Oppo Reno 4F - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 15 Oct 2020 14:24:19 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 6 कॅमेरा आणि स्लीक डिजाइन सह आला दमदार Oppo Reno 4F स्मार्टफोन, Xiaomi ला देईल आव्हान https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-4f-launched-with-mediatek-helio-p95-soc-dual-selfie-cameras-know-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-4f-launched-with-mediatek-helio-p95-soc-dual-selfie-cameras-know-price-specifications/#respond Thu, 15 Oct 2020 14:24:19 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8539 Oppo Reno 4F मध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो पी95 चिपसेट देण्यात आला आहे जो IMG 9XM-HP8 जीपीयू सह येतो.

The post 6 कॅमेरा आणि स्लीक डिजाइन सह आला दमदार Oppo Reno 4F स्मार्टफोन, Xiaomi ला देईल आव्हान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Oppo ने आपली Reno सीरीज वाढवत एक नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Reno 4F नावाने हा फोन ओप्पोने इंडोनेशियन मार्केट मध्ये लॉन्च केला आहे. दिसायला फोन हुबेहूब Oppo F17 Pro प्रमाणेच दिसतो. पण फीचर्सच्या बाबतीत या फोन मध्ये थोडा बदल दिसेल. ओप्पो एफ17 प्रो फोन ओप्पोने सप्टेंबरच्या सुरवातीला भारतात लॉन्च केला गेला होता. ओप्पो रेनो 4एफ पाहता यात सिंगल रॅम आणि स्टोरेज कॉन्फिगरेशन मिळतो.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

फोन मध्ये तुम्हाला फ्रंटला डुअल सेल्फी कॅमेरा आणि मागे क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळतो. सेल्फी कॅमेरा होल-पंच कटआउट मध्ये आहे. फोन मध्ये बॉटमला जाड चिन आहे आणि वरच्या बाजूला एक समान बेजल्स आहेत. फोनचे डायमेंशन 160.14×73.77×7.48 एमएम आणि वजन 164 ग्राम आहे. तसेच फोन मध्ये 6.43-इंचाचा फुल-एचडी+ (1,080×2,400 पिक्सल) एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यात 180Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 90.67 टक्के स्क्रीन टू बॉडी रेशियो आहे. स्क्रीन 409 पीपीआई पिक्सल डेंसिटी सह येते.

फोटोग्राफीसाठी Oppo Reno 4F मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात अपर्चर एफ/1.7 सह 48-मेगापिक्सलचा सॅमसंग GM1ST प्राइमरी सेंसर, एफ/2.2 अपर्चर सह 8-मेगापिक्सलचा सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर सह दोन 2-मेगापिक्सल मोनो कॅमेरा सेंसर आहे. तसेच सेल्फीसाठी फ्रंटला एफ/2.4 लेंस सह 16-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि एफ/2.4 लेंस सह 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आहे.

Oppo Reno 4F मध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो पी95 चिपसेट देण्यात आला आहे जो IMG 9XM-HP8 जीपीयू सह येतो. तसेच यात 8 जीबी एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 128 जीबी यूएफएस 2.1 स्टोरेज मिळते.

कनेक्टिविटीसाठी डुअल-बॅंड वाई-फाई, ब्लूटूथ 5.1, 3.5 एमएम हेडफोन जॅक, जीपीएस / ए-जीपीएस, ग्लोनास आणि चार्जिंगसाठी एक यूएसबी टाइप-सी पोर्टचा समावेश आहे. फोन मध्ये 4,000mAh ची बॅटरी आहे, जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

किंमत

ओप्पो रेनो 4एफ फक्त 8 जीबी + 128 जीबी वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे आणि याची किंमत IDR 4,299,000 (जवळपास 21,400 रुपये) आहे. फोन दोन कलर ऑप्शन – मॅट ब्लॅक आणि मॅटेलिक व्हाइट मध्ये सादर केला गेला आहे. हा फोन भारतात किंवा इतर मार्केट मध्ये लॉन्च करण्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

The post 6 कॅमेरा आणि स्लीक डिजाइन सह आला दमदार Oppo Reno 4F स्मार्टफोन, Xiaomi ला देईल आव्हान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-4f-launched-with-mediatek-helio-p95-soc-dual-selfie-cameras-know-price-specifications/feed/ 0