OPPO A95 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 27 Apr 2021 11:20:49 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 OPPO A95 5G स्मार्टफोन 48MP कॅमेरा, 4,310mAh बॅटरी आणि फास्ट चार्जसह झाला लॉन्च, जाणून घ्या किंमत https://www.91mobiles.com/marathi/oppo-a95-5g-launched-check-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a95-5g-launched-check-price-and-specifications/#respond Tue, 27 Apr 2021 11:20:49 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10713 OPPO A95 5G स्मार्टफोनमध्ये 6.43 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 1080 x 2400 पिक्सल Full HD+ आहे.

The post OPPO A95 5G स्मार्टफोन 48MP कॅमेरा, 4,310mAh बॅटरी आणि फास्ट चार्जसह झाला लॉन्च, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO ने होम मार्केट चीनमध्ये A सीरीजचा नवीन स्मार्टफोन OPPO A95 5G सादर केला आहे. ओप्पोचा हा स्मार्टफोन भारतात लॉन्च झालेल्या OPPO F19 Pro+ 5G प्रमाणेच आहे. यात कंपनीने काही बदल केले आहेत. OPPO A95 5G स्मार्टफोनमध्ये OPPO F19 Pro+ 5G च्या तुलनेत फास्ट चार्जिंग क्षमता आणि एक्स्ट्रा कॅमेरा सेंसरसह सादर केला गेला आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये कोणताही फरक नाही. इथे आम्ही तुम्हाला OPPO A95 5G स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सबाबत सविस्तर सांगणार आहोत. (Oppo A95 5G launched check price and specifications)

OPPO A95 5G स्पेसिफिकेशन्स

OPPO A95 5G स्मार्टफोनमध्ये 6.43 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 1080 x 2400 पिक्सल Full HD+ आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. या डिस्प्लेमध्ये फिंगरप्रिंट सेंसर आणि सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच होल डिस्प्ले दिला आहे. कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता OPPO A95 5G स्मार्टफोनमध्ये 48 मेगापिक्सलचा प्राइमेरी कॅमेरा दिला आहे. या फोनचा सेकंडरी कॅमेरा 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा फ़्रंट कॅमेरा दिला आहे.

हे देखील वाचा : लॉन्चपूर्वीच समोर आली Google Pixel 5A च्या कॅमेऱ्याची माहिती, Apple च्या स्वस्त फोनला देईल टक्कर

OPPO A95 5G स्मार्टफोनमध्ये मीडियाटेकचा Dimensity 800U चिपसेट आहे. ओप्पोचा हा स्मार्टफोन 8 GB LPDDR4x RAM सह सादर केला जाऊ शकतो. फोनची इंटरनल स्टोरेज 128 GB आहे. या फोनमध्ये microSD कार्ड स्लॉट आहे. ओप्पोच्या या स्मार्टफोनमध्ये 4,310mAh ची बॅटरी आहे, जी 30W फास्ट चार्जला सपोर्ट करते. Oppo A95 5G स्मार्टफोन Android 11 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित ColorOS 11.1 वर चालतो. कनेक्टिविटीसाठी या फोनमध्ये डुअल SIM, 5G / 5G, Wi-Fi 802.11ac, Bluetooth 5.1, GPS, USB-C, आणि 3.5mm ऑडियो जॅक देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : Nokia चा नवीन डाव तयार, 5G आणि 108MP कॅमेऱ्यासह घेऊन येत आहे आपला नवीन फोन

OPPO A95 5G : किंमत

OPPO A95 5G स्मार्टफोन चीनमध्ये दोन वेरिएंट 8 GB RAM + 128 GB स्टोरेज आणि 8 GB RAM + 256 GB स्टोरेजसह सादर केला गेला आहे. या दोन्ही वेरिएंट्सची किंमत क्रमश: 1,999 युआन (जवळपास 23,000 रुपये) आणि 2,299 युआन (जवळपास 26,000 रुपये) आहे. ओप्पोचा हा स्मार्टफोन तीन कलर ऑप्शन ब्लॅक, ब्लू आणि सिल्वरमध्ये सादर केला गेला आहे.

The post OPPO A95 5G स्मार्टफोन 48MP कॅमेरा, 4,310mAh बॅटरी आणि फास्ट चार्जसह झाला लॉन्च, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a95-5g-launched-check-price-and-specifications/feed/ 0