OPPO RENO 10X Zoom Edition - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 28 May 2019 10:07:34 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 सर्वात वेगळ्या सेल्फी कॅमेरा डिजाइन सह भारतात आला Oppo Reno, 10X झूम सह आहेत हे शानदार फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-and-reno-10x-zoom-launched-in-india-know-price/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-and-reno-10x-zoom-launched-in-india-know-price/#respond Tue, 28 May 2019 10:06:42 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4424 Oppo Reno स्टँडर्ड वर्जनच्या 8जीबी रॅम आणि 256जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 32,990 रुपये आहे.

The post सर्वात वेगळ्या सेल्फी कॅमेरा डिजाइन सह भारतात आला Oppo Reno, 10X झूम सह आहेत हे शानदार फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनी कंपनी Oppo ने काही दिवसांपूर्वी आपल्या नवीन सीरीज Reno चा स्मार्टफोन चीन मध्ये लॉन्च केला होता, जो आज भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आला आहे. Reno सीरीज स्मार्टफोन मध्ये कंपनीने OPPO Reno स्टँडर्ड वेरिएंट सोबत Reno 10x Zoom एडिशन सादर केला आहे.

OPPO Reno स्टँडर्ड वर्जन कंपनीने क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 710 SoC आणि Reno 10x Zoom एडिशन क्वॉलकॉमच्या लेटेस्ट टॉप-नॉच स्नॅपड्रॅगॉन 855 प्रोसेसर सह सादर केला आहे. दोन्ही स्मार्टफोन मध्ये ऑल-स्क्रीन, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर व wedge-शेप (शार्क फिन पॉप-अप) पॉप-अप सेल्फी कॅमेरा आहे.

किंमत आणि उपलब्धता
किंमतीबद्दल बोलायचे झाले तर Oppo Reno 10X Zoom एडिशन 6जीबी रॅम व 128जीबी 39,990 रुपये आणि 8जीबी रॅम व 256जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 49,990 रुपये आहे. तसेच Oppo Reno स्टँडर्ड वर्जनच्या 8जीबी रॅम आणि 256जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 32,990 रुपये आहे. तसेच फोन ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट वर सेल केला जाईल.

सर्वात खास आहे कॅमेरा डिजाइन
दोन्ही फोन मध्ये फुल व्यू डिस्प्ले देण्यात आली आहे आणि सेल्फी कॅमेऱ्याच्या जागी एक वेगळ्या डिजाइनचा पॉप-अप कॅमेरा दिला आहे. या नवीन कॅमेऱ्याला ‘शार्क फिन पॉपअप’ नाव देण्यात आले आहे. आता पर्यंत पॉप-अप कॅमेरा चौकोनी आकारात दिले जात होते जो फोन बॉडी बाहेर येतो. पण ओपो रेनोचा पॉप-अप कॅमेरा पण खूप वेगळा आहे. हा पॉप-अप कॅमेरा त्रिकोणी आकारात आहे तसेच वरच्या पॅनल वर लांब स्लाइड वर दिला गेला आहे. सेल्फी कमांड देताच हा एका बाजूने वर येतो आणि याच बाजूला कॅमेरा सेंसर आहे.

OPPO Reno 10x Zoom एडिशन स्पेसिफिकेशन
OPPO Reno 10x Zoom वेरिएंट बद्दल बोलायचे तर यात 6.6-इंचाचा एमलोड डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रेजोल्यूशन 2,340 x 1,080 पिक्सल आहे आणि यात कोर्निंग गोरिल्ला ग्लास 6 टॉप देण्यात आला आहे. सोबत फोन मध्येतीन कॅमेरा देण्यात आले आहेत. फोनच्या मागे 48एमपी प्राइमरी सेंसर एफ/1.7 अपर्चर, 8एमपी एफ/2.2 सेकंडरी शूटर आणि 13एमपी एफ/3.0 थर्ड स्नॅपर आहे. तसेच सेल्फी साठी फोन मध्ये 16-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. एंडरॉयड पाई आधारित हा फोन कलरओएस 6 वर चालतो आणि हा क्वालकॉमच्या सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 वर सादर केला गेला आहे. पावर बॅकअप साठी हा फोन वीओओसी 3.0 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह 4,065एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो.

