Redmi Pro 6 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 25 Jun 2018 05:51:26 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 शाओमी रेडमी 6प्रो लॉन्च, नॉच डिस्प्ले सह 4,000एमएएच बॅटरी, डुअल कॅमेरा आणि 4जीबी रॅम https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6-pro-launched-with-notch-display-4000mah-battery-dual-camera-and-4-gb-ram/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6-pro-launched-with-notch-display-4000mah-battery-dual-camera-and-4-gb-ram/#respond Mon, 25 Jun 2018 05:25:44 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1026 चीनी बाजारात हा स्मार्टफोन रेड, चेरी, ब्लू, ब्लॅक आणि गोल्ड कलर वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे जो उद्या पासून म्हणजे 26 जून पासून तिथे सेल साठी उपलब्ध होईल.

The post शाओमी रेडमी 6प्रो लॉन्च, नॉच डिस्प्ले सह 4,000एमएएच बॅटरी, डुअल कॅमेरा आणि 4जीबी रॅम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी अंर्तराष्ट्रीय बाजारात खुप आक्रमक दिसत आहे. मागच्या काही महिन्यांमध्ये कंपनी ने एका नंतर एक अनेक स्मार्टफोन व स्मार्ट डिवाईस लॉन्च केले आहेत. काही दिवसांपूर्वी लॉन्च झालेल्या रेडमी 6 सीरीज च्या स्मार्टफोन नंतर आता कंपनी ने अजून एक नवीन स्मार्टफोन रेडमी 6प्रो लॉन्च केला आहे. शाओमी ने हा डिवाईस लो बजट सेग्मेंट मध्ये सादर केला आहे ज्यात कमी किंमतीत शानदार लुक आणि दमदार स्पेसिफिकेशन्स आहेत.

रेडमी 6प्रो के फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे ज्यात नॉच आहे. फोन मध्ये 2280 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 5.84-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन लेटेस्ट एंडरॉयड सह मीयूआई 9 ला सपोर्ट करतो तसेच प्रोसेसिंग साठी यात आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 625 चिपसेट देण्यात आला आहे.

शाओमी ने आपल्या या फोन मध्ये एआई टेक्निक दिली आहे. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर वर्टिकल शेप मध्ये डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात एलईडी फ्लॅश आहे. डुअल रियर कॅमेरा 12-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चा आहे तर फोन च्या फ्रंट पॅनल वर नॉच मधील सेल्फी कॅमेरा 5-मेगापिक्सल चा आहे. फोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे त्याचबरोबर हा फोन फेस अनलॉक टेक्निकला पण सपोर्ट करतो.

रेडमी 6प्रो रियल डुअल सिम फोन आहे ज्यात 2 ​सिम स्लॉट सोबत 256जीबी पर्यंतचा माइक्रोएसडी कार्ड वापरता येईल. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह फोन मध्ये 4,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. चीनी बाजारात हा स्मार्टफोन रेड, चेरी, ब्लू, ब्लॅक आणि गोल्ड कलर वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे जो उद्या पासून म्हणजे 26 जून पासून तिथे सेल साठी उपलब्ध होईल.

शाओमी ने रेडमी 6प्रो तिन स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर करण्यात आला आहे. पहिला वेरिएंट 3जीबी रॅम सह 32जीबी मेमरी ला सपोर्ट करतो तसेच याची किंमत 999 युआन (​जवळपास 10,500 रुपये) आहे. दुसरा वेरिएंट 4जीबी रॅम व 32जीबी मेमरी सह 1,199 युआन (​जवळपास 12,500 रुपये) मध्ये लॉन्च झाला आहे तसेच तिसर्‍या वेरिएंट ची किंमत 1,299 युआन (​जवळपास 13,500 रुपये) ठेवण्यात आली आहे आणि हा 4जीबी रॅम सह 64जीबी च्या इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो.

The post शाओमी रेडमी 6प्रो लॉन्च, नॉच डिस्प्ले सह 4,000एमएएच बॅटरी, डुअल कॅमेरा आणि 4जीबी रॅम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6-pro-launched-with-notch-display-4000mah-battery-dual-camera-and-4-gb-ram/feed/ 0