OPPO F3 Plus - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 24 May 2018 17:07:09 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 6,000 रुपयांनी स्वस्त मिळत आहे 6जीबी रॅम वाला ओपो एफ3 प्लस https://www.91mobiles.com/marathi/oppo-f3-plus-6gb-varien-discount-by-rs-6000-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-f3-plus-6gb-varien-discount-by-rs-6000-in-marathi/#respond Thu, 24 May 2018 17:07:09 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=635 जियो यूजर्सना 198 रुपये तसेच 299 रुपयांच्या प्लान सह 1,200 रुपयांचा अतिरिक्त कॅशबॅक पण दिला जात आहे.

The post 6,000 रुपयांनी स्वस्त मिळत आहे 6जीबी रॅम वाला ओपो एफ3 प्लस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सेल्फी सेंट्रिक स्मार्टफोन्स साठी प्रसिद्ध टेक कंपनी ओपो ने मागच्या वर्षी नोव्हेंबर मध्ये आपला 6जीबी रॅम वाला शानदार स्मार्टफोन एफ3 प्लस लॉन्च केला होता. ओपो ने हा फोन 22,990 रुपयांमध्ये लॉन्च केला होता. उत्तम कॅमेरा आणि दमदार स्पेसिफिकेशन्स असलेला हा स्मार्टफोन आता ओपो फॅन्सना 6,000 रुपयांच्या मोठ्या डिस्काउंट वर मिळत आहे. ओपो एफ3 प्लस फ्लिपकार्ट वरून 16,990 रुपयांच्या किंमतीत विकत घेता येईल.

ओपो एफ3 प्लस वर शॉपिंग साइट फ्लिपकार्ट 6,000 रुपयांचा मोठा डिस्काउंट देत आहे. या मोठया डिसकाउंट नंतर 22,990 रुपयांचा हा फोन 16,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या सुटी सह फ्लिपकार्ट वर ओपो एफ3 प्लस 15,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज आॅफर आणि नो कॉस्ट ईएमआई वर पण सेल साठी उपलब्ध आहे. तर जियो यूजर्सना 198 रुपये तसेच 299 रुपयांच्या प्लान सह 1,200 रुपयांचा अतिरिक्त कॅशबॅक पण दिला जात आहे.

ओपो एफ3 प्लस बद्दल बोलायचे तर याच्या फ्रंट पॅनल वर 16-मेगापिक्सल तसेच 8-मेगापिक्सल चा डुअल कॅमेरा सेटअप आहे. तर बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सल चा सोनी आईएमएक्स398 रियर सेंसर आहे. फोन मध्ये 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टड आहे. तसेच यात 1080×1920​ पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6-इंचाची फुलएचडी स्क्रीन दिली आहे. एंडरॉयड मार्शमेलो सह हा फोन आॅक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 653 चिपसेट वर चालतो.

6जीबी रॅम सह या फोन मध्ये 64जीबी ची इंटरनल मेमरी देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येते. तर ग्राफिक्स साठी यात ऐड्रेनो 510 पण आहे. हा फोन डुअल सिम सोबत 4जी सपोर्टेड आहे. फिंगरप्रिंट सेंसर, वाईफाई, एनएफसी व यूएसबी टाईप-सी सारख्या फीचर सह कंपनी ने यात 4,000एमएएच ची बॅटरी दिली आहे जी वीओसीसी फास्ट चार्जिंग सपोर्ट सह येते.

ओपो एफ3 प्लस चा हा 6जीबी रॅम वेरिएंट फ्लिपकार्ट वर 16,990 रुपयांमध्ये मिळत आहे तर अन्य शॉपिंग साइट >अमेजॉन इंडिया वर हा फोन सध्यातरी 20,475 रुपयांच्या किंमतीत सेल साठी लिस्ट आहे.

The post 6,000 रुपयांनी स्वस्त मिळत आहे 6जीबी रॅम वाला ओपो एफ3 प्लस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-f3-plus-6gb-varien-discount-by-rs-6000-in-marathi/feed/ 0