Realme 7 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 21 Sep 2020 12:16:47 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Realme 7 सीरीज लॉन्च नंतर दुसऱ्या दिवशी कंपनीने कमी केल्या Realme 6 आणि Realme 6i च्या किंमती, जाणून घ्या नवीन किंमत https://www.91mobiles.com/marathi/realme-6-6i-price-cut-in-india-after-realme-7-pro-launch/ https://www.91mobiles.com/marathi/realme-6-6i-price-cut-in-india-after-realme-7-pro-launch/#respond Fri, 04 Sep 2020 14:50:20 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8001 रियलमी 7 सीरीज बाजारात येताच कंपनीने रियलमी 6 सीरीजच्या आधीच्या Realme 6 आणि Realme 6i च्या किंमती कमी केल्या आहेत, ज्या नंतर हे दोन्ही फोन्स आधीपेक्षा कमी किंमतीत विकत घेता येतील.

The post Realme 7 सीरीज लॉन्च नंतर दुसऱ्या दिवशी कंपनीने कमी केल्या Realme 6 आणि Realme 6i च्या किंमती, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने कालच भारतीय बाजारात नवीन स्मार्टफोन सीरीज ‘ रियलमी 7’ सादर केली आहे. या सीरीज अंतर्गत दोन नवीन स्मार्टफोन Realme 7 आणि Realme 7 Pro लॉन्च केले गेले आहेत. आर्कषक डिजाईन आणि शानदार स्पेसिफिकेशन्स असलेल्या हे स्मार्टफोन्स या महिन्याच्या वेगवेगळ्या तारखांना विक्रीसाठी उपलब्ध होतील. रियलमी 7 सीरीज बाजारात येताच कंपनीने रियलमी 6 सीरीजच्या आधीच्या Realme 6 आणि Realme 6i च्या किंमती कमी केल्या आहेत, ज्या नंतर हे दोन्ही फोन्स आधीपेक्षा कमी किंमतीत विकत घेता येतील.

Realme 6 ची किंमत

रियलमी 6 स्मार्टफोन बद्दल बोलायचे तर हा फोन इंडियन मार्केट मध्ये चार वेरिएंट्स मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. आज झालेल्या कपातीनंतर फोनचा 4 जीबी रॅम + 64 स्टोरेज वेरिएंट 13,999 रुपयांमध्ये, 6 जीबी रॅम + 64 स्टोरेज वेरिएंट 14,999 रुपयांमध्ये, 6 जीबी रॅम + 128 स्टोरेज वेरिएंट 15,999 रुपयांमध्ये आणि 8 जीबी रॅम + 128 स्टोरेज वेरिएंट 16,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

या प्राईस कटच्या आधी Realme 6 चा 4 जीबी रॅम + 64 स्टोरेज वेरिएंट 14,999 रुपयांमध्ये, 6 जीबी रॅम + 64 स्टोरेज वेरिएंट 15,999 रुपयांमध्ये, 6 जीबी रॅम + 128 स्टोरेज वेरिएंट 16,999 रुपयांमध्ये आणि 8 जीबी रॅम + 128 स्टोरेज वेरिएंट 17,999 रुपयांमध्ये विकला जात होता.

रियलमी 6 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा)

Realme 6i ची किंमत

रियलमी 6आई पाहता हा फोन भारतात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. प्राईस कटनंतर फोनचा 4 जीबी रॅम वेरिएंट 12,999 रुपये तर 6 जीबी रॅम वेरिएंट 13,999 रुपयांमध्ये विका घेता येईल.

रियलमी 6आई चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा)

Realme 7

कालच भारतात लॉन्च झालेली रियलमी 7 सीरीज पाहता बेस मॉडेल म्हणजे Realme 7 दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे ज्यात छोटा वेरिएंट 6 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच मोठ्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम सह 128 जीबी ची स्टोरेज देण्यात आली आहे. फोनचा 6 जीबी रॅम वेरिएंट 14,999 रुपये तर 8 जीबी रॅम वेरिएंट 16,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे.

