Realme X9 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 01 Mar 2021 11:08:01 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 108 MP कॅमेऱ्यासह लॉन्च होईल Realme X9 Pro, गेमिंग प्रोसेसेसर पण असेल यात https://www.91mobiles.com/marathi/realme-x9-pro-specifications-leak/ https://www.91mobiles.com/marathi/realme-x9-pro-specifications-leak/#respond Mon, 01 Mar 2021 11:08:01 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10207 Realme X9 Pro च्या नावाची माहिती तर आधी आली होती पण पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर या फोनच्या स्पेसिफिकेशनबद्दल लीक आले आहेत. हा फोन कधी लॉन्च होईल याबाबत अजूनतरी कोणतीही खास माहिती मिळाली नाही

The post 108 MP कॅमेऱ्यासह लॉन्च होईल Realme X9 Pro, गेमिंग प्रोसेसेसर पण असेल यात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
4 मार्चला Realme GT फोन चीन मध्ये लॉन्च केला जाणार आहे. हा कंपनीचा हाईएन्ड गेमिंग फोन असल्याचे बोलले जात आहे. तसेच कंपनीच्या अजून एका फोनची माहिती येऊ लागली आहे. बातमीनुसार कंपनी लवकरच Realme X9 Pro लॉन्च करू शकते. हा फोन भारतात लॉन्च झालेल्या रियलमी एक्स7 चा अपग्रेड वर्जन आहे. बोलले जात आहे कि या फोनच्या माध्यमातून कंपनी युजर्सना गेमिंग सेग्मेंट मध्ये जास्त पर्याय देण्याचा प्रयत्न करेल. रियलमी जीटी क्वाल्कॉम स्नॅपड्रॅगॉन 888 चिपसेट आधारित फोन असेल तर Realme X9 Pro mediatek dimensity प्रोसेसरवर सादर केला जाऊ शकतो. (realme x9 pro specifications leak)

Realme X9 Pro स्पेसिफिकेशन

रियलमी एक्स9 चा आज पहिला लीक आला आहे. चीनी वेबसाइट WHYLAB ने सोशल नेटवर्किंग साइट वीबोवर पोस्ट केले आहे. हि बातमी 91मोबाईल्स इंग्लिशने सर्वप्रथम प्रकाशित केले आहे. देण्यात आलेल्या माहितीनुसार हा फोन mediatek dimensity 1200 प्रोसेसरवर काम करेल. तसेच फोनमध्ये 20:9 आस्पेक्ट रेशियो असलेली 6.4 इंचाची FHD+ (2400 X 1080 Pixels Resolutions) स्क्रीन मिळू शकते. यात पंच होल डिस्प्ले दिला जाऊ शकतो. खास बाब अशी म्हणता येईल कि यात 120hz रिफ्रेश रेट असलेली स्क्रीन असू शकते आणि अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टमवर सादर केला जाऊ शकतो. पंच होल फुल एचडी+ स्क्रीन पण मिळू शकते.

हे देखील वाचा : Exclusive: बघा Realme 8 Pro ची पहिली झलक, Salman Khan च्या हातात दिसला हा फोन

आज आलेल्या लीकनुसार रियलमी एक्स9 प्रो मध्ये 4,500 mAh ची बॅटरी मिळेल आणि कंपनी हि 65 वॉट फास्ट चार्जिंगसह सादर करू शकते. तसेच तुम्हाला ताकदवान कॅमेरा पण मिळू शकतो. रियलमी 8 प्रमाणे हा पण 108 मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासह सादर केला जाऊ शकतो.

हे देखील वाचा : न्यू Jio Phone ऑफर: कंपनी देत आहे 2 वर्षे सर्वकाही फ्री पण द्यावे लागतील इतके पैसे

Realme X9 Pro च्या नावाची माहिती तर आधी आली होती पण पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर या फोनच्या स्पेसिफिकेशनबद्दल लीक आले आहेत. हा फोन कधी लॉन्च होईल याबाबत अजूनतरी कोणतीही खास माहिती मिळाली नाही पण 2020 नोव्हेंबर मध्ये कंपनीने रियलमी एक्स सीरीज चीन मध्ये लॉन्च केली होती. त्यामुळे आशा आहे कि लवकरच हा फोन चीन मध्ये सादर केला जाऊ शकतो. भारतात येण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो.

The post 108 MP कॅमेऱ्यासह लॉन्च होईल Realme X9 Pro, गेमिंग प्रोसेसेसर पण असेल यात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-x9-pro-specifications-leak/feed/ 0