तसेच फोन मध्ये 6जीबी / 8जीबी रॅम सह 128जीबी / 256जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. कननेक्टिविटी ऑप्शन साठी फोन मध्ये 4जी एलटीई, डुअल सिम स्लॉट, डुअल बॅंड वाई-फाई, ब्लूटूथ 5.0, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि ए-जीपीएस आहे.

ओपो रेनो च्या स्टँडर्ड वर्जन चे स्पेसिफिकेशन
Oppo Reno च्या स्टँडर्ड मॉडेल बद्दल बोलायचे तर या फोन मध्ये 6.4-इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले आहे जो पूर्णपणे बेजल लेस आहे. यात तुम्हाला कोणतीही नॉच मिळणार नाही. याचा सेल्फी कॅमेरा सर्वात वेगळा आहे. पॉपअप आहे पण तिरक्या स्टाइल मध्ये उघडतो. फोन मध्ये सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी 16-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. सोबत 48-मेगापिक्सल (आईएमएक्स586) + 5-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आहे जो एआई सह येतो.

हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट वर चालतो. एंडरॉयड 9 पाई आधारित हा फोन कलर ओएस 9 वर चालतो. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,765 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीने हा 6जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज सह सादर केला आहे. तसेच याचा एक 8जीबी रॅम वाला मॉडेल आहे जो 256जीबी स्टोरेज सह येतो.

The post सर्वात वेगळ्या सेल्फी कॅमेरा डिजाइन सह भारतात आला Oppo Reno, 10X झूम सह आहेत हे शानदार फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-and-reno-10x-zoom-launched-in-india-know-price/feed/ 0
8जीबी रॅम आणि स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट सह लॉन्च झाला हा अनोखा रेनो फोन, फोटो बघून व्हाल हैराण https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-10x-zoom-edition-launch-shark-fin-pop-up-snapdragon-855-module-specifications-price/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-10x-zoom-edition-launch-shark-fin-pop-up-snapdragon-855-module-specifications-price/#respond Wed, 10 Apr 2019 12:06:20 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4056 कंपनी ने याला ‘शार्क फिन पॉप-अप’ नाव दिले आहे.

The post 8जीबी रॅम आणि स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट सह लॉन्च झाला हा अनोखा रेनो फोन, फोटो बघून व्हाल हैराण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जेव्हापासुन ओपो ने घोषणा केली होती कि कंपनी रियलमी नंतर अजून एक नवीन सब-ब्रँड ‘ओपो रेनो’ नावाने घेऊन येत आहे तेव्हा पासून संपूर्ण टेक विश्व या नवीन सीरीजच्या लॉन्चची वाट बघत आहे. वेळोवेळी रेनो संबधीत लीक समोर येत होते, ज्यात ब्रँडच्या आगामी स्मार्टफोनची माहिती मिळत होती. आज या तमाम लीक्स व गॉसिपना पूर्णविराम देत ओपो ने रेनो टेक मंचावर सादर केला आहे. या नवीन ब्रँड अंतर्गत ओपो रेनो आणि ओपो रेना 10एक्स झूम एडिशन नावाने दोन फोन लॉन्च केले गेले आहेत. यात ओपो रेनो 10एक्स ब्रँडचा हाईएंड फोन आहे जो फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये लॉन्च झाला आहे. चला एक नजर टाकूया ओपो रेनो 10एक्स झूम एडिशनच्या लुक, डिजाईन व फीचर्स तसेच स्पेसिफिकेशन्स वर :

ओपो रेनो डिजाईन
ओपो रेनो फक्त दमदार स्पेसिफिकेशन्स सह येत नाही तर खूप ओनोख्या आणि शानदार डिजाईन वर पण बनला आहे. साधारणता पॉप-अप सेल्फी कॅमेरा किंवा या स्लाईड पॅनल फोनच मार्केट मध्ये आले आहेत. पण ओपो रेनो कंपनीने खूप खास पॉप अप डिजाईन वर बनवला आहे. हा फोन फुल बेजल लेस डिस्प्ले वर बनला आहे ज्यात कोणताही पंच होल किंवा नॉच देण्यात आली नाही. या फोनचा सेल्फी कॅमेरा एक पॉप-अप मॉड्यूल मध्ये फिट आहे. हा कॅमेरा सेल्फी कमांड देताच वर येतो. साधारणतः पॉप-अप कॅमेरा चौकोनी आकाराचा असतो पण ओपो रेनो चा पॉप-अप कॅमेरा त्रिकोणी आकाराचा आहे जो एका बाजूने वर येतो. याच बाजूवर कॅमेरा सेंसर आहे. कंपनी ने याला ‘शार्क फिन पॉप-अप’ नाव दिले आहे.