Realme 7 Pro

रियलमी 7 प्रो ने पण इंडियन मार्केट मध्ये दोन वेरिएंट्स मध्ये एंट्री घेतली आहे. फोनचा बेस वेरिएंट 6 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत 19,999 रुपये आहे. तसेच फोनच्या मोठा वेरिएंट 8 जीबी रॅम व 128 जीबी इंटरनल स्टोरेज सह लॉन्च केला गेला आहे. जो 21,999 रुपयांमध्ये बाजारात आला आहे.

Realme 7 येत्या 10 सप्टेंबर पासून दुपारी 12 वाजता फ्लिपकार्ट आणि रियलमी.कॉम वर विक्रीसाठी उपलब्ध होईल तर Realme 7 Pro ची विक्री येत्या 21 सप्टेंबरच्या दुपारी 12 वाजता फ्लिपकार्ट आणि रियलमी.कॉम वरून होईल. दोन्ही फोन्स लवकरच ऑफलाइन स्टोर्स वर पण विकले जातील. या दोन्ही फोन्सचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:

Realme 7 / Realme 7 Pro

रियलमी 6 वीडियो

The post Realme 7 सीरीज लॉन्च नंतर दुसऱ्या दिवशी कंपनीने कमी केल्या Realme 6 आणि Realme 6i च्या किंमती, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-6-6i-price-cut-in-india-after-realme-7-pro-launch/feed/ 0
Realme 7 सीरीजने भारतात केली एंट्री, जाणून घ्या शानदार फोन्सचे 6 दमदार फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/realme-7-series-launched-in-india-with-64mp-quad-camera-fast-charging-tech-price-start-rs-14999-sale-flipkart/ https://www.91mobiles.com/marathi/realme-7-series-launched-in-india-with-64mp-quad-camera-fast-charging-tech-price-start-rs-14999-sale-flipkart/#respond Thu, 03 Sep 2020 11:46:15 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7975 Realme 7 आणि Realme 7 Pro मध्ये क्वाड कॅमेरा आणि फ्रंटला सिंगल पंच-होल सेंसर देण्यात आला आहे.

The post Realme 7 सीरीजने भारतात केली एंट्री, जाणून घ्या शानदार फोन्सचे 6 दमदार फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme 7 आणि Realme 7 Pro आज कंपनीने अधिकृतपणे लॉन्च केली आहे. दोन्ही स्मार्टफोन मध्ये होल-पंच डिस्प्ले असलेली डिजाइन देण्यात आली आहे. कंपनीची रियलमी 7 सीरीज जुन्या रियलमी 6 सीरीजचा अपग्रेड वर्जन आहे. Realme 7 सीरीजच्या लॉन्चच्या आधी कंपनीने फोन्सच्या काही फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली होती आणि आज कंपनीने फोनची किंमत आणि फुल स्पेसिफिकेशन्स सांगितले आहेते.

Realme 7 सीरीजची डिजाइन

Realme 7 आणि Realme 7 Pro ची डिजाइन दिसायला एकसारखी आहे. दोन्ही फोन्स मध्ये होल-पंच डिस्प्ले देण्यात आला आहे. फ्रंटला होल-पंच उजवीकडे वरच्या बाजूला आहे. फोन्सच्या तिन्ही बाजूनं खूप कमी बेजल्स आहेत. तर बॉटमला बारीक चिन पार्ट दिसत आहे. या नवीन सीरीजच्या उजवीकडे पावर ऑन-ऑफ बटन व उजवीकडे वॉल्यूम रॉकर बटन व सिम ट्रे चा ऑप्शन आहे. डिवाइसच्या बॉटमला स्पीकर ग्रिल, माइक आणि टाइप-सी पोर्ट आहे. तसेच फोनच्या मागे क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर्टिकल शेप आहे. दोन्ही फोन्स मध्ये फिंगरप्रिंट सेंसरवेगवेगळा आहे म्हणजे Realme 7 मध्ये साइड बाजूला पावर बटन मध्ये तर रियलमी 7 प्रो मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे.

