Redmi 8aXiaomi - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 20 Sep 2019 12:45:28 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Exclusive : 6,499 रुपये असेल Xiaomi Redmi 8A ची बेस किंमत, तीन वेरिएंट मध्ये असेल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/exclusive-xiaomi-redmi-8a-india-price-revealed/ https://www.91mobiles.com/marathi/exclusive-xiaomi-redmi-8a-india-price-revealed/#respond Fri, 20 Sep 2019 12:45:28 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5369 Redmi 8A चा 2 जीबी रॅम वाला बेस वेरिएंट 6,499 रुपयांमध्ये लॉन्च केला जाईल.

The post Exclusive : 6,499 रुपये असेल Xiaomi Redmi 8A ची बेस किंमत, तीन वेरिएंट मध्ये असेल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने घोषणा केला आहे कि कंपनी भारतात आपल्या ‘रेडमी सीरीज’ चा विस्तार करणार आहे आणि येत्या 25 सप्टेंबरला या सीरीजचा नवीन स्मार्टफोन Redmi 8A लॉन्च करेल. Xiaomi Redmi 8A कंपनीचा लो बजेट फोन असेल ज्याचा रिटेल बॉक्स कालच इंटरनेट वर लीक झाला आहे. Redmi 8A चा रिटेल बॉक्स लीक झाल्यामुळे या फोनच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. तसेच आता फोन लॉन्चच्य आधी 91मोबाईल्सला Redmi 8A च्या किंमतीची माहिती पण मिळाली आहे.

91मोबाईल्सने आपल्या सूत्रांकडून Redmi 8A चे वेरिएंट आणि त्यांच्या किंमतीची माहिती मिळवली आहे. Xiaomi Redmi 8A भारतात तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाईल. ज्यात 2 जीबी रॅम सह 16 जीबी मेमरी, 3 जीबी रॅम सह 32 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल मेमरी दिली जाईल. किंमतीबद्दल बोलायचे तर Redmi 8A चा 2 जीबी रॅम वाला बेस वेरिएंट 6,499 रुपयांमध्ये लॉन्च केला जाईल.

Redmi 8A शाओमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर लॉन्च करेल जो फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल. फोनचा दुसरा 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 6,999 रुपयांमध्ये लॉन्च केला जाईल. तसेच Redmi 8A चा सर्वात मोठा 4 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 8,999 रुपयांमध्ये भारतीय बाजारात सेल साठी उपलब्ध होईल. 25 सप्टेंबरला लॉन्च झाल्यानंतर Xiaomi Redmi 8A चा पहली सेल कधी होईल, हि माहिती पण लवकरच तुम्हाला दिली जाईल.

स्पेसिफिकेशन्स

Xiaomi Redmi 8A च्या लीक झालेल्या रिटेल बॉक्स वर फोनचे स्पेसिफिकेशन्स पण आहेत. या रिटेल बॉक्स नुसार Redmi 8A 19:9 आस्पेक्ट रेशियो सह लॉन्च केला जाईल जो 720 × 1520 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.22 इंचाच्या एचडी+ टीएफटी डिस्प्लेला सपोर्ट करेल. रेडमी 8ए एंडरॉयड 9 पाई आधारित मीयूआई वर सादर केला जाईल जो ऑक्टा-कोर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 439 प्रोसेसर वर चालेल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Redmi 8A सिंगल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 12 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला जाईल तसेच सेल्फी साठी फोन मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाईल. लीक मध्ये समोर आले आहे कि Xiaomi Redmi 8A डुअल सिम व 4जी एलटीई सह 5000एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करेल.

The post Exclusive : 6,499 रुपये असेल Xiaomi Redmi 8A ची बेस किंमत, तीन वेरिएंट मध्ये असेल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/exclusive-xiaomi-redmi-8a-india-price-revealed/feed/ 0