Redmi K30 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 13 Jan 2020 13:01:27 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Redmi K30 ठरू शकतो भारतातील पहिला 5G स्मार्टफोन, भारतीय सर्टिफिकेशन्स साइट वर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-k30-5g-listed-on-bis-m2001g7ai-model-number-specs/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-k30-5g-listed-on-bis-m2001g7ai-model-number-specs/#respond Mon, 13 Jan 2020 13:01:27 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6271 Xiaomi ने Redmi K30 5G भारतात लॉन्च केला तर हा भारतातील पहिला 5जी स्मार्टफोन ठरू शकतो.

The post Redmi K30 ठरू शकतो भारतातील पहिला 5G स्मार्टफोन, भारतीय सर्टिफिकेशन्स साइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने गेल्या महिन्यात अंर्तराष्ट्रीय बाजारात आपल्या टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करत ब्रँडचा 5G स्मार्टफोन Redmi K30 आणि Redmi K30 Pro लॉन्च केले होते. हे स्मार्टफोन्स चीनी बाजारात सेलसाठी उपलब्ध आहेत. Redmi K30 सीरीज चीन मध्ये लॉन्च होण्याआधी ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड (BIS) वर सीरीजचा एक स्मार्टफोन लिस्ट करण्यात आला होता. हा फोन अजूनही भारतात लॉन्च झाला नाही पण आता या सीरीजचा अजून एक डिवाईस बीआईएस वर लिस्ट केला गेला आहे. बोलले जात आहे कि लिस्ट झालेला हा फोन Redmi K30 चा 5G फोन आहे जो लवकरच इंडियन मार्केट मध्ये येऊ शकतो.

Redmi K30 सीरीजचा हा डिवाईस M2001G7AI मॉडेल नंबर सह ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड वर सर्टिफाइड केला गेला आहे. हि लिस्टिंग 9 जानेवारीची आहे. डिसेंबर मध्ये बीआईएस वर लिस्ट झालेला फोन Redmi K30 चा 4जी मॉडेल होता तर आता लिस्ट झालेला फोन Redmi K30 चा 5जी मॉडेल असल्याचे बोलले जात आहे. भारतात अजूनही 5G सर्विस अधिकृतपणे लॉन्च केली गेली नाही, हि अजूनतरी टेस्टिंग स्टेज वर आहे. पण जर Xiaomi ने Redmi K30 5G भारतात लॉन्च केला तर हा भारतातील पहिला 5जी स्मार्टफोन ठरू शकतो.

Redmi K30 5G

Redmi K20 च्या अपग्रेड वर्जन रेडमी के30 मध्ये कंपनीने 6.67-इंचाचा फुल-एचडी+ (1080×2400 पिक्सल) डिस्प्ले दिला आहे जो होल-पंच डिजाइन सह येतो. Redmi K30 स्मार्टफोन स्नॅपड्रॅगॉन 765 5जी प्रोसेसर सह येतो. या नवीन प्रोसेसरला 5जी सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच फोन तीन रॅम आणि तीन स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे.

फोटोग्राफी बद्दल बोलायचे तर रेडमी के30 मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. स्मार्टफोन मध्ये 64 मेगापिक्सल सोनी आईएमएक्स686 प्राइमरी कॅमेरा सेंसर, 5 मेगापिक्सल मॅक्रो लेंस, 8 मेगापिक्सल वाइड अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सल डेप्थ ऑफ फिल्ड आहे. तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वर डुअल सेल्फी कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात 20 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सल कॉम्बिनेशन कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे.

रेडमी फोन मध्ये पावरसाठी 4,500 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 30 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सह येते. कपनीचा दावा आहे कि Redmi K30 फक्त 60 मिनिटांत फुल चार्ज करता येईल. Redmi K30 ला क्विक चार्ज आणि यूएसबी पावर डिलवरी सपोर्ट देण्यात आला आहे.

Redmi K30 4G

Redmi K30 4G चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात जास्त फरक नाही. या वेरिएंट मध्ये कॅमेरा आणि बॅटरी फीचर्सचा फरक आहे. Redmi K30 4G मध्ये 64MP+2MP+2MP+8MP कॅमेरा सेटअप आहे. तर फोन मध्ये 4500एमएएच ची बॅटरी 27वॉट चार्जिंग सपोर्ट सह येते. याव्यतिरिक्त दोन्ही फोन मध्ये बाकी स्पेसिफिकेशन्स एक सारखे आहेत. रेडमी के30 सीरीजच्या भारतातील लॉन्चसाठी आता कंपनीच्या अधिकृत घोषणेची वाट बघितली जात आहे.

The post Redmi K30 ठरू शकतो भारतातील पहिला 5G स्मार्टफोन, भारतीय सर्टिफिकेशन्स साइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-k30-5g-listed-on-bis-m2001g7ai-model-number-specs/feed/ 0