POCO F6 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 30 Jun 2023 07:40:12 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 स्नॅपड्रॅगनच्या प्रोसेसरसह भारतात पुन्हा येतोय Samsung Galaxy S21 FE; बातमी आली समोर https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s21-fe-with-snapdragon-888-to-relaunch-soon-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s21-fe-with-snapdragon-888-to-relaunch-soon-in-india/#respond Fri, 30 Jun 2023 07:40:12 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21834 काही दिवसांपूर्वी Samsung Galaxy S23 FE ची डिजाईन समोर आली होती. हा फोन तिसऱ्या तिमाहीत ग्राहकांच्या भेटीला येईल अशी चर्चा देखील रंगली होती. परंतु आता आल्या आलेल्या बातमीनुसार Galaxy S23 FE हा एकमेव फॅन एडिशन नाही ज्यावर कंपनी काम करत आहे. टिपस्टर तरुण वत्सानं दिलेल्या माहितीनुसार सॅमसंग Galaxy S21 FE पुन्हा लाँच करण्याची तयारी करत […]

The post स्नॅपड्रॅगनच्या प्रोसेसरसह भारतात पुन्हा येतोय Samsung Galaxy S21 FE; बातमी आली समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Samsung Galaxy S21 FE नव्या प्रोसेसरसह येत आहे.
  • यावेळी Snapdragon 888 चिपसेटचा वापर केला जाऊ शकतो.
  • ह्या चिपसेटसह फोन युरोपमध्ये आला होता.

काही दिवसांपूर्वी Samsung Galaxy S23 FE ची डिजाईन समोर आली होती. हा फोन तिसऱ्या तिमाहीत ग्राहकांच्या भेटीला येईल अशी चर्चा देखील रंगली होती. परंतु आता आल्या आलेल्या बातमीनुसार Galaxy S23 FE हा एकमेव फॅन एडिशन नाही ज्यावर कंपनी काम करत आहे. टिपस्टर तरुण वत्सानं दिलेल्या माहितीनुसार सॅमसंग Galaxy S21 FE पुन्हा लाँच करण्याची तयारी करत आहे.

Samsung Galaxy S21 FE जुलैमध्ये पुन्हा येणार

तुम्हाला आठवत असेल की सॅमसंगनं Galaxy S21 FE गेल्यावर्षी जानेवारीमध्ये सादर केला होता. ह्या डिवाइसमध्ये कंपनीचा Exynos 2100 चिपसेट देण्यात आला होता. आता नवीन लिक्समधून समोर आलं आहे की भारतात पुन्हा नव्याने लाँच होणाऱ्या Galaxy S21 FE मध्ये स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट दिला जाईल.

वत्सनं माहिती दिली आहे की स्नॅपड्रॅगन चिपसेट असलेला Galaxy S21 FE स्मार्टफोन पुढील महिन्यात भारतात येईल. त्यानं सांगितलं आहे की ह्या हँडसेटची किंमत 40,000 रुपयांच्या असपास असेल. एस21 एफईच्या इतर स्पेसिफिकेशन्सची माहिती मात्र मिळाली नाही. त्यामुळे ह्यात चिपसेट व्यतिरिक्त इतर बदल दिसणार नाहीत असं अपेक्षित आहे.

Samsung Galaxy S21 FE चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : सॅमसंग गॅलेक्सी एस21 एफई स्मार्टफोन 6.4 इंचाच्या फुलएचडी+ डायनॉमिक अ‍ॅमोलेड 2के डिस्प्लेवर लाँच करण्यात आला आहे जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येतो.
  • प्रोसेसर आणि ओएस : Samsung Galaxy S21 Fan Edition अँड्रॉइड 12 आधारित वनयुआय 4.0 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी कंपनीनं यात 5नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला एक्सनॉस 2100 चिपसेट दिला आहे.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी सॅमसंग गॅलेक्सी एस21 फॅन एडिशन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बॅक पॅनलवर दोन 12 मेगापिक्सलचे कॅमेरा सेन्सर्स देण्यात आले आहेत. यातील एक 12एमपी अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे तर दुसरी 12एमपीची वाइड अँगल लेन्स आहे. जोडीला एक 8 मेगापिक्सलची एक टेलीफोटो लेन्स मिळते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी सॅमसंग गॅलेक्सी एस21 एफई मध्ये 4,500एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 25वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीनं आपला फोन 15वॉट वायरलेस चार्जिंग आणि रिवर्स वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजीसह बाजारात सादर केला आहे.
  • अन्य फीचर्स : हा सॅमसंग फोन ड्युअल सिमला सपोर्ट करतो ज्यात 5जी सह 4जी देखील वापरता येतं. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह हा सॅमसंग मोबाइल 3.5एमएम जॅक व एनएफसी सारख्या फीचर्सना सपोर्ट करतो.

