Oppo Reno 4 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 31 Jul 2020 10:25:09 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 5 कॅमेरे असलेला Oppo Reno 4 Pro भारतात झाला लॉन्च, यात आहे 8GB रॅम आणि जबरदस्त फास्ट चार्जिंग https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno4-pro-launched-in-india-with-90hz-amoled-display-65w-fast-charging-know-price-sale-on-flipkart-amazon-india/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno4-pro-launched-in-india-with-90hz-amoled-display-65w-fast-charging-know-price-sale-on-flipkart-amazon-india/#respond Fri, 31 Jul 2020 10:25:09 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7728 Oppo Reno 4 Pro च्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 34,990 रुपये आहे.

The post 5 कॅमेरे असलेला Oppo Reno 4 Pro भारतात झाला लॉन्च, यात आहे 8GB रॅम आणि जबरदस्त फास्ट चार्जिंग first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Oppo ने गेल्या महिन्यात आपल्या घरच्या मार्केट चीन मध्ये Reno 4 सीरीज सादर केली होती. या सीरीज मध्ये Reno 4 आणि Reno 4 Pro चा समावेश होता जे 5G कनेक्टिविटी सह क्वालकॉमच्या Snapdragon 765G चिपसेट वर लॉन्च झाले होते. आज कंपनीने या स्मार्टफोन्स पैकी Reno 4 Pro भारतात लॉन्च केला आहे. ऑनलाइन आयोजित केल्या गेलेल्या इवेंट मध्ये कंपनीने Reno 4 सीरीज मधील Reno 4 Pro केला गेला आहे. या इवेंट मध्ये ओप्पो वॉच पण लॉन्च केला गेला आहे.

डिजाइन

फोनच्या डिजाइन बद्दल बोलायचे तर यात सिंगल पंच-होल डिस्प्ले देण्यात आली आहे. स्क्रीनच्या डावीकडे कट आउट मिळतो आणि हा 3D बॉर्डरलेस स्क्रीन सह येतो. तसेच फोन मध्ये एक सिम स्लॉट आणि एक यूएसबी सी पोर्ट व्यतिरिक्त खालच्या पॅनल मध्ये एक्स्टर्नल स्पीकर पण देण्यात आला आहे. फोनच्या उजव्या पॅनल मध्ये पावर बटन आणि डाव्या मध्ये वॉल्यूम रॉकर बटन आहे. तसेच फोनच्या मागे क्वाड कॅमेरा सेटअप आहे जो कि वर्टिकल शेप मध्ये आहे.

कॅमेरा

Oppo Reno 4 Pro मध्ये एकूण 5 कॅमेरे आहेत. डिवाइसच्या मागील कॅमेरा सेटअप मध्ये 48-मेगापिक्सल (f/1.7) Sony IMX586 चा प्राइमरी कॅमेरा सेंसर, 8-मेगापिक्सलचा (f/2.2) अल्ट्रावाइड सेंसर, 2-मेगापिक्सलचा मोनो सेंसर आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर आहे. तर वीडियो कॉलिंग आणि सेल्फी साठी यात 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा सेटअप आहे.

स्पेसिफिकेशन्स

रेनो 4 प्रो चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.4-इंचाचा फुल-एचडी+ (1080×2400 पिक्सल) एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन मधील डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट, 20:9 आसपेक्ट रेश्यो आणि 402ppi सह येतो. इंडियन मॉडेल मध्ये कंपनीने स्नॅपड्रॅगॉन 765जी चिपसेट दिला आहे, ज्या सोबत 8 जीबी रॅम मिळेल. फोन मध्ये 128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे.

बॅटरी बॅकअप साठी फोन मध्ये 4,000mAh च्या बॅटरीचा समावेश आहे जी 65W SuperVOOC 2.0 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येते. या टेक्नॉलॉजीमुळे फक्त 36 मिनिटांत डिवाइस पूर्णपणे चार्ज केला जाऊ शकतो असा दावा कंपनीने केला आहे.

कंपनीने या स्मार्टफोन मध्ये वाई-फाई, 5जी नेटवर्क, 4G VoLTE, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी पोर्ट टाइप-सी सारखे फीचर्स दिले आहेत. तसेच स्मार्टफोन Android 10 वर आधारित ColorOS 7.2 ऑपरेटिंग सिस्टम सह येईल. फोन Starry Night आणि Silky White कलर ऑप्शन मध्ये सादर केला गेला आहे.

किंमत

Oppo Reno 4 Pro च्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 34,990 रुपये आहे. सध्या डिवाइस एकच रॅम व स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे. या फोनची विक्री 5 ऑगस्टला अमेझॉन इंडिया आणि फ्लिपकार्ट समवेत अनेक मोठ्या ऑनलाइन रिटेल स्टोर्स वर केली जाईल. डिवाइस सोबत अनेक ऑफर्स पण देण्यात आल्या आहेत.

ओपो रेनो 4 प्रो वीडियो

The post 5 कॅमेरे असलेला Oppo Reno 4 Pro भारतात झाला लॉन्च, यात आहे 8GB रॅम आणि जबरदस्त फास्ट चार्जिंग first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno4-pro-launched-in-india-with-90hz-amoled-display-65w-fast-charging-know-price-sale-on-flipkart-amazon-india/feed/ 0