ओपो रेनो च्या डिस्प्ले खाली इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो बॅक पॅनल वर मधोमध वर्टिकल शेप मध्ये आहे. कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लॅश लाईट आहे तसेच त्याखाली ओपोचा लोगो आणि टॅगलाईन आहे. ओपो रेनो च्या उजव्या पॅनल वर पावर बटण देण्यात आले आहे तसेच डाव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आहे. स्पीकर, 3.5एमएम जॅक तसेच यूएसबी टाईप-सी पोर्ट फोनच्या खालील पॅनल वर देण्यात आला आहे.

कॅमेऱ्याची खूबी
नावावरूनच समजते कि या फोनचा कॅमेरा सेटअप 10एक्स झूम च्या नवीन टेक्नॉलॉजी सह येतो. या टेक्नॉलॉजी मुळे ओपो रेनो च्या या एडिशन मध्ये 16एमएम पासून 160एमएम पर्यंतची फोकल लेंथ मिळते ज्यामुळे लांबच्या आब्जेक्ट चा फोटो पण स्पष्ट दिसतो तसेच नाइज फ्री कॅप्चर होतो. हा कॅमेरा सेटअप हाइब्रिड ऑप्टिकल ईमेज स्टेबलाईजेशन (OIS) सोबत सुपरक्लियन नाइट मोड फीचरला पण सपोर्ट करतो.

ओपो रेनो 10एक्स झूम एडिशनच्या बॅक पॅनल वर 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सोनी आईएमएक्स586 सेंसर देण्यात आला आहे. फोनचा दुसरा कॅमेरा सेंसर 8-मेगापिक्सलचा आहे जी 120डिग्री अल्ट्रा वाइड एंगल लेंस आहे. तसेच बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे. सेल्फी साठी ओपो रेनो च्या या ​एडिशन मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे.

स्पेसिफिकेशन्स
ओपो रेनो 10एक्स झूम एडिशन 93.1 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियोला सपोर्ट करतो. या फोन मध्ये 6.65-इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे जो गोरिल्ला ग्लास 6 ने प्रोटेक्टेड आहे. फोनच्या स्क्रीन वर इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे. कंपनीने हा फोन एंडरॉयड पाई आधारित कलरओएस 6 वर सादर केला आहे जो क्वालकॉमच्या सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 वर चालतो.

ओपो रेनो चा हा एडिशन कंपनी द्वारा दोन रॅम वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे जे 8जीबी रॅम तसेच 6जीबी रॅमला सपोर्ट करतात. तसेच या वेरिएंट्स मध्ये 128जीबी मेमरी आणि 256जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. ओपो रेनो 10एक्स झूम एडिशन मध्ये डुअल फ्रिक्वेंसी जीपीएस व एनएफसी सारखे फीचर्स आहेत. चांगल्या गेमिंगसाठी या फोन मध्ये गेम बूस्ट 2.0 टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे तसेच पावर बॅकअप साठी हा फोन वीओओसी 3.0 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह 4,065एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो.

किंमत
6जीबी रॅम व 128जीबी मेमरी = 3,999 युआन (जवळपास 41,000 रुपये)
6जीबी रॅम व 256जीबी मेमरी = 4,499 युआन (जवळपास 46,000रुपये)
8जीबी रॅम व 256जीबी मेमरी = 4,799 युआन (जवळपास 51,000 रुपये)

The post 8जीबी रॅम आणि स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट सह लॉन्च झाला हा अनोखा रेनो फोन, फोटो बघून व्हाल हैराण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-10x-zoom-edition-launch-shark-fin-pop-up-snapdragon-855-module-specifications-price/feed/ 0