Redmi K30 Pro Zoom Edition - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 24 Mar 2020 13:05:13 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 4,700mAh बॅटरी, 64MP कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगॉन 865 प्रोसेसर सह आला Redmi K30 Pro 5G, जाणून घ्या किंमत https://www.91mobiles.com/marathi/redmi-k30-pro-launched-in-china-with-zoom-edition-64mp-quad-camera-4700mah-battery-price-specification/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-k30-pro-launched-in-china-with-zoom-edition-64mp-quad-camera-4700mah-battery-price-specification/#respond Tue, 24 Mar 2020 13:05:13 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6876 Redmi K30 Pro आणि Redmi K30 Pro Zoom Edition चे स्पेसिफिकेशन्स जवळपास एकसारखे आहेत.

The post 4,700mAh बॅटरी, 64MP कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगॉन 865 प्रोसेसर सह आला Redmi K30 Pro 5G, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमीचा सबब्रँड म्हणून सुरु झालेल्या रेडमीने गेल्यावर्षी इंडिपेंडेंट कंपनी म्हणून सुरवात केली होती. याच सबब्रँड अंतर्गत आज कंपनीने चीन मध्ये आयोजित केलेल्या ऑनलाइन इवेंट मध्ये Redmi K30 Pro आपल्या घरच्या मार्केट मध्ये लॉन्च केला आहे. रेडमी के30 प्रो कंपनीने हाई-एंड स्पेसिफिकेशन्स सह सादर केला आहे. या डिवाइस सोबत कंपनीने Redmi K30 Pro Zoom Edition पण सादर केला आहे. दोन्ही फोन्सचे स्पेसिफिकेशन्स आणि लुक एकसारखा आहे. पण फोन्सच्या कॅमेरा स्पेसिफिकेशन्स मध्ये थोडा फरक आहे.

रेडमीने गेल्यावर्षी डिसेंबर मध्ये Redmi K30 4G आणि 5G वेरिएंट मध्ये सादर केला होता. आज याच डिवाइसचा अपग्रेडेड वेरिएंट म्हणून Redmi K30 Pro सादर केला गेला आहे. चला पुढे या फोन संबंधित सर्व माहिती पाहू.

Redmi K30 Pro आणि Redmi K30 Pro Zoom Edition चे स्पेसिफिकेशन्स

Redmi K30 Pro आणि Redmi K30 Pro Zoom Edition चे स्पेसिफिकेशन्स जवळपास एकसारखे आहेत. दोन्ही फोन्सच्या कॅमेरा आणि रॅम व स्टोरेज मध्ये थोडा फरक आहे. दोन्ही फोन्स मध्ये HDR10+ सुपर ऐमोलेड पॅनल देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा पीक ब्राइटनेस 1200nits आणि टच सॅम्पलिंग रेट 180Hz आहे. फोन्स मध्ये 6.67-इंच AMOLED FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिवाइस मध्ये कंपनीने लेटेस्ट क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट दिला आहे. वेगवान फाइल ट्रांसफरसाठी यात UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे. Redmi K30 Pro मध्ये 6GB रॅम व 128GB स्टोरेज, 8GB रॅम व 128GB स्टोरेज आणि 8GB रॅम व 256GB स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच Redmi K30 Pro च्या झूम एडिशन मध्ये 8GB रॅम व 128GB स्टोरेज आणि 8GB रॅम व 256GB स्टोरेज देण्यात आली आहे.

दोन्ही फोन मध्ये पॉप-अप सेल्फी कॅमेरा आणि मागे गोल क्वॉड कॅमेरा मॉड्यूल आहे. Redmi K30 Pro च्या कॅमेरा स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर यात 64MP Sony IMX686 सेंसर देण्यात आला आहे. कॅमेरा मध्ये 3x ऑप्टिकल झूम आणि ड्यूल ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन आहे. तसेच फोन 13-मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस 123-डिग्री फिल्ड ऑफ व्यू, 8MP टेलीफोटो 30एक्स झूम सपोर्ट आणि ओआईएस आणि 2MP सेंसर आहे. फोनच्या कॅमेऱ्यात EIS आणि 8K वीडियो रिकॉर्डिंग सपोर्ट आहे. त्याचप्रमाणे रेडमी के30 प्रो झूम एडिशन मध्ये 64MP (IMX686) + 13MP वाइड + 5MP + 2MP (मॅक्रो) लेंस आहे. दोन्ही फोन्स मध्ये सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी 20-मेगापिकसलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Redmi K30 Pro Zoom Edition आणि Redmi K30 Pro मध्ये सुपर ब्लूटूथ आणि लिक्विड कूलिंग फीचर देण्यात आला आहे. कंपनीने फोन मूनलाइट वाइट, स्काई ब्लू, पर्पल आणि स्पेस ग्रे कलर ऑप्शंस मध्ये सादर केला आहे. फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 4700एमएएच ची बॅटरी 33 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सह देण्यात आली आहे.

किंमत

Redmi K30 Pro च्या 6GB रॅम व 128GB स्टोरेजची किंमत 2999 Yuan (जवळपास 32,000 रुपये), 8GB रॅम व 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 3399 Yuan (जवळपास 36,000 रुपये) आणि 8GB रॅम व 256GB वेरिएंटची किंमत 3699 Yuan (जवळपास 39,000 रुपये) ठेवण्यात आली आहे. तर Redmi K30 Pro झूम एडिशनच्या 8GB रॅम व 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 3799 Yuan (जवळपास 40,000 रुपये) आणि 8GB रॅम व 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 3999 Yuan (जवळपास 43,000 रुपये) आहे.

The post 4,700mAh बॅटरी, 64MP कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगॉन 865 प्रोसेसर सह आला Redmi K30 Pro 5G, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-k30-pro-launched-in-china-with-zoom-edition-64mp-quad-camera-4700mah-battery-price-specification/feed/ 0