Redmi K60i - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 01 Jun 2023 05:36:35 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Redmi K60i लवकरच होऊ शकतो भारतात लाँच, मिळू शकतात Note 12T Pro सारखे स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/redmi-k60i-may-launch-in-india-as-rebranded-redmi-note-12t-pro/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-k60i-may-launch-in-india-as-rebranded-redmi-note-12t-pro/#respond Thu, 01 Jun 2023 05:36:35 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21299 Redmi Note 12T Pro अलीकडेच चीनमध्ये लाँच झाला आहे जो 12GB RAM आणि MediaTek Dimensity 8200 चिपसेटला सपोर्ट करतो. ह्या फोनशी निगडित बातमी आली आहे की हा शाओमी मोबाइल भारतात Redmi K60i 5G नावानं सादर केला जाऊ शकतो. ह्या डिवाइसमध्ये मिळणार फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत देखील जवळपास एक सारखी असू शकते. Redmi K60i असेल का […]

The post Redmi K60i लवकरच होऊ शकतो भारतात लाँच, मिळू शकतात Note 12T Pro सारखे स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Redmi K60i भारतात लाँच होऊ शकतो.
  • फीचर्स Note 12T Pro सारखे असू शकतात.
  • गेल्यावर्षी असा Redmi K50i आला होता.

Redmi Note 12T Pro अलीकडेच चीनमध्ये लाँच झाला आहे जो 12GB RAM आणि MediaTek Dimensity 8200 चिपसेटला सपोर्ट करतो. ह्या फोनशी निगडित बातमी आली आहे की हा शाओमी मोबाइल भारतात Redmi K60i 5G नावानं सादर केला जाऊ शकतो. ह्या डिवाइसमध्ये मिळणार फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत देखील जवळपास एक सारखी असू शकते.

Redmi K60i असेल का रीब्रँडेड Note 12T Pro?

शाओमीनं गेल्यावर्षी Redmi Note 11T Pro आधी चीनमध्ये सादर केला होता जो नंतर Redmi K50i नावानं जागतिक बाजारात आला होता. तसेच आता Note 12T Pro चीनमध्ये लाँच झाला आहे आणि त्यामुळे चर्चा सुरु झाली की गेल्यावर्षी प्रमाणे हा नवीन नाव Redmi K60i सह जागतिक बाजारात येऊ शकतो. कंपनीनं ह्याबाबत कोणतीही माहिती दिली नाही परंतु डिवाइसचे फीचर्स देखील जवळपास सारखेच असू शकतात.

रेडमी नोट 12टी प्रो चायना प्राइस

चीनमध्ये हा स्मार्टफोन 4 स्टोरेज ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे. ह्याच्या 8GB रॅम + 128GB ऑप्शनची किंमत भारतीय करंसी नुसार सुमारे 18,600 रुपये आहे. तर 12जीबी रॅम + 512 जीबी स्टोरेज असेलल्या फोनच्या टॉप मॉडेलची किंमत जवळपास 23,300 रुपये आहे. अंदाज लावला जात आहे की Redmi K60i भारतात मिड बजेटमध्ये लाँच केला जाऊ शकतो.

रेडमी नोट 12टी प्रोचे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : रेडमी नोट 12टी प्रो मध्ये 6.6 इंच एफएचडी+ डिस्प्ले आहे. ज्यात 2460 x 1080 पिक्सेल रिजॉल्यूशन, 144Hz रिफ्रेश रेट, 20.5:9 अ‍ॅस्पेक्ट रेश्यो आणि 650 निट्स ब्राइटनेस मिळते.
  • प्रोसेसर : Redmi Note 12T Pro डिवाइस मीडियाटेक डायमेन्सिटी 8200 अल्ट्रा प्रोसेसरसह आला आहे. ग्राफिक्ससाठी फोनमध्ये माली जी610 जीपीयू देण्यात आला आहे.
  • स्टोरेज : डिवाइसमध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत इंटरनल स्टोरेज आहे.
  • बॅटरी : 5080 एमएएच बॅटरी आणि 67W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो.
  • कॅमेरा : रेडमी नोट 12टी प्रो ट्रिपल कॅमेरा असलेला फोन आहे ह्यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी, 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
  • OS : ऑपरेटिंग सिस्टम पाहता डिवाइस अँड्रॉइड 13 आधारित मीयुआय 14 वर चालतो.

The post Redmi K60i लवकरच होऊ शकतो भारतात लाँच, मिळू शकतात Note 12T Pro सारखे स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-k60i-may-launch-in-india-as-rebranded-redmi-note-12t-pro/feed/ 0