Realme C11 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 14 Jul 2020 09:48:26 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 5000एमएएच बॅटरी सह फक्त 7,499 रुपयांमध्ये लॉन्च झाला Realme C11 https://www.91mobiles.com/marathi/realme-c11-launch-in-india-know-price-specs-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/realme-c11-launch-in-india-know-price-specs-sale-offer/#respond Tue, 14 Jul 2020 09:48:26 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7636 कंपनीने Realme C11 भारतीय मार्केट मध्ये आणला आहे. हा डिवाईस लो बजेट सेग्मेंट मध्ये लॉन्च झाला आहे ज्याची किंमत फक्त 7,499 रुपये आहे.

The post 5000एमएएच बॅटरी सह फक्त 7,499 रुपयांमध्ये लॉन्च झाला Realme C11 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने आज भारतात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीने Realme C11 भारतीय मार्केट मध्ये आणला आहे. हा डिवाईस लो बजेट सेग्मेंट मध्ये लॉन्च झाला आहे ज्याची किंमत फक्त 7,499 रुपये आहे. मोठी बॅटरी व आर्कषक लुक असलेला रियलमी सी11 येत्या 22 जुलै पासून कंपनीच्या वेबसाइट सोबतच शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वरून विकत घेता येईल.

लुक व डिजाईन

Realme C11 च्या लुक व डिजाईन बद्दल बोलायचे तर हा फोन हा फोन चौकोनी डिजाइन कॅमेरा सेटअप सह आला आहे. फोनच्या मागे चौकोनी डिजाइन कॅमेरा सेटअप आहे, ज्यात दोन रियर कॅमेरे आणि फ्लॅश लाइट आहे. तसेच या कॅमेरा सेटअपच्या खाली कंपनीची ब्रांडिंग आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर मिनी-ड्रॉप नॉच देण्यात आली आहे. डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. रियलमी सी11 च्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर व पावर बटन देण्यात आला आहे तसेच खालच्या पॅनल वर स्पीकर ग्रिल आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट आहे.

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

Realme C11 कंपनीने 19:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे ज्याचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 88.7 टक्के आहे. हा स्मार्टफोन 1600 × 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. रियलमी सी11 एंडरॉयड 10 आधारित फोन आहे जो रियलमी यूआई सह चालतो.

प्रोसेसिंगसाठी रियलमी सी11 मध्ये 2.3गीगाहर्ट्ज स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकचा हीलियो जी35 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी हा फोन IMG PowerVR GE8320 जीपीयू ला सपोर्ट करतो. भारतीय बाजारात Realme C11 2 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे जो 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Realme C11 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश लाईट सह एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच हा फोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या पोर्टरेट लेंसला सपोर्ट करतो. सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी रियलमी सी11 मध्ये एफ/2.4 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Realme C11 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी हा फोन फेस अनलॉक सेंसरला सपोर्ट करतो तर पावर बॅकअपसाठी रियलमी सी11 मध्ये 5,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. भारतीय बाजारात हा फोन Rich Green आणि Rich Gray कलर वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे जो येत्या 22 जुलै पासून 7,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post 5000एमएएच बॅटरी सह फक्त 7,499 रुपयांमध्ये लॉन्च झाला Realme C11 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-c11-launch-in-india-know-price-specs-sale-offer/feed/ 0
5,000mAh बॅटरी सह लॉन्च झाला स्वस्त Realme C11, जाणून घ्या संपूर्ण माहिती https://www.91mobiles.com/marathi/realme-c11-launch-with-5000mah-battery-2gb-ram-dual-camera-know-price-and-sale-detail/ https://www.91mobiles.com/marathi/realme-c11-launch-with-5000mah-battery-2gb-ram-dual-camera-know-price-and-sale-detail/#respond Tue, 30 Jun 2020 09:58:35 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7573 Realme C11 मलेशिया मध्ये RM 429 (जवळपास 7,500 रुपये) मध्ये लॉन्च केला गेला आहे.

