Realme X60 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 09 Apr 2020 13:23:58 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Realme X3 SuperZoom Edition सर्टिफिकेशन्स साइट वर झाला लिस्ट, 12 जीबी रॅम आणि पावरफुल कॅमेऱ्यासह होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/realme-x3-superzoom-edition-listed-on-nbtc-specs-price-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/realme-x3-superzoom-edition-listed-on-nbtc-specs-price-leaked/#respond Thu, 09 Apr 2020 13:23:58 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7051 लीक्सनुसार Realme X3 SuperZoom Edition कंपनीचा पावरफुल स्मार्टफोन तर असेल पण रियलमी हा फोन 5जी फोन म्हणून लॉन्च करणार नाही.

The post Realme X3 SuperZoom Edition सर्टिफिकेशन्स साइट वर झाला लिस्ट, 12 जीबी रॅम आणि पावरफुल कॅमेऱ्यासह होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme बद्दल काही दिवसांपूर्वी बातमी आली होती कि कंपनी आपल्या नवीन 5G फोन वर काम करत आहे आणि हा Realme X60 नावाने बाजारात येईल. लीक मध्ये सांगण्यात आले होते कि या फोन मध्ये क्वॉड रियर कॅमेरा आणि हाई रिफ्रेश रेट असलेला पंच-होल एमोलेड डिस्प्ले मिळेल. कंपनीने आतापर्यंत रियलमी एक्स60 बाबत कोणतीही माहिती दिली नाही पण Realme X60 5G च्या आधी आता रियलमी एक्स सीरीजचा अजून एक स्मार्टफोन रियलमी एक्स3 समोर आला आहे ज्याचे नाव Realme X3 SuperZoom Edition असल्याचे बोलले जात आहे.

Realme X3 SuperZoom Edition ची माहिती एमएसपीच्या माध्यमातून समोर आली आहे. वेबसाइटचा दावा आहे कि रियलमीचा एक आगामी स्मार्टफोन थाईलँडच्या सर्टिफिकेशन्स साइट एनबीटीसी वर दिसला आहे. वेबसाइट वर हा फोन RMX2086 मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे आणि मीडिया रिपोर्टनुसार हा स्मार्टफोन Realme X3 SuperZoom Edition नावाने बाजारात येईल. नावावरून समजते कि हा फोन रियलमी एक्स2 चा अपग्रेडेड वर्जन असेल आणि चांगल्या झूम क्वॉलिटी लेंस सह लॉन्च केला जाऊ शकतो.

लीक्सनुसार Realme X3 SuperZoom Edition कंपनीचा पावरफुल स्मार्टफोन तर असेल पण रियलमी हा फोन 5जी फोन म्हणून लॉन्च करणार नाही. हा फोन एक 4जी फोनच असेल जो दमदार स्पेसिफिकेशन्स सह येईल. चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंचच्या आधारावर सांगण्यात आले आहे कि हा रियलमी एक्स3 फोन को12 जीबी रॅम वर लॉन्च केला जाऊ शकतो. गीकबेंच वर हा फोन एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 सह दाखवण्यात आला आहे तसेच सिंगल-कोर मध्ये या फोनला 788 स्कोर आणि मल्टी-कोर मध्ये या फोनला 2624 स्कोर मिळाला आहे.

Realme X2 Pro

फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा 1080 × 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असेलल्या 6.5 इंचाच्या फुलएचडी सुपर एमोलेड फ्लूइड डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनचा आस्पेक्ट रेशियो 20:9, रिफ्रेश रेट 90 हर्ट्ज आणि सॅम्पलिंग रेट 135 हर्ट्ज आहे. स्क्रीन प्रोटेक्शन साठी Realme X2 Pro मध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चा वापर करण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 9 पाई वर आधारित कलरओएस 6.1 वर लॉन्च झाला आहे जो ऑक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855+ चिपसेट वर चालतो.

Realme X2 Pro स्मार्टफोन मध्ये 64 मेगापिक्सलचा क्वॉड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोन मध्ये 64MP GW1 प्राइमरी सेंसर, 13MP टेलीफोटो लेंस सोबत 20x हाइब्रिड जूम सपॉर्ट, 8MP अल्ट्रा-वाइड-अँगल लेंस सह 115-डिग्री फिल्ड ऑफ व्यू आहे जो 2.5mm मॅक्रो शॉट्स घेऊ शकतो. तसेच हा फोन 4K 60fps वीडियो आणि 960fps स्लो-मोशन रेकॉर्ड करू शकतो. वीडियो कॉलिंग साठी फोन मध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तर पावर बॅकअप साठी Realme X2 Pro मध्ये 50 वॉट सुपर वूक फ्लॅश चार्ज सपोर्ट वाली 4,000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post Realme X3 SuperZoom Edition सर्टिफिकेशन्स साइट वर झाला लिस्ट, 12 जीबी रॅम आणि पावरफुल कॅमेऱ्यासह होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-x3-superzoom-edition-listed-on-nbtc-specs-price-leaked/feed/ 0