OPPO Reno 5Z - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 03 Mar 2021 15:00:32 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 OPPO घेऊन येत आहे अजून एक नवीन 5G फोन Reno 5Z, मोठी बॅटरी आणि पावरफुल प्रोसेसरसह होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-5z-5g-fcc-listing-specs-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-5z-5g-fcc-listing-specs-leaked/#respond Wed, 03 Mar 2021 15:00:32 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10255 OPPO Reno 5Z एफसीसी वर CPH2211 मॉडेल नंबरसह लिस्ट केला गेला आहे. या सर्टिफिकेशन मध्ये सांगण्यात आले आहे कि ओपो रेनो 5झेड स्मार्टफोन अँड्रॉइड 11 वर लॉन्च होईल आणि कलरओएस वी11.1 वर काम करेल.

The post OPPO घेऊन येत आहे अजून एक नवीन 5G फोन Reno 5Z, मोठी बॅटरी आणि पावरफुल प्रोसेसरसह होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO ने गेल्यावर्षी सप्टेंबर मध्ये OPPO Reno 4Z स्मार्टफोन सादर केला होता जो 8 जीबी रॅम आणि मीडियाटेक डायमनसिटी 800यू चिपसेटसह आला होता. आता बातमी येत आहे कि कंपनी या फोनचा अपग्रेडेड वर्जन पण घेऊन येण्याची तयारी करत आहे जो OPPO Reno 5Z नावाने लॉन्च केला जाईल. ओपोने आतापर्यंत या फोनची माहिती दिली नाही पण लॉन्चच्याआधी ओपो रेनो 5झेड अमेरिकन सर्टिफिकेशन्स साइट एफसीसीवर लिस्ट झाला आहे. (oppo reno 5z 5g fcc listing specs leaked)

OPPO Reno 5Z एफसीसी वर CPH2211 मॉडेल नंबरसह लिस्ट केला गेला आहे. या सर्टिफिकेशन मध्ये सांगण्यात आले आहे कि ओपो रेनो 5झेड स्मार्टफोन अँड्रॉइड 11 वर लॉन्च होईल आणि कलरओएस वी11.1 वर काम करेल. फोनचे डायमेंशन 160.1×73.4×7.8एमएम आणि वजन 175 ग्राम सांगण्यात आले आहे. तसेच लिस्टिंगमध्ये शेयर करण्यात आलेल्या फोटोवरून समजले आहे कि रेनो 5झेड ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल जो बॅक पॅनलवर डावीकडे चौकोनी आकारात दिला जाईल.

ओपो रेनो 5झेड एफसीसीवर 4,310एमएएचची बॅटरी असल्याचे दाखवण्यात आला आहे त्याचबरोबर फोनमध्ये 30वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट असल्याचे समजले आहे. सर्टिफिकेशनने स्पष्ट केले आहे कि OPPO Reno 5Z 5G फोन असेल आणि डुअल मोड 5जी कनेक्टिविटीला सपोर्टसह मार्केट मध्ये येईल. फोनच्या ठोस स्पेसिफिकेशन्स आणि लॉन्च संबंधित माहितीसाठी कंपनीच्या घोषणेची वाट बघावी लागले.

OPPO Reno 4Z

ओपो रेनो 4झेड पाहता हा स्मार्टफोन 20:9 आस्पेक्ट रेशियोवर लॉन्च झाला होता जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3+ प्रोटेक्टेड 1080 x 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.57 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेला सपोर्ट करतो. मार्केटमध्ये या फोनने 8 जीबी रॅमसह आला होता जो मीडियाटेक डायमनसिटी 800यू चिपसेटवर चालतो. फोन मध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज आहे.

oppo-reno-5

फोटोग्राफीसाठी ओपो रेनो 4झेड 48मेगापिक्सल प्राइमरी सेंसर असलेल्या क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि इतर दोन 2 मेगापिक्सल सेंसर देण्यात आले आहेत. तसेच सेल्फीसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सल डुअल फ्रंट कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. OPPO Reno 4Z 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या 4,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.

The post OPPO घेऊन येत आहे अजून एक नवीन 5G फोन Reno 5Z, मोठी बॅटरी आणि पावरफुल प्रोसेसरसह होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-5z-5g-fcc-listing-specs-leaked/feed/ 0