फास्ट चार्जिंग असलेली पावरफुल बॅटरी

कंपनीने या सीरीज सोबत 65वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी दिली आहे. विशेष म्हणजे या आधी हि फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी Realme X50 Pro 5G मध्ये होती. पण हि टेक्नॉलॉजी सीरीजच्या मोठ्या वेरिएंट Realme 7 Pro सह सादर केली गेली आहे. कंपनीचा दावा आहे कि या टेक्नॉलॉजीने फोन फक्त 3 मिनिटांत 33 टक्के पर्यंत चार्ज केला जाऊ शकतो. तसेच 100 टक्के चार्जसाठी फक्त 34 मिनिट्स लागतील. Realme 7 Pro मध्ये कंपनीने 4500mAh ची बॅटरी दिली आहे. या फोनच्या बॉक्स मध्ये 10V/6.5A चार्जर आणि केबल मिळेल. Realme 7 बद्दल बोलायचे तर हा 30W डार्ट चार्ज सह 5000mAh बॅटरीच्या बॅटरीला सपोर्ट करतो. कंपनीनुसार रियलमी 7 मधील चार्जिंग टेक्नॉलॉजीच्या मदतीने फक्त 65 मिनिटांत 100 टक्के पर्यंत चार्जिंग करता येईल. तसेच Realme 7 फोन 15W PD चार्जला सपोर्ट करतो.

शानदार कॅमेरा

Realme 7 आणि Realme 7 Pro मध्ये क्वाड कॅमेरा आणि फ्रंटला सिंगल पंच-होल सेंसर देण्यात आला आहे. दोन्ही फोन मध्ये मागे Sony IMX682 चा अपर्चर f/1.8 सह 64 मेगापिक्सलचा अल्ट्रा हाई-रिजोल्यूशन असलेला वाइड अँगल कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच फोन्स मध्ये अपर्चर f/2.3 सह 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड-अँगल लेंस, अपर्चर f/2.4 सह 2 मेगापिक्सल B&W पोर्टेट कॅमेरा आणि अपर्चर f/2.4 सह 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. फोनचा रियर 64MP कॅमेऱ्याच्या मोड बद्दल सांगायचे झाले तर यात सुपर नाइटस्केप, स्टारी मोड, पॅनोरमिक व्यू, एक्सपर्ट मोड, टाइमलॅप्स, पोर्ट्रेट मोड, एचडीआर, अल्ट्रा मोड, अल्ट्रा मॅक्रो मोड, एआई ब्यूटी, फिल्टर, क्रोमा बूस्ट, स्लो मोशन, बोकेह इफेक्ट आहेत. वीडियो कॉलिंग आणि सेल्फीसाठी Realme 7 Pro मध्ये अपर्चर f/2.5 सह 32 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि Realme 7 मध्ये अपर्चर F2.0 सह 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

सुंदर डिस्प्ले

डिस्प्लेच्या बाबतीत दोन्ही फोन्स मध्ये फरक आहे. पण या दोन्ही फोन्सचा डिस्प्ले 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 120 हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट सह येतात. 90Hz अल्ट्रा स्मूथ डिस्प्ले जुन्या 60Hz पेक्षा 50 टक्के जास्त हाई रिफ्रेश रेट सह येतात. Realme 7 मध्ये 6.5-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे जो 20:9 रेश्यो, 2400x1080P FHD+ रेज्योल्यूशन आणि 90.5% स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो सह येतो. दुसरीकडे Realme 7 Pro पाहता यात 6.4-इंचाची सुपर AMOLED फुलस्क्रीन 180Hz सॅम्पलिंग रेट सह देण्यात आली आहे. डिस्प्ले 20:9 रेश्यो, 2400x1080P FHD+ रिजोल्यूशन आणि 90.8% स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो सह येतो.

