Panasonic Eluga Z1 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 24 Oct 2018 09:45:46 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 पॅनासॉनिक एलुगा झेड1 प्रो लॉन्च, यात आहे 4,000एमएएच बॅटरी, 4जीबी रॅम, 6.19-इंचाचा नॉच डिस्प्ले आणि डुअल कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/panasonic-eluga-z1-and-z1-pro-launched-in-india-4000mah-battery-feature-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/panasonic-eluga-z1-and-z1-pro-launched-in-india-4000mah-battery-feature-specifications-price-in-marathi/#respond Wed, 24 Oct 2018 09:45:46 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2612 एलुगा झेड1 ची किंमत पॅनासॉनिक ने 14,490 रुपये ठेवली आहे तर एलुगा झेड1 प्रो 17,490 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

The post पॅनासॉनिक एलुगा झेड1 प्रो लॉन्च, यात आहे 4,000एमएएच बॅटरी, 4जीबी रॅम, 6.19-इंचाचा नॉच डिस्प्ले आणि डुअल कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
पॅनासॉनिकने याच महिन्यात इंडियन स्मार्टफोन बाजारात नॉच डिस्प्ले सेग्मेंट मध्ये एंट्री करत एलुगा एक्स1 आणि एलुगा एक्स1 प्रो स्मार्टफोन लॉन्च केले होते. पॅनासॉनिक एलुगा एक्स1 22,990 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला होता तर एलुगा एक्स1 प्रो 26,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे. तर आज हा सेग्मेंट एक्सपेंड करत पॅनासॉनिकने अजून दोन नवीन स्मार्टफोन एलुगा झेड1 आणि एलुगा झेड1 प्रो देशात लॉन्च केले आहेत.

पॅनासॉनिकने एलुगा झेड1 आणि एलुगा झेड1 प्रो 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला नॉच आहे. हे दोन्ही स्मार्टफोन 1500 X 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.19-इंचाच्या मोठ्या एचडी प्लस ​स्क्रीन सह बाजारात लॉन्च झाला आहे. पॅनासॉनिक एलुगा सीरीजचे नवीन स्मार्टफोन एंडरॉयड 8.1 ओरियो सह सादर झाला आहे जो मीडियाटेक हेलियो पी22 चिपसेट वर चालतो.

पॅनासॉनिक एलुगा झेड1 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेज सह सादर करण्यात आला आहे तर एलुगा झेड1 प्रो 4जीबी रॅम सोबत 64जीबी इंटरनल स्टोरेज सह लॉन्च करण्यात आला आहे. दोन्ही स्मार्टफोन्सची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 128जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता एलुगा झेड1 आणि झेड1 प्रो डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतात. फोन्सच्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचे दोन कॅमेरा सेंसर आहेत तर सेल्फी साठी फोनच्या फ्रंट पॅनल वर 8-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

पॅनासॉनिक एलुगा झेड1 आणि एलुगा झेड1 प्रो डुअल सिम फोन आहे जे 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतात. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच दोन्ही स्मार्टफोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तसेच एंडरॉयड ओरियो असल्यामुळे एलुगा झेड1 आणि झेड1 प्रो फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतात. पावर बॅकअप साठी पॅनासॉनिकने आपले दोन्ही स्मार्टफोन्स 4,000एमएएच च्या मोठ्या बॅटरी सह आणले आहेत.

एलुगा झेड1 ची किंमत पॅनासॉनिक ने 14,490 रुपये ठेवली आहे तर एलुगा झेड1 प्रो 17,490 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हे दोन्ही स्मार्टफोन ब्लॅक, गोल्ड आणि ब्लू कलर मध्ये सेल साठी उपलब्ध होतील. येत्या 31 ऑक्टबेरला पॅनासॉनिक एलुगा झेड1 आणि एलुगा झेड1 प्रो आॅनलाईन प्लॅटफॉर्म सह आॅफलाईन रिटेल स्टोर्स वरून पण विकत घेता येईल.

The post पॅनासॉनिक एलुगा झेड1 प्रो लॉन्च, यात आहे 4,000एमएएच बॅटरी, 4जीबी रॅम, 6.19-इंचाचा नॉच डिस्प्ले आणि डुअल कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/panasonic-eluga-z1-and-z1-pro-launched-in-india-4000mah-battery-feature-specifications-price-in-marathi/feed/ 0