OPPO Ace - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 23 Sep 2019 15:15:29 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 OPPO पण घेऊन येत आहे 64 MP कॅमेरा असलेला फोन OPPO K5, 8 जीबी रॅम सह होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/oppo-k5-specifications-leaked-64-mp-quad-rear-camera-8-gb-ram-tenaa/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-k5-specifications-leaked-64-mp-quad-rear-camera-8-gb-ram-tenaa/#respond Mon, 23 Sep 2019 15:15:29 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5390 टेना नुसार या स्मार्टफोन मध्ये 64 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर दिला जाईल.

The post OPPO पण घेऊन येत आहे 64 MP कॅमेरा असलेला फोन OPPO K5, 8 जीबी रॅम सह होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO ने सांगितले आहे कि कंपनी आपल्या ‘के सीरीज’ च्या आगामी डिवाईस OPPO K5 वर काम करत आहे आणि हा स्मार्टफोन VOOC Flash Charge 4.0 टेक्नॉलॉजी सह बाजारात येईल. OPPO ने मागे OPPO K5 सोबत OPPO Ace ची पण घोषणा केली होती जो 65W SuperVOOC 2.0 टेक्नॉलॉजी सह येईल. OPPO Reno Ace 10 ऑक्टोबरला टेक मंचावर येईल पण OPPO K5 च्या लॉन्चची माहिती अजूनतरी समोर अली नाही. पण लॉन्चच्या आधी हा स्मार्टफोन चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेना वर लिस्ट करण्यात आला आहे ज्यात OPPO K5 च्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे.

OPPO K5

टेनाच्या लिस्टिंग नुसार OPPO K5 कंपनी द्वारा 2,340 x 1,080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4 इंचाच्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल. टेना वर या फोनचे डायमेंशन 158.7 x 75.2 x 8.6एमएम आणि वजन 182 ग्राम सांगण्यात आले आहे. टेना लिस्टिंग मधून समजले आहे कि हा स्मार्टफोन एंडरॉयड 9.0 पाई आधारित कलर ओएस वर सादर केला जाईल आणि क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट वर चालेल.

OPPO K5 टेना वर 8 जीबी रॅम सह दाखवण्यात आला आहे तसेच फोन मध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज असल्याचे सांगण्यात आले आहे. आशा आहे कि हा स्मार्टफोन एकापेक्षा जास्त वेरिएंट मध्ये येईल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता OPPO K5 क्वॉड रियर कॅमेरा सह दाखवण्यात आला आहे. टेना नुसार या स्मार्टफोन मध्ये 64 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर दिला जाईल.

त्याचप्रमाणे फोन मध्ये 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड एंगल लेंस, 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस मिळू शकते. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी OPPO K5 मध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असल्याचे सांगण्यात आले आहे. टेना नुसार OPPO K5 मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी मिळेल.

VOOC 4.0

फोन मधील VOOC 4.0 टेक्नॉलॉजी पाहता हि टेक्नॉलॉजी 30वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. विशेष म्हणजे भारतात Xiaomi चा हाईएंड स्मार्टफोन Redmi K20 Pro 27वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. VOOC 4.0 बद्दल OPPO ने सांगितले कि या टेक्नॉलॉजीमुळे 4,000एमएएच बॅटरी असलेला स्मार्टफोन फक्त 30 मिनिटांत 67 टक्क्यांपर्यंत चार्ज करता येईल. तसेच 73 मिनिटांत हि बॅटरी फुल 100 टक्के चार्ज होईल. OPPO ने VOOC 4.0 हि टेक्नॉलॉजी आधीच्या वर्जन म्हणजे VOOC 3.0 पेक्षा 12 टक्के वेगवान असल्याचे सांगितले आहे. तसेच VOOC 4.0 टेक्नॉलॉजी सह चार्जिंग चालू असताना फोनची बॅटरी आणि तापमान पण संतुलित केले जाईल.

The post OPPO पण घेऊन येत आहे 64 MP कॅमेरा असलेला फोन OPPO K5, 8 जीबी रॅम सह होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-k5-specifications-leaked-64-mp-quad-rear-camera-8-gb-ram-tenaa/feed/ 0