Rashmi Robot - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 07 Aug 2018 12:03:21 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 रांची मधील व्यक्तिने बनवलेली महिला रोबोट मराठी आणि भोजपुरी मध्ये पण बोलते, चीन आणि अमेरिका झाली हैराण https://www.91mobiles.com/marathi/ranchi-man-ranjit-develops-humanoid-robot-named-rashmi-indian-version-of-sophia-with-ai-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/ranchi-man-ranjit-develops-humanoid-robot-named-rashmi-indian-version-of-sophia-with-ai-in-marathi/#respond Tue, 07 Aug 2018 12:03:21 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1613 रश्मी जग प्रसिद्ध रोबोट ‘सोफिया’ चे देशी वर्जन आहे. सोफिया ही जगातील पहिली अशी रोबोट आहे जिला माणसांप्रमाणे देशाचे नागरिकत्व मिळाले आहे.

The post रांची मधील व्यक्तिने बनवलेली महिला रोबोट मराठी आणि भोजपुरी मध्ये पण बोलते, चीन आणि अमेरिका झाली हैराण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
संपूर्ण जगाला माहीत आहे की भारतीय कोणत्याही बाबतीत कमी नाहीत. जगातील मोठया मोठया कंपन्यांना मध्ये भारतीय वंशाचे लोक मोठया मोठया पदांवर आहेत. भारतीयांमधील हे टॅलेंट फक्त मोठया कंपन्यांमध्ये नाही तर शहरातील गल्ल्यांमध्ये पण आहे. रांची मध्ये राहणार्‍या एका व्यक्तीने असा कारनामा केला आहे की जो पाहून अमेरिका आणि चीन पण हैराण आहे. 38 वर्षीय रंजीत ने देशी रोबोट बनवाला आहे जो पाहून जगभरातील मोठे वैज्ञानिक पण आश्चर्यचकित झाले आहेत.

रंजीत श्रीवास्तव ने आपले टॅलेंट दाखवत देशी रोबोट बनवला आहे. या रोबोट चे नाव ‘रश्मी’ ठेवण्यात आले आहे. रश्मी जग प्रसिद्ध रोबोट ‘सोफिया’ चे देशी वर्जन आहे. सोफिया ही जगातील पहिली अशी रोबोट आहे जिला माणसांप्रमाणे देशाचे नागरिकत्व मिळाले आहे. सोफियाला सयुंक्त अरब अमीरात च्या सरकार कडून देशाचे नागरिकत्व देण्यात आले आहे. रंजीत ने सोफिया कडून प्रेरणा घेऊन रश्मीची निर्मिती केली आहे.

रश्मी मध्ये तसे पाहता अनेक फीचर्स आहेत पण खास बाब म्हणजे ती रोबोट असूनही हिंदी व इंग्रेजी सोबतच भोजपुरी व मराठी मध्ये पण बोलू शकते. 38 वर्षीय रंजीत ने लिंग्विस्टिक इंटरप्रीटेशन, आर्टिफिशियल इंटेलिजेंस, फेशियल रिकग्निशन सिस्टम आणि विजुअल डाटा सारख्या फीचर्स चे मिश्रण करून रश्मी ची निर्मिती केली आहे. रश्मी अशा सॉफ्टवेयर वर चालते जो स्वतः रंजीत ने बनवाला आहे.

मीडिया रिपोर्ट्स नुसार रंजीत ची रश्मी लिंग्विस्टिक इंटेलिजेंस द्वारा कोणत्याही संवादा मागील भावना समजून घेते तसेच एआई टेक्नोलॉजी वापरून ते डीकोड व एनालिसिस करून त्याला प्रतिउत्तर देते. रंजीत कडे एमबीए ची डिग्री आहे आणि गेल्या 15 वर्षांपासून सॉफ्टवेयर डेवलपमेंट चे काम करत आहे. रंजीत ने 2 वर्षांमध्ये फक्त 50 हजार रुपये खर्च करून रश्मी ला बनवले आहे.

माणसांप्रमाणे बोलणार्‍या या रोबोट वर रंजीत अजूनही काम करत आहे आणि त्याचे म्हणणे आहे की रश्मीला पूर्णपणे माणसांसारखी हाई इंटेलिजेंस रोबोट बनवण्यासाठी अजून काही वेळ लागेल. रंजीत च्या रश्मीला यूएई च्या सोफिया चा देशी अवतार बोलेल जात आहे. सोफिया ची निर्मिती हॅन्सन रोबोटिक्स फर्म ने केली आहे. ही रोबोट सुंदर महीले सारखी दिसते आणि सोफिया ची इंटेलिजेंस, स्किल्स आणि सोशल प्रेजेंस मुळे तिला माणसांप्रमाणे नागरिक म्हणून घोषित करण्यात आले आहे.

सोफिया फक्त स्मार्ट आणि इंटेलिजेंट नाही तर तिचे हाव भाव, चेहर्‍यावरचे रिएक्शन, बोलण्याची पद्धत इत्यादि माणसांसारखी. आहे. सोफिया सामान्य माणसा सारखी हसू शकते, रागावू शकते, उदास होते आणि हैराण होऊन पण दाखवते. अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्या मेमरी मध्ये सेव करून ठेवणारी सोफिया वैज्ञानिक व सामाजिक मुद्यांवर फक्त आपले मत व्यक्त करत नाही तर समस्यांचे निराकरण पण करते.

The post रांची मधील व्यक्तिने बनवलेली महिला रोबोट मराठी आणि भोजपुरी मध्ये पण बोलते, चीन आणि अमेरिका झाली हैराण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/ranchi-man-ranjit-develops-humanoid-robot-named-rashmi-indian-version-of-sophia-with-ai-in-marathi/feed/ 0