The post 5,000mAh बॅटरी सह लॉन्च झाला स्वस्त Realme C11, जाणून घ्या संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रियलमीने आज एक नवीन स्मार्टफोन Realme C11 लॉन्च केला आहे. कंपनीने हा नवीन डिवाइस ‘C’ सीरीज मध्ये मलेशिया मध्ये सादर केला आहे. आशा आहे कि हा लवकरच भारतात पण लॉन्च केला जाऊ शकतो. कंपनीने या डिवाइसच्या इंडिया लॉन्च बद्दल कोणतीही माहिती दिली नाही. Realme चा नवीन बजेट स्मार्टफोन काही कारणास्तव ब्रँडच्या आधीच्या फोन्स पेक्षा वेगळा आहे जसे कि फोनची कॅमेरा सेटअप डिजाइन. तसेच हा फोन कंपनीचा पहिला डिवाइस आहे जो मीडियाटेक Helio G35 वर चालतो. चला जाणून घेऊया फोनच्या डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्सची संपूर्ण माहिती.

डिजाइन

फोनच्या डिजाइन बद्दल बोलायचे तर हा Realme चा पहिला फोन आहे जो चौकोनी डिजाइन कॅमेरा सेटअप सह आला आहे. फोनच्या मागे डावीकडे चौकोनी डिजाइन कॅमेरा सेटअप आहे, ज्यात दोन रियर कॅमेरे आणि फ्लॅश लाइट आहे. तसेच या कॅमेरा सेटअपच्या मध्ये कंपनीची ब्रँडिंग आहे. फोनच्या फ्रंट लुक बद्दल बोलायचे तर हा मिनी-ड्रॉप नॉच डिस्प्ले सह येतो. फोनच्या टॉप आणि फोन स्क्रीनच्या उजवीकडे आणि डावीकडे खूप कमी बेजल्स देण्यात आले आहेत. हँडसेटच्या स्क्रीन खाली खूप जाड बेजल्स आहेत. हँडसेटच्या बॉटमला स्पीकर ग्रिल आणि टाइप सी पोर्ट चार्जिंगसाठी देण्यात आली आहे. फोन मध्ये उजवीकडे वॉल्यूम आणि पावर ऑन-ऑफ बटण व डावीकडे सिम ट्रे आहे.

स्पेसिफिकेशन्स

Realme C11 बद्दल बोलायचे तर यात 6.5-इंचाचा मिनी-ड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे जो HD+ (1600×720) रिजोल्यूशन सह येतो. फोन मध्ये 2.3GHz मीडियाटेक हीलियो G35 गेमिंग चिपसेट देण्यात आला आहे. हा चिपसेट हाइपरइंजन टेक्नोलॉजी आणि IMG PowerVR GE8320 जीपीयू सह येतो. Realme C11 मध्ये 2GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे, जी यूजर माइक्रोएसडी कार्डने 256GB पर्यंत वाढवू शकतात.

फोटोग्राफी पाहता Realme C11 मध्ये मागे डुअल कॅमेरा देण्यात आला आहे. या सेटअप मध्ये 13MP प्राइमरी सेंसर आणि 2MP डेप्थ सेंसर आहे. तसेच फ्रंटला सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. रियलमी सी11 ट्रिपल कार्ड स्लॉटला सपोर्ट करतो. याचा अर्थ असा आहे की फोन मध्ये दोन सिम सह एक माइक्रोएसडी कार्डचा वापर केला जाऊ शकतो. पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 5,000mAh battery आणि फोन एंडरॉयड 10 बेस्ड रियलमी यूआई वर चालतो.

किंमत आणि उपलब्धता

Realme C11 मलेशिया मध्ये RM 429 (जवळपास 7,500 रुपये) मध्ये लॉन्च केला गेला आहे. डिवाइस दोन कलर ऑप्शन Mint Green आणि Pepper Grey मध्ये येतो. तर Realme C11 7 जुलै पासून ई-कॉमर्स साइट Lazada वर उपलब्ध होईल. इंडिया लॉन्च बद्दल अजूनतरी अधिकृत माहिती आलेली नाही.

The post 5,000mAh बॅटरी सह लॉन्च झाला स्वस्त Realme C11, जाणून घ्या संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-c11-launch-with-5000mah-battery-2gb-ram-dual-camera-know-price-and-sale-detail/feed/ 0