Realme X50 Lite - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 28 Nov 2019 10:43:08 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Realme X50 5G आणि X50 Lite (Youth Edition) 5G चे स्पेसिफिकेशन्स झाले लीक https://www.91mobiles.com/marathi/realme-x50-5g-and-x50-lite-youth-edition-5g-specifications-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/realme-x50-5g-and-x50-lite-youth-edition-5g-specifications-leaked/#respond Thu, 28 Nov 2019 10:43:08 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5907 आशा आहे कि कंपनी पुढच्यावर्षी पर्यंत भारतात Realme X50 5G सादर करू शकते.

The post Realme X50 5G आणि X50 Lite (Youth Edition) 5G चे स्पेसिफिकेशन्स झाले लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही दिवसांपूर्वी Realme ने अधिकृतपणे घोषणा केली होती कि ते आपल्या Realme X50 वर काम करत आहेत, जो 5G सपोर्ट सह सादर केला जाईल. हा कंपनीचा पहिला 5G फोन असेल. आता फेसबुक वर रियलमी फॅनने Realme X50 5G फोनच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा केला आहे. तसेच फोटो अजून एका फोन Realme X50 Lite (Youth Edition) ची माहिती पण समोर आली आहे.

या आठवड्याच्या सुरवातीला Realme चायनाचे सीएमओ Xu Qi Chase यांनी चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर पोस्ट करत सांगितले आहे कि रियलमी आपल्या 5जी स्मार्टफोन वर काम करत आहे आणि हा पुढच्यावर्षीच्या सुरवातीला Realme X50 नावाने सादर केला जाईल. आपल्या पोस्ट मध्ये सीएमओ ने Realme X50 ची इमेज पण दाखवली होती. यावरून समजले होते कि फोन मध्ये पिल-शेप पंच होल वरच्या बाजूला डावीकडे असेल.

Realme X50 5G स्पेसिफिकेशन्स

लीकनुसार Realme X50 5G मध्ये सुपर-AMOLED 6.44-इंचाचा डिस्प्ले आणि 90Hz रिफ्रेश रेट असेल. तसेच फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 735 5G चिपसेट असेल. तसेच फोनच्या रियर पॅनल वर क्वाड कॅमेरा सेटअप असेल, ज्यात Sony IMX686 60-मेगापिक्सल प्राइमरी लेंस, 8-मेगापिक्सल अल्ट्रावाइड लेंस, 2-मेगापिक्सल मॅक्रो लेंस आणि 2-मेगापिक्सलची पोर्टेट लेंस असेल.

सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी फोन मध्ये 32-मेगापिक्सल + 8-मेगापिक्सल वाइड-अँगल लेंस असेल. तसेच फोन मध्ये पावर बॅकअप साठी 4,500mAh ची बॅटरी पण असेल जी सुपर VOOC 4.0 फ्लॅश चार्ज टेक्नोलॉजी सह येईल. बोलले जात आहे कि हा कंपनीचा पहिला फोन असेल जो वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करेल. लीकनुसार Realme X50 5G मध्ये 6 GB रॅम + 128 GB स्टोरे, 8 GB रॅम + 128 GB स्टोरेज आणि 8 GB रॅम + 256 GB स्टोरेज दिली जाऊ शकते. पण अजूनतरी फोनची किंमत समजली नाही.

Realme X50 Lite (Youth Edition) 5G चे स्पेसिफिकेशन्स

या लीक मध्ये Realme X50 Lite (Youth Edition) 5G बद्दल पण माहिती समोर आली आहे. यात सांगण्यात आले आहे कि फोन मध्ये 6.55-इंचाचा IPS एलसीडी डिस्प्ले असेल. तसेच फोन मध्ये MediaTek MT6885 5G असेल. यात क्वाड कॅमेरा सेटअप मागे असेल. कॅमेरा सेटअप मध्ये 16-मेगापिक्सलची मेन लेंस, 8-मेगापिक्सल वाइड अँगल लेंस, 2-मेगापिक्सल मॅक्रो लेंस आणि 2-मेगापिक्सल पोर्टेट लेंस असेल.

Realme X50 Lite (Youth Edition) 5G मध्ये सिंगल फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला जाईल जो 32-मेगापिक्सलचा असेल. कंपनी हा डिवाइस पंच होल डिस्प्ले सह सादर करू शकते. तसेच X50 Lite 5G मध्ये 5,000mAh ची बॅटरी असेल जी VOOC 4.0 फ्लॅश चार्ज टेक्नोलॉजी सह येईल. चीन मध्ये फोन 6 GB रॅम + 64 GB स्टोरेज आणि 8 GB रॅम + 128 GB स्टोरेज सह येईल.

या लीक व्यतिरिक्त एका इंडियन टिप्सटरने खुलासा केला आहे कि रियलमी के RMX2030 मॉडेल नंबर असलेल्या फोनला Bureau of Indian Standards (BIS) सर्टिफिकेशन मिळाले आहे. त्यामुळे आशा आहे कि कंपनी पुढच्यावर्षी पर्यंत भारतात Realme X50 5G सादर करू शकते.

The post Realme X50 5G आणि X50 Lite (Youth Edition) 5G चे स्पेसिफिकेशन्स झाले लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-x50-5g-and-x50-lite-youth-edition-5g-specifications-leaked/feed/ 0