Realme X50 5G Youth - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 03 Jan 2020 12:16:57 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 रियलमी इंडियाच्या सीईओने शेयर केला Realme च्या पहिल्या 5G फोनचा फोटो, बघा कसा आहे डिवाईस आणि कधी होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/realme-india-ceo-madhav-sheth-tweet-share-brand-first-5g-phone-photo-x50-youth/ https://www.91mobiles.com/marathi/realme-india-ceo-madhav-sheth-tweet-share-brand-first-5g-phone-photo-x50-youth/#respond Fri, 03 Jan 2020 12:16:57 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6186 उशिरा का होईना पण रियलमीचा 5जी फोन भारतात पण लॉन्च होईल.

The post रियलमी इंडियाच्या सीईओने शेयर केला Realme च्या पहिल्या 5G फोनचा फोटो, बघा कसा आहे डिवाईस आणि कधी होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने घोषणा केली आहे कि कंपनी येत्या 7 जानेवारीला अंर्तराष्ट्रीय बाजारात आपल्या ‘एक्स सीरीज’ चा नवीन डिवाईस Realme X50 सादर करेल. या दिवशी कंपनी चीन मध्ये ईवेंटचे आयोजन करेल आणि या ईवेंटच्या मंचावरून ब्रँडचा आगामी स्मार्टफोन Realme X50 टेक मार्केट मध्ये येईल. रियलमी एक्स50 ब्रँडचा पहिला 5G स्मार्टफोन असेल. हा फोन बाजारात येण्याआधीच रियलमी इंडियाचे सीईओ माधव सेठ यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर हँडल वरून Realme च्या पहिल्या 5G फोनचा फोटो शेयर केला आहे. फोटो शेयर करून रियलमीने असा ईशारा केला आहे कि कंपनी भारतात पण आपला 5जी फोन लॉन्च करण्याची योजना बनवत आहे.

माधव सेठ यांनी आपल्या ट्वीट मध्ये 4 फोटोग्राफ शेयर केले आहेत. या सर्व फोटोज मध्ये फोनचा बॅक पॅनल दाखवण्यात आला आहे. फोटोज शेयर करण्यासोबतच रियलमी इंडियाच्या सीईओनी सांगितले आहे कि Realme चा हा 5G फोन फक्त लुक व डिजाईनच्या बाबतीत शानदार नसेल तर परफॉर्मेंसच्या बाबतीत पण पावरफुल असेल. या ट्वीटवर जेव्हा लोकांनी प्रश्न विचारला कि हा फोन भारतात कधी येईल तेव्हा realme India Support ने उत्तर दिले आहे कि, या माहितीसाठी कंपनीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर नजर ठेवावी. म्हणजे उशिरा का होईना पण रियलमीचा 5जी फोन भारतात पण लॉन्च होईल.

लुक व डिजाईन

Realme 5G फोन बद्दल बोलायचे तर माधव सेठ यांनी शेयर केलेल्या फोटो मध्ये फोनचा बॅक पॅनल दिसत आहे ज्यावर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप आहे. हा कॅमेरा सेटअप पॅनलच्या उजवीकडे वरच्या बाजूला वर्टिकल शेप मध्ये आहे. या सेटअप मध्ये सर्वात वरची लेंस ‘पिवळ्या सर्कल’ मध्ये आहे. कॅमेरा सेटअपच्या उजवीकडे फ्लॅश लाईट आहे. विशेष म्हणजे अशीच डिजाईन Realme X सीरीजच्या इतर फोन्स मध्ये पण दिसली आहे. या फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर नाही त्यामुळे असे म्हणता येईल कि हा फोन इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनल वर उजवीकडे खाली Realme ची ब्रँडिंग आहे. फोटो मध्ये हा फोन ग्लॉस बॉडीवर बनलेला दिसतो जी खूप शाइनी आहे.

Realme X50 5G

माधव सेठ यांनी शेयर केलेले फोटोज रियलमी Realme X50 चे असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे रियलमी चाइना CMO Xu Qi यांनी या सीरीज बद्दल असा खुलासा केला आहे कि Realme X50 5G सोबत फोनचा लाइट वर्जन Realme X50 5G Youth पण लॉच केला जाईल. Realme X50 मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 765जी चिपसेट मिळेल. Realme X50 ब्रँडचा गेमिंग स्मार्टफोन असेल तसेच फोन मध्ये कूलिंग सिस्टम टेक्नॉलॉजी दिली जाईल, जी गेमिंग एक्सपीरियंस स्मूद, फास्ट आणि लॅग फ्री करेल. लीक्सनुसार Realme X50 मध्ये 6.4 इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz असू शकतो तसेच फोनची स्क्रीन गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्ट केली जाईल.

लीकनुसार Realme X50 मध्ये 64 मेगापिक्सलचा प्राइमरी Samsung GW1 सेंसर दिला जाईल. त्याचबरोबर फोन मध्ये 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 5x हाइब्रिड झूम असेलला 13 मेगापिक्सलचा सेंसर तसेच 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस असू शकते. लीक रिपोर्टनुसार फोनच्या फ्रंटला 32 मेगापिक्सलचा Samsung GD1 सेंसर + 8 मेगापिक्सल वाइड अँगल लेंस असलेला डुअल सेल्फी कॅमेरा सेटअप मिळू शकतो. Realme X50 मध्ये पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 30वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 4,500एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते. फोनच्या ठोस स्पेसिफिकेशन्स साठी 7 जानेवारीची वाट बघावी लागेल.

The post रियलमी इंडियाच्या सीईओने शेयर केला Realme च्या पहिल्या 5G फोनचा फोटो, बघा कसा आहे डिवाईस आणि कधी होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-india-ceo-madhav-sheth-tweet-share-brand-first-5g-phone-photo-x50-youth/feed/ 0