The post स्नॅपड्रॅगनच्या प्रोसेसरसह भारतात पुन्हा येतोय Samsung Galaxy S21 FE; बातमी आली समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s21-fe-with-snapdragon-888-to-relaunch-soon-in-india/feed/ 0
Poco F6 आणि Poco F6 Pro ची तयारी सुरु! लीकमध्ये समोर आली माहिती https://www.91mobiles.com/marathi/poco-f6-and-poco-f6-pro-imei-database-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/poco-f6-and-poco-f6-pro-imei-database-leaked/#respond Fri, 30 Jun 2023 05:52:41 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21829 पोकोनं गेल्याच महिन्यात भारतात आपल्या ‘एफ’ सीरीजचे POCO F5 आणि POCO F5 Pro स्मार्टफोन लाँच केले होते जे दमदार स्पेसिफिकेशन्ससह आले आहेत. आता बातमी आली आहे की कंपनी POCO F6 आणि POCO F6 Pro वर देखील काम करत आहे. एका लीकमध्ये ह्या दोन्ही फोन्सच्या मॉडेल नंबर तसेच स्पेसिफिकेशन्सचा उल्लेख करण्यात आला आहे ज्यांची माहिती पुढे […]

The post Poco F6 आणि Poco F6 Pro ची तयारी सुरु! लीकमध्ये समोर आली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
पोकोनं गेल्याच महिन्यात भारतात आपल्या ‘एफ’ सीरीजचे POCO F5 आणि POCO F5 Pro स्मार्टफोन लाँच केले होते जे दमदार स्पेसिफिकेशन्ससह आले आहेत. आता बातमी आली आहे की कंपनी POCO F6 आणि POCO F6 Pro वर देखील काम करत आहे. एका लीकमध्ये ह्या दोन्ही फोन्सच्या मॉडेल नंबर तसेच स्पेसिफिकेशन्सचा उल्लेख करण्यात आला आहे ज्यांची माहिती पुढे वाचता येईल.

पोको एफ6 सीरीज आयएमआय (लीक)

शाओमीयुआय कम्यूनिटीवर पोको एफ6 सीरीजची लिस्टिंग शेयर करण्यात आली आहे. इथे पोको एफ6 2311DRK48G आणि 2311DRK48I मॉडेल नंबरसह दाखवण्यात आला आहे ज्यात ‘I’ अक्षर इंडियन मार्केट दर्शवतो.

अशाप्रकारे आयएमआय डेटाबेसमध्ये पोको एफ6 प्रो स्मार्टफोनचा 23113RKC6G आणि 23113RKC6I मॉडेल नंबर समोर आला आहे. इथे देखील पहिला मॉडेल फोनचा ग्लोबल व्हर्जन सांगण्यात आला आहे तर दुसरा मॉडेल नंबर इंडिया व्हर्जन आहे.

पोको एफ6 सीरीज स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • लीकनुसार POCO F6 स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेटवर लाँच होऊ शकतो.
  • POCO F6 Pro मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपेसट असल्याचं सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हा प्रोसेसर अद्याप बाजारात आलाच नाही.
  • लीकनुसार हे सीरीज प्लास्टिक बॉडीसह नव्हे तर ग्लास किंवा लेदर टेक्स्चर बॅक कव्हरसह सादर केली जाऊ शकते.
  • POCO F6 आणि POCO F6 Pro स्मार्टफोनमध्ये कंपनी सुधारित टेलीफोटो लेन्स देऊ शकते जी जवळच्या वस्तू चांगल्या कॅप्चर करू शकेल तसेच चांगली झूम क्वॉलिटी मिळेल.

पोको एफ5 डिटेल्स

  • 8GB RAM + 256GB Memory = 29,999 रुपये
  • 12GB RAM + 256GB Memory = 33,999 रुपये
  • स्क्रीन : फोनमध्ये 6.67 इंचाची मोठी पंच-होल स्क्रीन देण्यात आली आहे जी अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे तसेच 120हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालते. ह्या डिस्प्लेवर 1000 निट्स ब्राइटनेस, 1920पीडब्ल्यूडी डिमिंग, आणि 5,000,000:1 कॉन्ट्रास्ट रेशियो सारखे फीचर्स मिळतात.
  • प्रोसेसर : प्रोसेसिंगसाठी पोको एफ5 मध्ये 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7 प्लस जेन 2 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.91गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो. हा फोन 7जीबी पर्यंतच्या वचुर्अल रॅमला सपोर्ट करतो ज्याच्या मदतीनं इंटरनल 12जीबी रॅम 19जीबी पर्यंत वाढवता येईल.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 1/2.0″ इंचाचा सेन्सर साईज असलेला 64 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे जो 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेन्स तसेच 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो सेन्सरसह येतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ह्यात 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी पोको एफ5 5जी फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. कंपनीचा दावा आहे की फक्त 30 मिनिटांच्या चार्जवर हा फोन 30 तास कॉलिंग करू शकतो.

The post Poco F6 आणि Poco F6 Pro ची तयारी सुरु! लीकमध्ये समोर आली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/poco-f6-and-poco-f6-pro-imei-database-leaked/feed/ 0