OPPO Reno4 SE 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 21 Sep 2020 16:21:14 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 OPPO Reno4 SE 5G झाला लॉन्च, यात आहे 8 जीबी रॅम, 32 एमपी सेल्फी कॅमेरा आणि 65W SuperVOOC टेक्नॉलॉजी https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno4-se-5g-launched-32-mp-selfie-65w-supervooc-specs-price/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno4-se-5g-launched-32-mp-selfie-65w-supervooc-specs-price/#respond Mon, 21 Sep 2020 16:21:14 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8246 आपल्या ‘रेनो 4 सीरीज’ चा विस्तार करत अजून एक आणि नवीन स्मार्टफोन OPPO Reno4 SE 5G लॉन्च केला आहे.

The post OPPO Reno4 SE 5G झाला लॉन्च, यात आहे 8 जीबी रॅम, 32 एमपी सेल्फी कॅमेरा आणि 65W SuperVOOC टेक्नॉलॉजी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO ने आज टेक मार्केट मध्ये आपल्या ‘रेनो 4 सीरीज’ चा विस्तार करत अजून एक आणि नवीन स्मार्टफोन OPPO Reno4 SE 5G लॉन्च केला आहे. हा फोन 5जी कनेक्टिविटी सह येतो जो सध्या ओपोच्या होम मार्केट म्हणजे चीन मध्ये आला आहे. OPPO Reno4, Reno4 Pro आणि Reno4 Pro Artist Limited Edition नंतर हा सीरीजचा चौथा स्मार्टफोन आहे. ओपो रेनो 4 एसई भारतीय बाजारात येईल कि नाही याबाबत आता काही बोलता येणार नाही.

OPPO Reno4 SE 5G

ओपो रेनो 4 एसई 5जी चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1080 x 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.43 इंचाच्या फुलएचडी+ एमोलेड पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.8 टक्के आहे तसेच फोनचा डिस्प्ले 60हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. ओपोने फोनची स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह सादर केली आहे.

OPPO Reno4 SE 5G अँड्रॉइड 10 वर लॉन्च झाला आहे जो कलरओएस 7.2 सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वर चालणारा मीडियाटेकचा डायमनसिटी 720 चिपसेट देण्यात आला आहे. चीनी मार्केट मध्ये हा फोन 8 जीबी रॅम सह लॉन्च झाला आहे जो 128 जीबी आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या दोन वेरिएंट्स मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता ओपो रेनो 4 एसई 5जी ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.7 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे ज्या सोबत एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रावाइड अँगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तसेच सेल्फीसाठी Reno4 SE मध्ये एफ/2.4 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

OPPO Reno4 SE 5G कंपनीने 65W SuperVOOC 2.0 Flash Charge टेक्नोलॉजी सह बाजारात आणला आहे जो पावर बॅकअपसाठी 4,300एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. कंपनीचा दावा आहे कि फोन फक्त 37 मिनिटांत फुल चार्ज केला जाऊ शकतो. या फोनचे डायमेंशन 160.5 x 73.5 x 7.85 एमएम आणि वजन 169 ग्राम आहे.

वेरिएंट्स व किंमत

OPPO Reno4 SE 5G variant चा बेस वेरिएंट 8 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत 2499 युआन म्हणजे भारतीय करंसीनुसार 27,000 रुपयांच्या आसपास आहे. तसेच फोनचा दुसरा वेरिएंट 2799 युआन म्हणजे जवळपास 30,000 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे आणि हा 8 जीबी रॅम सह 256 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. चीनी बाजारात हा फोन Super Flash Black, Super Flash White आणि Super Flash Blue कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे.

The post OPPO Reno4 SE 5G झाला लॉन्च, यात आहे 8 जीबी रॅम, 32 एमपी सेल्फी कॅमेरा आणि 65W SuperVOOC टेक्नॉलॉजी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno4-se-5g-launched-32-mp-selfie-65w-supervooc-specs-price/feed/ 0