हार्डवेयर

डिस्प्ले प्रमाणे हार्डवेयरच्या बाबतीत पण Realme 7 आणि Realme 7 Pro मध्ये फरक आहे. रियलमी 7 मध्ये जगातील पहिला मीडियाटेक हीलियो G95 गेमिंग प्रोसेसर देण्यात आला आहे.हा प्रोसेसर 12nm प्रोसेसचा वापर करून बनवण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी यात 900MHz Mali-G76GPU देण्यात आला आहे.

रियलमी 7 प्रो मध्ये स्नॅपड्रॅगॉन 720G एसओसी देण्यात आला आहे. हा प्रोसेसर 8nm प्रोसेस वर बनवण्यात आला आहे. या प्रोसेसर सह डिवाइस मध्ये ग्राफिक्ससाठी Adreno 618 GPU आहे.

रॅम व स्टोरेज

रियलमी 7 मध्ये 6GB रॅम + 64GB स्टोरेज आणि 8GB रॅम + 128GB स्टोरेज वेरिएंट आहे. तर रियलमी 7 प्रो मध्ये 6GB रॅम +128GB स्टोरेज वेरिएंट आणि 8GB रॅम + 128GB स्टोरेज वेरिएंट आहे. रॅम व स्टोरेज व्यतिरिक्त दोन्ही फोन्स एंडरॉयड 10 ऑपरेटिंग सिस्टम आणि बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह येतात.

किंमत आणि सेल

रियलमी 7 च्या 6GB रॅम + 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 14,999 रुपये आणि 8GB रॅम + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 16,999 रुपये आहे. हा फोन 10 सप्टेंबर पासून दुपारी 12 वाजता फ्लिपकार्ट आणि रियलमी.कॉम वर विक्रीसाठी येईल. तसेच रियलमी 7 प्रो च्या 6GB रॅम +128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 19,999 रुपये आणि 8GB रॅम + 128GB स्टोरेज वेरिएटची किंमत 21,999 रुपये आहे. हा डिवाइस 21 सप्टेंबर पासून दुपारी 12 वाजता फ्लिपकार्ट आणि रियलमी.कॉम वर विक्रीसाठी येईल. दोन्ही फोन्स लवकरच ऑफलाइन स्टोर्स वर पण विक्री साठी येतील.

The post Realme 7 सीरीजने भारतात केली एंट्री, जाणून घ्या शानदार फोन्सचे 6 दमदार फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-7-series-launched-in-india-with-64mp-quad-camera-fast-charging-tech-price-start-rs-14999-sale-flipkart/feed/ 0
3 सप्टेंबरला लॉन्च होतील Realme 7 आणि Realme 7 Pro, 65वॉट फास्ट चार्जिंग सह असेल 64एमपी कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/realme-7-pro-to-launch-in-india-on-3-september-with-64mp-camera-65w-fast-charging/ https://www.91mobiles.com/marathi/realme-7-pro-to-launch-in-india-on-3-september-with-64mp-camera-65w-fast-charging/#respond Thu, 27 Aug 2020 13:26:43 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7880 Realme 7 आणि Realme 7 Pro स्मार्टफोन भारतात 3 सप्टेंबरला लॉन्च होत आहेत आणि यादिवशी कंपनी ऑनलाईन ईवेंटचे आयोजन करेल.

The post 3 सप्टेंबरला लॉन्च होतील Realme 7 आणि Realme 7 Pro, 65वॉट फास्ट चार्जिंग सह असेल 64एमपी कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने काही दिवसांपूर्वी टीज केले होते कि कंपनी भारतात आपली ‘रियलमी 7 सीरीज’ घेऊन येणार आहे ज्या अंतर्गत Realme 7 आणि Realme 7 Pro स्मार्टफोन लॉन्च केले जाऊ शकतात. गेल्या आठवड्यात या सीरीजचे पोस्टर्स समोर आले होते ज्यात फोनचे नाव आणि फोटो सोबत सीरीजचे ब्रँड अँबॅसेडर सलमान खान पण दाखवण्यात आला होता. आज कंपनीने सीरीजच्या इंडिया लॉन्चची माहिती पण दिली आहे. रियलमीने सांगितले आहे कि येत्या 3 सप्टेंबरला Realme 7 आणि Realme 7 Pro स्मार्टफोन भारतात लॉन्च केले जातील.

