Reno 3 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 02 Mar 2020 12:12:20 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 64 MP कॅमेरा, 8 GB रॅम आणि 256 GB मेमरी सह झाला लॉन्च Oppo Reno 3 Pro, जाणून घ्या किंमत https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-3-pro-64mp-8gb-ram-256gb-storage-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-3-pro-64mp-8gb-ram-256gb-storage-price-sale/#respond Mon, 02 Mar 2020 12:12:20 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6713 OPPO Reno 3 Pro चा 8जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज वेरीएंट कंपनीने 29,990 रुपये आणि 8जीबी रॅम व 256जीबी स्टोरेज वेरिएंट 32,990 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे.

The post 64 MP कॅमेरा, 8 GB रॅम आणि 256 GB मेमरी सह झाला लॉन्च Oppo Reno 3 Pro, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Oppo Reno 3 Pro आज भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. हा फोन आधी चीन मध्ये लॉन्च केला गेला आहे. पण स्पेसिफिकेशन्स आणि लुकच्या बाबतीत भारतात लॉन्च झालेला रेनो 3 प्रो खूप वेगळा आहे. लॉन्चच्या आधीच कपंनीने फोनचे अनेक फीचर्स समोर ठेवले होते. तर आता फोनची किंमत आणि इतर फीचर्सची माहिती समोर आली आहे.

डिजाइन

सर्वात आधी OPPO Reno 3 Pro च्या लुक आणि डिजाइन बद्दल बोलायचे तर हा स्मार्टफोन डुअल पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च झाला आहे. चीन मध्ये हा फोन सिंगल पंच-होल वर लॉन्च झाला होता. हा फोन बेजल लेस डिजाईन सह येईल ज्याच्या तीन कडा पूर्णपणे बॉडी पार्टशी मिळतात आणि खालच्या बाजूला बारीकसा बॉडी पार्ट दिला जाईल. फोन डिस्प्लेच्या वर डावीकडे दोन असतील आणि यात फोनचे दोन सेल्फी कॅमेरे आहेत.

OPPO Reno 3 Pro चा रियर पॅनल पाहता यात क्वॉड रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो वर उजवीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये चार कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत, ज्या सोबत फ्लॅश लाईट आहे. इस कॅमेरा सेटअप मध्ये कॅमेरा सेंसरची माहिती लिहिण्यात आली आहे. रेनो 3 प्रो च्या बॅक पॅनल वर खालच्या बाजूला OPPO ची ब्रॅण्डिंग आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर सोबतच पावर बटन देण्यात आला आहे. तसेच OPPO Reno 3 Pro च्या खालच्या पॅनल वर मधोमध यूएसबी पोर्ट आहे ज्याच्या उजवीकडे स्पीकर आणि डावीकडे 3.5एमएम जॅक देण्यात आला आहे.

किंमत आणि सेल डिटेल

OPPO Reno 3 Pro चा 8जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज वेरीएंट कंपनीने 29,990 रुपये आणि 8जीबी रॅम व 256जीबी स्टोरेज वेरिएंट 32,990 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. ओपो रेनो 3 प्रो च्या 8जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज वेरिएंटची विक्री 6 मार्च पासून फ्लिपकार्ट आणि अमेझॉन इंडिया सोबत ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर केली जाईल.

तसेच फोन विकत घेतल्यास कंपनी कडून एचडीएफसी आणि आईसीआईसीआई कार्ड धारकांनासोबतच आरबीएल क्रेडिट कार्ड व येस बॅंक क्रेडिट कार्ड यूजर्सना 10 टक्के कॅशबॅक दिला जाईल.

स्पेसिफिकेशन्स

रेनो 3 प्रो चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.4 इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले डुअल पंच होल सह देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये 8GB रॅम सोबतच 128GB आणि 256GB ची स्टोरेज देण्यात आली आहे. सोबतच फोन मध्ये मीडियाटेक P95 चिपसेट देण्यात आला आहे. ओपो रेनो 3 प्रो डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो.

दमदार कॅमेरा

फोनच्या मागे क्वाड रियर कॅमेरा सेटअप मध्ये प्राइमरी कॅमेरा 64 मेगापिक्सल आणि 13 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस असेल. तसेच मागे 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड-अँगल कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलची मोनोक्रोम लेंस देण्यात आली आहे. ओप्पो रेनो 3 प्रो ‘अल्ट्रा नाइट सेल्फी मोड’ सह लिस्ट केला गेला आहे. तसेच फ्रंटला 44 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. हा फोन 2 मेगापिक्सलच्या सेकेंडरी सेंसरला सपोर्ट करेल जो एक डेफ्थ सेंसर आहे.

बॅटरी आणि कनेक्टिविटी ऑप्शन

सिक्योरिटीसाठी या फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तसेच स्मार्टफोन 30W VOOC फ्लॅश चार्ज 4.0 टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो आणि फोन मध्ये 4,025एमएएच ची मोठी बॅटरी मिळेल. ओप्पो रेनो 3 प्रो फोन ऑरा ब्लू, मिडनाइट ब्लॅक आणि स्काई व्हाइट रांगांमध्ये सादर केला गेला आहे.

The post 64 MP कॅमेरा, 8 GB रॅम आणि 256 GB मेमरी सह झाला लॉन्च Oppo Reno 3 Pro, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-3-pro-64mp-8gb-ram-256gb-storage-price-sale/feed/ 0