Oppo K7 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 29 Oct 2020 14:01:56 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 5G सपोर्ट आणि या दमदार फीचर्स सह 4 नोव्हेंबरला येत आहे Oppo K7x https://www.91mobiles.com/marathi/oppo-k7x-to-launch-on-november-4/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-k7x-to-launch-on-november-4/#respond Thu, 29 Oct 2020 14:01:56 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8724 PERM00 बद्दल माहिती समोर आली होती कि यात Full HD+ 6.5-इंचाची होल स्क्रीन दिली जाईल, जिचे स्क्रीन रिजोल्यूशन 1080 x 2400 पिक्सल असेल.

The post 5G सपोर्ट आणि या दमदार फीचर्स सह 4 नोव्हेंबरला येत आहे Oppo K7x first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Oppo ने यावर्षी ऑगस्ट मध्ये आपली K सीरीज वाढवत Oppo K7 5G टेक मार्केट मध्ये सादर केला होता. हा मिड-रेंज स्मार्टफोन कंपनीने कोणत्याही इवेंटविना चुपचाप आपल्या घरच्या मार्केट मध्ये लॉन्च केला होता. तसेच आता कंपनी के-सीरीज मध्ये एक नवीन फोन आणण्याची तयारी करत आहे. OPPO ने याची माहिती वीबो वर दिली आहे कि 4 नोव्हेंबरला कंपनी OPPO K7x सादर करेल. K7x सध्या चायनाच्या अनेक रिटेलर्स साइट वर लिस्ट आहे. बोलले जात आहे कि हा फोन OPPO K7 चा छोटा वर्जन असेल.

कंपनीने शेयर केलेल्या टीजर मध्ये OPPO K7x ची रियर डिजाइन काही प्रमाणात Oppo K7 प्रमाणेच वाटत आहे. तर दुसरीकडे आशा व्यक्त केली जात आहे कि हा फोन OPPO PERM00 मॉडेल नंबर असलेला स्मार्टफोनच असेल जो काही दिवसांपूर्वी हा फोन चायनीज सर्टिफिकेशन साइट टेना वर स्पॉट झाला होता.

PERM00 बद्दल माहिती समोर आली होती कि यात Full HD+ 6.5-इंचाची होल स्क्रीन दिली जाईल, जिचे स्क्रीन रिजोल्यूशन 1080 x 2400 पिक्सल असेल. तसेच यात 2GHz ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला जाईल. फोन मध्ये 8GB रॅम आणि 256GB की स्टोरेज दिली जाईल. इतकेच नव्हे तर फोन मध्ये स्टोरेज वाढवण्यासाठी माइक्रोएसडी कार्ड स्लॉटचा ऑप्शन आहे. तसेच सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी फोन मध्ये 16-मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा असेल. तसेच मागे 48-मेगापिक्सल + 8-मेगापिक्सल + 2-मेगापिक्सल + 2-मेगापिक्सलचा क्वाड कॅमेरा सेटअप असेल.

Oppo K7 5G चे स्पेसिफिकेशन्स

Oppo K7 5G च्या स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर यात 6.4-इंचाचा फुल एचडी+ एमोलेड पॅनल वॉटरड्रॉप नॉच सह देण्यात आला आहे. फोन फक्त 7.97mm जाड आहे. तसेच OPPO K7 5G मध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 765G 5G मोबाईल प्लॅटफॉर्म देण्यात आला आहे. फोन मध्ये 8GB रॅम सह 128GB आणि 256GB ची स्टोरेज देण्यात आली आहे.

हे देखील वाचा : 5,000एमएएच बॅटरी, ट्रिपल कॅमेरा आणि 90हर्ट्ज पंच-होल डिस्प्ले असलेला स्वस्त स्मार्टफोन OPPO A33 भारतात लॉन्च

तसेच OPPO K7 5G मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअप मध्ये 48 मेगापिक्सलची प्राइमरी लेंस, 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड लेंस 2 मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंटला 32 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

OPPO K7 5G लेटेस्ट अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टम वर चालतो जो कंपनीच्या इन-हाउस ColorOS स्किन वर बेस्ड आहे. तसेच फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 4,025mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 30W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. डिवाइस मध्ये 3.5mm हेडफोन जॅक देण्यात आला आहे.

The post 5G सपोर्ट आणि या दमदार फीचर्स सह 4 नोव्हेंबरला येत आहे Oppo K7x first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-k7x-to-launch-on-november-4/feed/ 0