Panasonic Eluga X1 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 04 Oct 2018 09:42:32 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 लॉन्च झाले पॅनासोनिक चे नॉच डिस्प्ले वाले फोन एलुगा एक्स1 आणि एलुगा एक्स1 प्रो, जाणून घ्या यांत काय खास आहे https://www.91mobiles.com/marathi/panasonic-eluga-x1-and-eluga-x1-pro-launched-india-feature-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/panasonic-eluga-x1-and-eluga-x1-pro-launched-india-feature-specifications-price-in-marathi/#respond Thu, 04 Oct 2018 09:42:32 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2365 पॅनासोनिक ने एलुगा एक्स1 22,990 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे तसेच एलुगा एक्स1 प्रो ची किंमत 26,990 रुपये ठेवण्यात आली आहे.

The post लॉन्च झाले पॅनासोनिक चे नॉच डिस्प्ले वाले फोन एलुगा एक्स1 आणि एलुगा एक्स1 प्रो, जाणून घ्या यांत काय खास आहे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी पॅनासोनिक ने आज इंडियन मार्केट मध्ये एक साथ दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. कंपनी ने एलुगा एक्स1 आणि एलुगा एक्स1 प्रो बाजारात आणले आहेत. नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्या सोबतच पॅनासोनिक ने आज नॉच डिस्प्ले वाल्या सेग्मेंट मध्ये पण एंट्री केली आहे. कंपनी चे हे दोन्ही स्मार्टफोन बेजल लेस नॉच डिस्प्ले सह सादर करण्यात आले आहेत जे लुक मध्ये खुप शानदार व आर्कषक आहे.

पॅनासोनिक एलुगा एक्स1 आणि एलुगा एक्स1 प्रो कंपनी ने 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस नॉच डिस्प्ले सह सादर केले आहेत. दोन्ही स्मार्टफोन स्टील यूनिबॉडी डिजाईन वर बनलेले आहेत तसेच यात 6.18-इंचाची मोठी स्क्रीन देण्यात आली आहे जी फुलएचडी+ रेज्ल्यूशन ला सपोर्ट करते. डिस्प्ले स्क्रॅच पासून वाचावा यासाठी कंपनी ने तो 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्ट केला आहे.

पॅनासोनिक एलुगा सीरीज चे नवीन फोन एंडरॉयड ओरियो सह सादर झाले आहेत जे आॅक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक हेलीयो पी60 चिपसेट वर चालतात. एलुगा एक्स1 कंपनी ने 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेज वर लॉन्च केला आहे तर एलुगा एक्स1 प्रो मध्ये 6जीबी रॅम सोबत 128जीबी मेमरी देण्यात आली आहे. दोन्ही स्मार्टफोन्सची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येते.

एलुगा एक्स1 आणि एलुगा एक्स1 प्रो फोटोग्राफी साठी डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतात. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 16-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हे दोन्ही फोन मॉडेल 16-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतात. फोटोग्राफी साठी या फोन मध्ये एआई टेक्नॉलजी आहे तसेच फोन मधील ब्यूटी फिल्टर्स व आर्कषक मोड फोटो अजून
शानदार करतात.

पॅनासोनिक एलुगा एक्स1 आणि एलुगा एक्स1 प्रो मध्ये 4जी व डुअल सिम सोबतच बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हे फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतात. त्याचप्रमाणे पावर बॅकअप साठी दोन्ही फोन मध्ये 3000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनी ने एलुगा एक्स1 प्रो मध्ये वायरलेस चार्जिंग सपोर्ट पण दिला आहे.

किंमत व उपलब्धता
पॅनासोनिक ने एलुगा एक्स1 22,990 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे तसेच एलुगा एक्स1 प्रो ची किंमत 26,990 रुपये ठेवण्यात आली आहे. हे फोन्स आॅनलाईन वेबसाइट सोबतच आॅफलाईन रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध होतील. पॅनासोनिक एलुगा एक्स1 व एलुगा एक्स1 प्रो सिल्वर तसेच ग्रे कलर मध्ये आगामी 10 ऑक्टोबर पासून विकत घेता येतील.

The post लॉन्च झाले पॅनासोनिक चे नॉच डिस्प्ले वाले फोन एलुगा एक्स1 आणि एलुगा एक्स1 प्रो, जाणून घ्या यांत काय खास आहे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/panasonic-eluga-x1-and-eluga-x1-pro-launched-india-feature-specifications-price-in-marathi/feed/ 0