Oppo F7 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 10 Jul 2018 13:15:37 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 3,000 रुपये स्वस्त झाला ओपो चा नॉच डिस्प्ले आणि 6जीबी रॅम वाला स्मार्टफोन एफ7 https://www.91mobiles.com/marathi/oppo-f7-price-cut-with-rs-3000-6gb-ram-notch-display-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-f7-price-cut-with-rs-3000-6gb-ram-notch-display-in-marathi/#respond Tue, 10 Jul 2018 13:15:37 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1223 ओपो एफ7 चा 6जीबी रॅम वेरिएंट भारतात आता पर्यंत 26,990 रुपये तर 4जीबी रॅम वेरिएंट 21,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होता.

The post 3,000 रुपये स्वस्त झाला ओपो चा नॉच डिस्प्ले आणि 6जीबी रॅम वाला स्मार्टफोन एफ7 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ओपो ने मार्च मध्ये भारतात आपला नॉच डिस्प्ले वाला स्मार्टफोन एफ7 लॉन्च केला होता. हा स्मार्टफोन दोन रॅम वेरिएंट मध्ये सेल साठी उपलब्ध झाला होता. आता आपल्या फॅन्सना भेट देत ओपो ने एफ7 स्मार्टफोन ची किंमत कमी केली आहे. फोन चे 4जीबी रॅम आणि 6जीबी रॅम दोन्ही वेरिएंट नवीन किंमती सह आॅनलाईन व आॅफलाईन प्लॅटफार्म वर सेल साठी उपलब्ध झाले आहेत.

ओपो एफ7 चा 6जीबी रॅम वेरिएंट भारतात आता पर्यंत 26,990 रुपये तर 4जीबी रॅम वेरिएंट 21,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होता. तर कंपनी ने फोन च्या 6जीबी रॅम वेरिएंट ची 3,000 रुपयांनी आणि 4जीबी रॅम वेरिएंट ची किंमत 2,000 रुपयांनी कमी केली आहे. या प्राइस कट नंतर ओपो एफ7 चा 6जीबी रॅम/128जीबी मेमरी वेरिएंट 23,990 रुपये तर 4जीबी रॅम/64जीबी मेमरी वेरिएंट 19,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

ओपो एफ7 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 6.23-इंचाचा मोठा बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला नॉच आहे. हा डिस्प्ले 2280 x 1080 पिक्सल ला सपोर्ट करतो म्हणजे फुलएचडी प्लस आहे. फोन चा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 89.09 टक्के आहे तसेच डिस्प्ले प्रोटेक्ट करण्यासाठी कंपनी ने वर लेयर चा वापर केला आहे.

हा फोन कलर ओएस 5.0 आधारित एंडरॉयड ओरियो सह सादर करण्यात आला आहे जो 64बिट आॅक्टा-कोर प्रोसेसर सोबत मीडियाटेक हेलीयो पी60 चिपसेट वर चालतो. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता याच्या फ्रंट पॅनल वर एआई टेक्निक म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजेंस असलेला 25-मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे, जो एआर स्टीकर ला सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे फोन च्या बॅक पॅनल वर एआई सीन रेक्ग्नेशन फीचर वाला 16-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा आहे.

ओपो एफ7 एक डुअल ​सिम स्मार्टफोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोन च्या बॅक पॅनल वर फिंंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर एआई असिस्टेंट मुळे या फोन मध्ये फेस अनलॉक टेक्निक पण आहे. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह ओपो एफ7 मध्ये पावर बॅकअप साठी 3,400एमएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

ओपो एफ7 चा रिव्यू वाचण्यासाठी इथे क्लिक करा

The post 3,000 रुपये स्वस्त झाला ओपो चा नॉच डिस्प्ले आणि 6जीबी रॅम वाला स्मार्टफोन एफ7 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-f7-price-cut-with-rs-3000-6gb-ram-notch-display-in-marathi/feed/ 0