REDMI 9i Sport - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 20 Jul 2022 11:05:57 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 फक्त 306 रुपयांमध्ये तुमचा होईल 5000mAh बॅटरी असलेला फोन; अशी आहे REDMI 9i Sport वरील ऑफर https://www.91mobiles.com/marathi/redmi-9i-sport-smartphone-best-deal-check-offers-and-price/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-9i-sport-smartphone-best-deal-check-offers-and-price/#respond Wed, 20 Jul 2022 11:05:57 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11576 REDMI 9i Sport स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G25 प्रोसेसर आणि 13MP कॅमेरा देण्यात आला आहे.

The post फक्त 306 रुपयांमध्ये तुमचा होईल 5000mAh बॅटरी असलेला फोन; अशी आहे REDMI 9i Sport वरील ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart वर Xiaomi चा बजेट स्मार्टफोन REDMI 9i Sport डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे. मोठी बॅटरी असल्यामुळे एंट्री लेव्हल REDMI 9i Sport स्मार्टफोन खूप लोकप्रिय ठरला आहे. त्याचबरोबर या फोनमध्ये 6.5 इंचाचा मोठा डिस्प्ले देखील देण्यात आला आहे. बजेट सेगमेंटमध्ये देखील कंपनीनं स्मूद परफॉर्मेंससाठी 4GB रॅमसह सादर केला आहे. रेडमीच्या या किफायतशीर स्मार्टफोनमध्ये मीडियाटेकच्या Helio G25 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये गेमिंगच्या चाहत्यांसाठी HyperGame इंजिन टेक्नॉलॉजी देखील मिळते. असा जबरदस्त Redmi 9i Sport स्मार्टफोन सध्या फ्लिपकार्टवरून स्वस्तात विकत घेता येत आहे. इथे आम्ही तुम्हाला रेडमीच्या या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स, फिचर्स आणि किंमतीची माहिती दिली आहे.

REDMI 9i Sport वरील ऑफर्स

REDMI 9i Sport स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 8,799 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. या फोनची खरेदी करताना Axis बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर केल्यास तुम्हाला 750 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. तसेच City Bank क्रेडिट किंवा डेबिट कार्ट आणि RBL बँकच्या क्रेडिट कार्डवर 10 टक्क्यांच्या डिस्काउंट आहे. म्हणजे फ्लिपकार्ट वरून हा फोन फक्त 7919 रुपयांमध्ये विकत घेता येईल. परंतु तुमचं बजेट याहून कमी असेल तर तुम्ही हा रेडमी फोन हप्त्यांवर देखील विकत घेऊ शकता. फ्लिपकार्टवर हा फोन 306 रुपयांच्या मासिक हप्त्यांवर उपलब्ध झाला आहे. हे देखील वाचा: iPhone 13 ला धोबीपछाड देणारा फोन आला भारतात; परवडणाऱ्या किंमतीत दणकट Redmi K50i लाँच

REDMI 9i Sport स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट भारतात आले आहेत. या फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज मिळते, ज्याची किंमत 8,799 रुपये ठेवण्यात आली आहे. तर फोनच्या मोठ्या मॉडेलमध्ये 4GB रॅमसह 128GB मेमरी देण्यात आली आहे. फ्लिपकार्टवर हा मोठा मॉडेल 9,299 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे.

REDMI 9i Sport चे स्पेसिफिकेशन्स

Redmi 9i Sport स्मार्टफोनमध्ये 6.53 इंचाचा HD+ IPS LCD पॅनल देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन 1600×720 पिक्सल आहे. या डिस्प्लेची ब्राईटनेस 400 निट्स आहे जो TÜV Rheinland सर्टिफाइड देखील आहे. रेडमीचा हा फोन MediaTek Helio G25 प्रोसेसरसह लाँच करण्यात आला आहे. जोडीला कंपनीनं या स्मार्टफोनमध्ये 4GB रॅमसह 64GB आणि 128GB इंटरनल स्टोरेज दिली आहे. हे देखील वाचा: Electric Car सेगमेंटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी येतेय Xiaomi; स्वस्तात मिळणार ‘ऑटोमॅटिक’ चालणारी कार

Redmi 9i Sport स्मार्टफोनचे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता फोनमध्ये 13MP चा प्रायमरी कॅमेरा मिळतो, सोबतीला AI आणि LED फ्लॅश देण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये सेल्फीसाठी 5MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 10W फास्ट चार्जिंग आहे. रेडमीच्या या फोनमध्ये टेक्चर बॅक फिनिश आणि P2i नॅनो कोटिंग देण्यात आली आहे. हा फोन मेटॅलिक ब्लू, कोरल ग्रीन आणि कार्बन ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल.

The post फक्त 306 रुपयांमध्ये तुमचा होईल 5000mAh बॅटरी असलेला फोन; अशी आहे REDMI 9i Sport वरील ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-9i-sport-smartphone-best-deal-check-offers-and-price/feed/ 0