Redmi Note 8T - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 29 Oct 2019 10:10:54 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 4000एमएएच बॅटरी आणि स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर लॉन्च होईल Xiaomi Redmi Note 8T, फोनचा खरा फोटो आला समोर https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-8t-real-image-snapdragon-665-4000mah-battery-specifications-revealed/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-8t-real-image-snapdragon-665-4000mah-battery-specifications-revealed/#respond Tue, 29 Oct 2019 10:10:54 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5605 या लीक मध्ये फोनच्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे.

The post 4000एमएएच बॅटरी आणि स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर लॉन्च होईल Xiaomi Redmi Note 8T, फोनचा खरा फोटो आला समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi च्या ‘रेडमी नोट’ सीरीज मध्ये लॉन्च झालेले Redmi Note 8 Pro आणि Redmi Note 8 स्मार्टफोन भारतीय बाजारात हिट झाले आहेत. Note 8 Pro ब्रँडचा पहिला स्मार्टफोन आहे जो 64 मेगापिक्सलच्या रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. अनेक दिवसांपासून बातम्या येत होत्या कि शाओमी हि सीरीज वाढवत अजून एक नवीन स्मार्टफोन Redmi Note 8T लॉन्च करण्याची तयारी करत आहे. गेल्या आठवड्यात एका लीक मध्ये Redmi Note 8T च्या बॅक पॅनलचा फोटो समोर आला होता तर आज रेडमी नोट 8टी चा खरा फोटो पण इंटरनेट वर वायरल झाला आहे.

Redmi Note 8T संबंधित या नवीन लीक मध्ये फोनचा खरा फोटो शेयर केला गेला आहे. इंडियन टिप्सटरने शेयर केलेल्या या फोटो मध्ये Redmi Note 8T ची रियल ईमेज दाखवण्यात आली आहे. फोटो मध्ये फोन डिस्प्ले वर स्क्रीनगार्ड आहे ज्यावर फोनचे स्पेसिफिकेशन्स आहेत. या नवीन लीक मध्ये एकीकडे स्पष्ट झाले आहे कि Redmi Note 8T लवकरच बाजारात येणार आहे तर दुसरीकडे या लीक मध्ये फोनच्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे.

Redmi Note 8T

Redmi Note 8T च्या या फोटोवरून समजले आहे कि रेडमी नोट सीरीजचा हा आगामी स्मार्टफोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोनच्या रियर पॅनल वर 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर दिला जाईल जो एआई टेक्नॉलॉजी सह येईल. Redmi Note 8T च्या क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मध्ये अल्ट्रा वाइड अँगल आणि एक मॅक्रो लेंस असेल. शाओमी आपला हा फोन 6.3 इंचाच्या डॉटनॉच डिस्प्ले सह लॉन्च करेल तसेच रेडमी नोट 8टी चे फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्ट केले जातील.

समोर आलेल्या फोटोनुसार Redmi Note 8T क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 665 एआईई चिपसेट वर लॉन्च केला जाईल. या फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 4,000एमएएच ची बॅटरी असेल जी 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करेल. Redmi Note 8T मध्ये बॅटरी चार्ज साठी यूएसबी टाईप सी पोर्ट दिला जाईल. त्याचबरोबर Redmi Note 8T मध्ये एनएफसी सपोर्ट मिळेल.

डिजाईन

Redmi Note 8T च्या फ्रंट पॅनल वर वरच्या बाजूला ‘यू’ शेप नॉच असेल. तसेच बॅक पॅनल वर डावीकडे क्वॉड रियर कॅमेरा सेटअप आहे. हा कॅमेरा सेटअप वर्टिकल शेप मध्ये आहे तर कॅमेरा सेटअपच्या उजव्या बाजूला फ्लॅश लाईट आहे. Redmi Note 8T च्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे जो Redmi Note 8 सीरीजच्या स्मार्टफोन्स मध्ये दिसला नव्हता. फोनच्या खालच्या पॅनल वर यूएसबपी पोर्टच्या एका बाजूला स्पीकर आणि दुसऱ्या बाजूला 3.5एमएम जॅक देण्यात आला आहे. टिपस्टर नुसार Xiaomi आपला हा आगामी स्मार्टफोन ब्लॅक, व्हाइट आणि ब्लू तीन कलर वेरिएंट मध्ये बाजारात येईल.

The post 4000एमएएच बॅटरी आणि स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर लॉन्च होईल Xiaomi Redmi Note 8T, फोनचा खरा फोटो आला समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-8t-real-image-snapdragon-665-4000mah-battery-specifications-revealed/feed/ 0