-launch-with-8gb-ram-snapdragon-480-soc-full-specs-leak/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a93-5g-to-launch-with-8gb-ram-snapdragon-480-soc-full-specs-leak/#respond Wed, 13 Jan 2021 11:24:18 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9649 लाॅन्चच्या आधी लीकच्या माध्यमातून OPPO A93 5G स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स इंटरनेट वर समोर आले आहेत.

The post 8 जीबी रॅम आणि 5,000एमएएच बॅटरी सह समोर आला स्वस्त नवीन OPPO A93 5G स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO आपल्या नव्या 5जी स्मार्टफोन वर काम करत आहे जो काही दिवसांपूर्वी चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर लिस्ट केला गेला होता. लीक मध्ये समोर आले होते कि हा ओपो फोन OPPO A93 5G नावाने टेक मंचावर येईल. चर्चा अशी आहे कि ओपो ए93 5जी कंपनी सर्वात आधी चीन मध्ये लाॅन्च करेल आणि लवकरच हा स्मार्टफोन टेक मार्केट मध्ये येईल. आज लाॅन्चच्या आधी लीकच्या माध्यमातून OPPO A93 5G स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स इंटरनेट वर समोर आले आहेत.

OPPO A93 5G

सीधे ओपो ए93 5जी चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता लिस्टिंगनुसार हा स्मार्टफोन कर्व्ड ऐज पंच-होल डिस्प्ले वर लाॅन्च केला जाईल. डिस्प्ले साईजची माहिती समोर आली नाही पण सांगण्यात आले आहे की हा फोन 1080 x 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या फुलएचडी+ डिस्प्ले सपोर्ट करेल. फोन स्क्रीनच्या रिफ्रेश रेटची माहिती अजून समोर आली नाही पण फोन सेग्मेंट पाहता असे म्हणता येईल कि हा 90हर्ट्ज किंवा जास्त रिफ्रेश रेट सह येईल.

OPPO A93 5G एंडराॅयडच्या लेटेस्ट ओएस एंडराॅयड 11 वर लाॅन्च केला जाईल, त्याचबरोबर प्रोसेसिंगसाठी फोन मध्ये क्वाॅलकाॅमचा नवीन स्नॅपड्रॅगन 480 चिपसेट मिळेल. विशेष म्हणजे काही निवडक स्मार्टफोनच आतापर्यंत क्वाॅलकाॅमच्या या नव्या चिपसेट सह येतील. लीकनुसार ओपो ए93 5जी स्मार्टफोन 8 जीबी रॅम सह लाॅन्च होईल आणि फोन मध्ये 256 जीबी की इंटरनल स्टोरेज मिळेल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता ओपो ए93 ट्रिपल रियर कॅमेर्‍यासह लाॅन्च होईल. लिस्टिंग मध्ये समोर आले आहे की फोनच्या बॅक पॅनल वर 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर दिला जाईल त्या सोबत इतर दोन 2 मेगापिक्सलचे कॅमेरा सेंसर मिळतील. या सेंसर्सची माहिती समोर आली नाही. लीकनुसार इस आगामी ओपो फोनच्या फ्रंट पॅनल वर 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाईल.

OPPO A93 5G मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत 3.5एमएम जॅक पण दिला जाईल. लीकनुसार या फोन मध्ये 5,000एमएएचची मोठी बॅटरी दिली जाईल जी 18वाॅट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येईल. लिस्टिंग मध्ये ओपो ए93 ची किंमत 2199 युआन असल्याचे सांगण्यात आले आहे. ही किंमत भारतीय करंसीनुसार 24,900 रुपयांच्या आसपास आहे. तसेच लीकनुसार हा फोन Aurora, Dazzling Black आणि Elegant Silver कलर मध्ये टेक मंचावर एंट्री करेल.

The post 8 जीबी रॅम आणि 5,000एमएएच बॅटरी सह समोर आला स्वस्त नवीन OPPO A93 5G स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a93-5g-to-launch-with-8gb-ram-snapdragon-480-soc-full-specs-leak/feed/ 0