Redmi K30i - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Sat, 27 Jun 2020 14:29:03 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 जगातील सर्वात स्वस्त 5G फोन असू शकतो Redmi K30i, Xiaomi च्या घोषणाच्या आधीच फोटो समोर आला https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-k30i-5g-photo-leaked-48mp-triple-rear-camera-single-punch-hole-display-revealed/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-k30i-5g-photo-leaked-48mp-triple-rear-camera-single-punch-hole-display-revealed/#respond Fri, 24 Apr 2020 07:17:00 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7503 Redmi K30i बद्दल बोलायचे तर हा रेडमी के30 आणि रेडमी के 30 प्रो चा छोटा आणि स्वस्त वर्जन असेल आणि हा 5G कनेक्टिविटी सह येईल.

The post जगातील सर्वात स्वस्त 5G फोन असू शकतो Redmi K30i, Xiaomi च्या घोषणाच्या आधीच फोटो समोर आला first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
अलीकडेच Xiaomi बद्दल बातमी आली होती कि कंपनी आपल्या ‘रेडमी के30’ सीरीजचा विस्तार करत यात अजून एक नवीन फोन जोडण्याची योजना बनवत आहे आणि हा फोन Redmi K30i नावाने लॉन्च केला जाईल. रेडमी के30आई संबंधित एका लीक मध्ये या फोनचे काही स्पेसिफिकेशन्स शेयर करण्यात आले होते तसेच या फोनच्या किंमतीचा खुलासा पण लीक मध्ये केला गेला होता. तर आज लॉन्चच्या आधीच Redmi K30i चा फोटो पण इंटरनेट वर वायरल झाला आहे.

Redmi K30i चा फोटो स्लॅशलीकच्या माध्यमातून समोर आला होता जो जीएसएम एरिनाने स्पॉट केला आहे. या फोटो मध्ये फोनचा फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स दाखवण्यात आले आहेत ज्यामुल्ले रेडमी के30आई च्या लुक आणि डिजाईनची माहिती मिळाली आहे. फ्रंट पॅनल पाहता इथे बेजल लेस पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे. हा पंच-होल स्क्रीनच्या वरच्या बाजूला कोपऱ्यावर आहे. स्क्रीनच्या तीन कांदा पूर्णपणे बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे.

रेडमी के30आई च्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. हा कॅमेरा सेटअप गोलाकार आहे ज्याच्यामध्ये तीन कॅमेरा सेंसर एकाच रांगेत वर्टिकल शेप मध्ये आहेत. तिन्ही सेंसर्सच्या खाली फ्लॅश आहे. सेटअपच्या राउंड शेप मध्ये सेंसरची माहिती लिहिण्यात आली आहे. इथे Redmi K30i च्या रियर कॅमेरा सेटअप मध्ये 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर दिला जाणार असल्याचे लिहिण्यात आले आहे.

फोनच्या रियर पॅनल वर खाली Redmi की ब्रँडिंग आहे जी वर्टिकल शेप मध्ये आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे तर डाव्या पॅनल वर सिम स्लॉट आहे. फोटो मध्ये फोनचा लोवर पॅनल दिसत नाही ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि इथे यूएसबी पोर्ट सह 3.5एमएम जॅक आणि स्पीकर पण दिला जाईल.

Redmi K30i बद्दल बोलायचे तर हा रेडमी के30 आणि रेडमी के 30 प्रो चा छोटा आणि स्वस्त वर्जन असेल आणि हा 5G कनेक्टिविटी सह येईल. Xiaomishka नावाच्या टिपस्टरनुसार Redmi K30i मॉडेल रेडमीच्या सीरीज लाइनअपचा पहिला फोन असेल जो कि कमी किंमतीत सादर केला जाईल. तसेच फोनच्या किंमतीबद्दल पण माहिती देण्यात आली आहे. सांगण्यात आले आहे कि हा फोन RMB 1,799 म्हणजे जवळपास 19,500 रुपयांमध्ये लॉन्च होईल. विशेष म्हणजे असे जर झाले तर रेडमी के30आई जगातील सर्वात स्वस्त 5जी फोन असू शकतो.

