Realme 6s - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 29 May 2020 09:37:43 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Realme 6s झाला लॉन्च, फोन मध्ये आहे 4300एमएएच बॅटरी, 4जीबी रॅम आणि 48एमपी क्वॉड कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/realme-6s-launched-48mp-quad-camera-90hz-display-specs-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/realme-6s-launched-48mp-quad-camera-90hz-display-specs-price-sale/#respond Tue, 26 May 2020 09:35:06 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7131 कंपनीने हा नवीन फोन Realme 6s नावाने लॉन्च केला आहे जो कमी किंमतीत शानदार स्पेसिफिकेशन्स देतो.

The post Realme 6s झाला लॉन्च, फोन मध्ये आहे 4300एमएएच बॅटरी, 4जीबी रॅम आणि 48एमपी क्वॉड कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रियलमीने आज टेक मंचावर आपला हाईएंड डिवाईस Realme X3 SuperZoom लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन कंपनीने यूरोपियन मार्केट मध्ये आणला आहे जो येत्या काही दिवसांत जगातील इतर बाजारांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. रियलमी एक्स3 सुपरझूम सोबतच या कंपनीने एक नवीन मिड बजेट स्मार्टफोन पण आज सादर केला आहे. कंपनीने हा नवीन फोन Realme 6s नावाने लॉन्च केला आहे जो कमी किंमतीत शानदार स्पेसिफिकेशन्स देतो.

Realme 6s

Realme 6s पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे जो बेजल लेस स्क्रीनच्या वरच्या बाजूला आहे. कंपनीने हा फोन 1080 x 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या फुलएचडी+ एलसीडी स्क्रीन वर लॉन्च केला गेला आहे. हा डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो तसेच स्क्रीनच्या सुरक्षेसाठी फोन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्ट केला गेला आहे.

रियलमी 6एस एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर लॉन्च केला गेला आहे सोबतच हा फोन रियलमी यूआई वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकचा हीलियो जी90टी चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन हाईपरबूस्ट टेक्नॉलॉजी ने सुसज्ज आहे जी फोन मध्ये गेमिंग एक्सपीरियंस खास बनवते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Realme 6s क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन 8 मेगापिक्सलचा वाइड अँगल सेंसर, 2 मेगापिक्सलचा मोनो सेंसर आणि 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंसला सपोर्ट करतो. त्याचबरोबर सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी रियलमी 6एस मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Realme 6s एक डुअल सिम फोन आहे जो 3.5एमएम जॅक व अन्य बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह येतो. सिक्योरिटीसाठी फोनच्या साईड पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअपसाठी Realme 6s मध्ये 30वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,300एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

रियलमी 6एस यूरोप मध्ये 4 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे जो 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनची किंमत 199 यूरो म्हणजे जवळपास 16,000 रुपये आहे. यूरोपियन बाजारात हा फोन Lunar White आणि Eclipse Black कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे.

The post Realme 6s झाला लॉन्च, फोन मध्ये आहे 4300एमएएच बॅटरी, 4जीबी रॅम आणि 48एमपी क्वॉड कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-6s-launched-48mp-quad-camera-90hz-display-specs-price-sale/feed/ 0