Redmi 4A - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 28 Jun 2019 13:13:33 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Xiaomi ने विकले आस्ट्रेलियाच्या लोकसंख्येपेक्षा पण जास्त Redmi A फोन https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-4a-5a-6a-236-lakhs-units-sold-7a-to-launch-in-india-manu-kumar-jain-tweet/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-4a-5a-6a-236-lakhs-units-sold-7a-to-launch-in-india-manu-kumar-jain-tweet/#respond Fri, 28 Jun 2019 13:13:33 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4691 आमच्या अंदाजानुसार Redmi 7A 22 जुलैला भारतात लॉन्च केला जाऊ शकतो.

The post Xiaomi ने विकले आस्ट्रेलियाच्या लोकसंख्येपेक्षा पण जास्त Redmi A फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi इंडियन स्मार्टफोन मार्केटचा सर्वात मोठा ब्रँड आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. कंपनीला टेक विश्वात येऊन 5 वर्षे झाली आहेत आणि या पाच वर्षात Xiaomi अत्यंत वेगाने वाढली आहे. भारतात लो बजेटला आपले हत्यार बनवत शाओमी ने एकापाठोपाठ एक असे स्मार्टफोन लॉन्च केले जे खूप कमी किंमतीत शानदार स्पेसिफिकेशन्स देत होते. Xiaomi ने Redmi 4A च्या रूपाने भारतात आपला सर्वात स्वस्त फोन लॉन्च केला होता, त्यानंतर Redmi 5A आणि Redmi 6A ने हि सिरीज पुढे नेली. आता कंपनी Redmi 7A स्मार्टफोन भारतात घेऊन येत आहे.

Redmi 7A च्या लॉन्चची घोषणा Xiaomi India चे एमडी मनु कुमार जैन यांनी आपल्या ट्वीटर हँडेल वरून केली आहे. मनु जैन यांनी सांगितले कि कंपनी भारतात Redmi 7A स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. Redmi 7A च्या लॉन्चच्या घोषणेसोबतच कंपनी अधिकाऱ्यांनी ‘Redmi A’ टाईटल असलेल्या स्मार्टफोन्स संबंधित एक धक्कादायक आकडा पण शेयर केला आहे. मनु कुमार जैन यांनी सांगितले आहे कि कंपनीने Redmi 4A, Redmi 5A आणि Redmi 6A चे एकूण 23.6 मिलियन यूनिट विकले आहेत, जे आस्ट्रेलियाच्या एकूण लोकसंख्येपेक्षा पण जास्त आहेत.

Xiaomi हेडनी हे आकडे एप्रिल 2019 पर्यंतचे असल्याचे सांगितले आहे. ट्वीट नुसार रेडमी ए टाईटल वाल्या या तिन्ही स्मार्टफोन्सचे 236 लाख पेक्षा जास्त यूनिट आता पर्यंत भारतात विकले गेले आहेत. ट्वीट मध्ये साल 2014 मधील आस्ट्रेलियाच्या लोकसंख्येचा हिशोब पण मांडण्यात आला आहे जी 236 लाखांपेक्षा पण कमी होती. म्हणजे 2014 मध्ये आस्ट्रेलियाची जेवढी लोकसंख्या होती त्यापेक्षा जास्त Redmi 4A, Redmi 5A आणि Redmi 6A इंडियन बाजारात विकले गेले आहेत. विशेष म्हणजे इथे साल 2014 चा उल्लेख यासाठी केला गेला आहे कारण याचवर्षी Xiaomi ने मोबाईल बाजारात एंट्री घेतली होती.

Xiaomi Redmi 7A

Xiaomi Redmi 7A 18:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर करण्यात आला आहे जो 720 x 1,440 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 5.45-इंचाच्या आईपीएस एलसीडी एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन एंडरॉयड 9 पाई आधारित मीयूआई 10 वर सादर करण्यात आला आहे जो ऑक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 439 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 505 जीपीयू आहे.

कंपनीने Redmi 7A चीन मध्ये 2 जीबी रॅम मेमरी वर सादर करण्यात आला आहे जो 16जीबी मेमरी आणि 32जीबी स्टोरेजच्या दोन स्टोरेज वेरिएंट मध्ये विकला जात आहे. दोन्ही वेरिएंट्सची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 13-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा 5-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Redmi 7A एक डुअल सिम फोन आहे जो 4जी ला सपोर्ट करतो. या फोन मध्ये कोणताही फिंगरप्रिंट स्कॅनर नाही त्यामुळे फोन अनलॉक करण्यासाठी यूजर्स पिन आणि फेस अनलॉकचा वापर करू शकतात. पावर बॅकअप साठी Redmi 7A मध्ये 4,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. Xiaomi Redmi 7A ब्लॅक आणि ब्लू कलर ऑप्शन मध्ये सादर झाला आहे. कंपनीने फोनचा 16जीबी मेमरी वेरिएंट आणि 32जीबी मेमरी वेरिएंट इंडियन करंसी नुसार जवळपास 5,500 रुपये आणि 6,000 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे.

91मोबाईल्सला Xiaomi चे बिजनेस हेड अनुज कुमार यांनी आधीच सांगितले आहे कि कंपनी Redmi 7A भारतात लॉन्च करण्याचे प्लानिंग करत आहे आणि लवकरच हा स्मार्टफोन बाजारात येईल. अनुज कुमार यांनी Redmi 7A लॉन्च डेट आणि याची किंमत व सेल संबंधित कोणतीही माहिती दिली नाही पण त्यांनी स्पष्ट केले कि Redmi 7A भारतात Redmi K20 सीरीज सह लॉन्च केला जाईल किंवा रेडमी के20 सीरीज च्या काही दिवसानंतर हा बाजारात येईल. आमच्या अंदाजानुसार Redmi 7A 22 जुलैला भारतात लॉन्च केला जाऊ शकतो.

The post Xiaomi ने विकले आस्ट्रेलियाच्या लोकसंख्येपेक्षा पण जास्त Redmi A फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-4a-5a-6a-236-lakhs-units-sold-7a-to-launch-in-india-manu-kumar-jain-tweet/feed/ 0