The post जगातील सर्वात स्वस्त 5G फोन असू शकतो Redmi K30i, Xiaomi च्या घोषणाच्या आधीच फोटो समोर आला first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-k30i-5g-photo-leaked-48mp-triple-rear-camera-single-punch-hole-display-revealed/feed/ 0
48MP क्वाड कॅमेऱ्यासह येऊ शकतो Redmi K30i, जाणून घ्या कधी होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/redmi-k30i-come-with-48mp-quad-cameras/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-k30i-come-with-48mp-quad-cameras/#respond Tue, 21 Apr 2020 14:27:36 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7564 Redmi K30i च्या किंमत बद्दल बोलले जात आहे कि हा RMB 1,799 (जवळपास 19,500 रुपये) मध्ये सादर केला जाईल.

The post 48MP क्वाड कॅमेऱ्यासह येऊ शकतो Redmi K30i, जाणून घ्या कधी होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Redmi च्या नवीन फोन बद्दल माहिती समोर आली आहे कि कंपनी K30i नावाच्या फोन वर काम करत आहे. हा गेल्यावर्षी डिसेंबर 2019 मध्ये लॉन्च झालेल्या Redmi K30 5G चा अफोर्डेबल वर्जन असेल. भारतात Redmi K30 चा 4G वर्जन POCO X2 नावाने सादर केला गेला होता.

याव्यतिरिक्त ब्रँडने यावर्षी मार्च मध्ये Redmi K30 Pro फ्लॅगशिप फोन चीन मध्ये सादर केला होता जो रेडमी के 20 प्रो चा अपग्रेडेड वर्जन होता. Redmi K30i बद्दल बोलायचे तर हा रेडमी के30 आणि रेडमी के 30 प्रो चा छोटा आणि स्वस्त वर्जन असेल.

Xiaomishka नावाच्या टिपस्टरचे म्हणणे आहे कि Redmi K30i मॉडेल रेडमी के सीरीज लाइनअपचा पहिला फोन असेल जो कमी किंमतीत सादर केला जाईल. याव्यतिरिक्त टिप्सटरने दावा केला आहे कि फोन 48MP सेंसर सह सादर केला जाईल. याव्यतिरिक्त फोनच्या किंमत बद्दल पण माहिती देण्यात आली आहे.

Redmi K30i च्या किंमत बद्दल बोलले जात आहे कि हा RMB 1,799 (जवळपास 19,500 रुपये) मध्ये सादर केला जाईल. तसेच Redmi K30i मध्ये 5G कनेक्टिविटी असेल. सध्या फोनच्या स्पेसिफिकेशन्स बद्दल जास्त माहिती समोर आलेली नाही.

Redmi K30

रेडमी के30 मध्ये कंपनीने 6.67-इंचाचा फुल-एचडी+ (1080×2400 पिक्सल) डिस्प्ले दिला आहे जो होल-पंच डिजाइन सह येतो. Redmi K30 स्मार्टफोन स्नॅपड्रॅगॉन 765 5जी प्रोसेसर सह येतो. या नवीन प्रोसेसरला 5जी सपोर्ट देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त फोन तीन रॅम आणि तीन स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे.

फोटोग्राफी पाहता रेडमी के30 मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. स्मार्टफोन मध्ये 64 मेगापिक्सल सोनी आईएमएक्स686 प्राइमरी कॅमेरा सेंसर, 5 मेगापिक्सल मॅक्रो लेंस, 8 मेगापिक्सल वाइड अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सल डेप्थ ऑफ फिल्ड आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर डुअल सेल्फी कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात 20 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सल कॉम्बिनेशन कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे.

रेडमी फोन मध्ये जीव ओतण्यासाठी 4,500 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 30 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सह येते. कंपनीचा दावा आहे कि Redmi K30 को फक्त 60 मिनिटांत फुल चार्ज केला जाऊ शकतो. Redmi K30 क्विक चार्ज आणि यूएसबी पावर डिलवरी सपोर्ट देण्यात आला आहे.

The post 48MP क्वाड कॅमेऱ्यासह येऊ शकतो Redmi K30i, जाणून घ्या कधी होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-k30i-come-with-48mp-quad-cameras/feed/ 0