OPPO Find X3 Lite - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 12 Mar 2021 09:50:32 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 32MP सेल्फी कॅमेर्‍यासह OPPO Find X3 Lite झाला लॉन्च, Xiaomi-Realme ला मिळेल टक्कर https://www.91mobiles.com/marathi/oppo-find-x3-lite-launch-with-64mp-camera-snapdragon-765g-soc-price-specification/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-find-x3-lite-launch-with-64mp-camera-snapdragon-765g-soc-price-specification/#respond Fri, 12 Mar 2021 09:50:32 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10314 मोस्ट अफोर्डेबल फोन Oppo Find X3 Lite ची डिजाइन पाहता हा काहीसा Find X3 Neo सारखा वाटतो.

The post 32MP सेल्फी कॅमेर्‍यासह OPPO Find X3 Lite झाला लॉन्च, Xiaomi-Realme ला मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Oppo बद्दल अनेक दिवसांपासुन बातमी समोर येत होती कि कंपनी आपली नवी Oppo Find X3 series लॉन्च करण्याची तयारी करत आहे. कंपनीने आता ही सीरीज जागतिक स्तरावर सादर केली आहे. ओपो फाइंड एक्स 3 सीरीज मध्ये 3 हँडसेट आले आहेत. ज्यात, Oppo Find X3 Pro 5G, Oppo Find X3 Neo 5G आणि Oppo Find X3 Lite 5G चा समावेश आहे. या तिन्ही फोन्सपैकी फाइंड एक्स3 लाइट लो बजेट कॅटगरीत सादर करण्यात आला आहे.

OPPO Find X3 Lite ची डिजाइन
या सीरीज मधील मोस्ट अफोर्डेबल फोन Oppo Find X3 Lite ची डिजाइन पाहता हा काहीसा Find X3 Neo सारखा वाटतो. पण यात कर्व्ड ऐज डिस्प्ले देण्यात आला नाही. हा फोन पण कंपनीने होल-पंच डिस्प्लेसह सादर केला आहे. तसेच फोनच्या मागे आयताकृती कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. मॉड्यूल मध्ये चार कॅमेरे आहेत.

OPPO Find X3 Lite चे स्पेसिफिकेशन्स
डिजाइनव्यतिरिक्त फोन मध्ये 6.44-इंचाचा फुल-एचडी+ (1,080×2,400) AMOLED फ्लॅट डिस्प्लेसह कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3+ सह 90Hz रिफ्रेश रेट आहे. तसेच फोन मध्ये Snapdragon 765G SoC सह 8GB रॅम व 128GB स्टोरेज आहे.

Oppo Find X3 Lite मध्ये फोटोग्राफीसाठी 64-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा (f / 1.79 अपर्चर, EIS), 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-एंगल सेंसर (f / 2.25 अपर्चर, EIS) आणि दोन 2-मेगापिक्सलचे मॅक्रो आणि डेप्थ सेंसर आहेत. तसेच फ्रंटला, लाइट मॉडेल मध्ये 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असेल, ज्याचा अपर्चर f / 2.4 आहे.

पावर बॅकअपसाठी फाइंड एक्स 3 लाइट मध्ये 65W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,300mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरची सुविधा आहे आणि कनेक्टिविटी ऑप्शन म्हणून फोन मध्ये 5 जी, यूएसबी टाइप-सी पोर्ट, ब्लूटूथ 5.1 आणि इतर अनेक गोष्टींचा समावेश आहे.

किंमत
Oppo Find X3 Series मध्ये कंपनीने फक्त Oppo Find X3 Pro च्या किंमतीचा खुलासा केला आहे. सध्या Oppo Find X3 Lite आणि Oppo Find X3 Neo च्या किंमतींची घोषणा करण्यात आली नाही. सध्या या सीरीजचा ग्लोबल लॉन्च झाला आहे. आशा आहे की कंपनी लवकरच भारतात पण ही सीरीज सादर करू शकते.

The post 32MP सेल्फी कॅमेर्‍यासह OPPO Find X3 Lite झाला लॉन्च, Xiaomi-Realme ला मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-find-x3-lite-launch-with-64mp-camera-snapdragon-765g-soc-price-specification/feed/ 0