Realme 7 आणि Realme 7 Pro स्मार्टफोन भारतात 3 सप्टेंबरला लॉन्च होत आहेत आणि यादिवशी कंपनी ऑनलाईन ईवेंटचे आयोजन करेल. हा ईवेंट रियलमीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर लाईव प्रक्षेपित केला जाईल जो दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. रियलमी आपली हि सीरीज हॅशटॅग Capture Faster Charge Faster सह प्रोमेट करत आहे ज्यावरून समजले आहे कि या सीरीजचे फोन्स फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सोबतच फास्ट कॅमेरा सेंसर सह लॉन्च होऊ शकतात.

Realme 7 आणि Realme 7 Pro च्या पोस्टरवरून समजले आहे कि सीरीजच्या स्मार्टफोन्सच्या बॅक पॅनल वर चौकोनी आकाराचा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. पोस्टर वरून असा खुलासा पण झाला आहे कि या कॅमेरा सेटअपचा प्राइमरी सेंसर 64 मेगापिक्सलचा असेल. त्याचबरोबर या प्रोमोशल पोस्टर मध्ये रियलमी 7 सीरीज मध्ये भारतातील सर्वात फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असल्याचे सांगण्यात आले आहे. रियलमीने खुलासा केला आहे कि फोन मध्ये 65वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी दिली जाईल.

Realme X7 Series

Realme येत्या 1 सप्टेंबरला कंपनीची नवीन स्मार्टफोन सीरीज पण सादर करेल ज्या अंतर्गत दोन नवीन स्मार्टफोन Realme X7 आणि Realme X7 Pro लॉन्च केले जाऊ शकतात. यादिवशी हि सीरीज चीन मध्ये लॉन्च होईल जी नंतर इतर बाजारांमध्ये येईल. लॉन्च डेट सोबत प्रसिद्ध झालेल्या टीजर मध्ये फोनचा फोटो पण शेयर केला गेला आहे ज्याच्या लुक व डिजाईन सोबत रियलमी एक्स7 सीरीज च्या अनेक खास स्पेसिफिकेशन्सची पण माहिती मिळाली आहे.

कंपनीने शेयर केलेल्या टीजर ईमेज वरून समजले आहे कि Realme X7 Series 5G सपोर्ट सह लॉन्च केली जाईल. रियलमीने खुलासा केला आहे कि सीरीज अंतर्गत लॉन्च होणाऱ्या स्मार्टफोन मध्ये एमोलेड डिस्प्ले दिली जाईल जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालेल. फोटो मध्ये फोन फुलव्यू बेजल लेस डिस्प्ले सह दाखवण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला पंच-होल आहे. फोटो मध्ये फोनच्या डाव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर दिसत आहे त्यामुळे कदाचित पावर बटन उजव्या पॅनल वर असू शकतो.

चर्चा अशी आहे कि या सीरीज अंतर्गत Realme X7 आणि Realme X7 Pro स्मार्टफोन लॉन्च केले जातील. 1 सप्टेंबरला दुपारी 2 वाजता फोनचा ग्लोबल डेब्यू होईल जो इंटरनेट वर लाईव प्रक्षेपित केला जाईल. हि सीरीज सर्वात आधी रियलमीच्या होम मार्केट म्हणजे चीन मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल, त्यांनतर भारतासहित इतर बाजारांमध्ये येईल.

The post 3 सप्टेंबरला लॉन्च होतील Realme 7 आणि Realme 7 Pro, 65वॉट फास्ट चार्जिंग सह असेल 64एमपी कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-7-pro-to-launch-in-india-on-3-september-with-64mp-camera-65w-fast-charging/feed/ 0