RIL AGM 2020 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 15 Jul 2020 11:20:37 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Jio 5G ची झाली घोषणा, मुकेश अंबानींनी पुन्हा केला धमाका, रिलायंस जियो बाबत केल्या या मोठ्या घोषणा https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-43rd-annual-general-meeting-announcement/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-43rd-annual-general-meeting-announcement/#respond Wed, 15 Jul 2020 11:15:44 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7650 भारतात टेक्नॉलॉजी चार पाऊले पुढे नेट रिलायंस जियोने आज भारतात आपला आधुनिक Jio Glass लॉन्च केला आहे.

The post Jio 5G ची झाली घोषणा, मुकेश अंबानींनी पुन्हा केला धमाका, रिलायंस जियो बाबत केल्या या मोठ्या घोषणा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Reliance Jio जेव्हापासून अस्तित्वात आली आहे तेव्हापासून कंपनीचा स्थर सतत वाढत आहे. जियोने सुरवातीला लोकांना मोफत मध्ये सिम आणि टेलीकॉम सेवा दिली होती. Jio ही देशातील एकमेव अशी दूरसंचार कंपनी आहे जी फक्त 4G नेटवर्क देते. दरवेळी रिलायंस जियो आपल्या ग्राहक आणि फॅन्ससाठी काही ना काही असे घेऊन येते जे फक्त नवीन नव्हे तर जुन्या जुन्या सेवांपेक्षा पण स्वस्त असते. Jio Phone आणि Jio Fiber सारख्या सेवा देणाऱ्या रिलायंस जियोच्या ANNUAL GENERAL MEETING (AGM) ची प्रतीक्षा फक्त यूजरना नाहीतर बाजाराला पण असते. मुकेश अंबानी यांनी आज पुन्हा या मंचावरून नवीन घोषणा करत आपल्या यूजर्सना मोठी भेट दिली आहे.

Jio 5G : रिलायंस जियोने आपल्या यूजर्सना भेट देत आज देशात 5जी नेटवर्क आणण्याची घोषणा केली आहे. जियोच्या या घोषणेने फक्त मोबाईल यूजर्सना नाही तर देशातील इतर टेलीकॉम कंपन्यांना पण धक्का बसला आहे. Jio 5G विषयी बोलताना मुकेश अंबानी म्हणाले कि 5जी साठी कंपनीची तयारी पूर्ण झाली आहे आणि लवकरच कंपनी देशात 5जी नेटवर्कचे ट्रायल सुरु करेल. पुढल्या वर्षी म्हणजे 2021 मध्ये Jio 5G मोबाईल यूजर्सना उपलब्ध होऊ शकतात.

Jio Glass : भारतात टेक्नॉलॉजी चार पाऊले पुढे नेट रिलायंस जियोने आज भारतात आपला आधुनिक Jio Glass लॉन्च केला आहे. हा स्मार्ट चश्मा हाई रेज्ल्यूशन डिस्प्ले सह येतो ज्याच्या दोन्ही दांड्यांवर स्पीकर्स आहेत. Jio Glass मध्ये कंपनीने 25 पेक्षा जास्त ऍप्लिकेशन्स दिले आहेत. या चष्म्याचे वजन 75 ग्राम आहे.

Jio SmartPhone : रिलायंस जियो गूगल सोबत भागेदारी मध्ये एंडरॉयड आधारित स्मार्टफोन ऑपरेटिंग सिस्टम वर पण काम करेल, ज्याची घोषणा मुकेश अंबानी यांनी आज एजीएमच्या मंचावरून केली आहे. या घोषणेदरम्यान अंबानी यांनी स्पष्टपणे जियोच्या स्मार्टफोनबाबत काही सांगितले नाही पण कंपनीचे 5जी घेऊन येणे आणि एंडरॉयड ओएस बनवणे या गोष्टी येत्या काळात Jio Phones नंतर Jio SmartPhone पण बाजारात लॉन्च केले जातील याकडे ईशारा करतात.

विकले गेले 10 कोटी Jio Phones : मुकेश अंबानी यांनी AGM 2020 च्या मंचावरून घोषणा केली आहे कि कंपनी द्वारे बनवण्यात आलेले 4जी फीचर फोन Jio Phone आणि Jio Phone 2 यांनी विक्रीचे नवीन विक्रम बनवले आहेत. अंबानींच्यानुसार दोन्ही जियो फोन्सनी मिळून 100 मिलियन म्हणजे 100,000,000 युनिटची विक्री केली आहे.

Jio Meet : जियोमिट बाबत मुकेश अंबानी यांनी सांगितले आहे कि लॉन्च नंतर हे वीडियो कॉन्फ्रेंस ऍप 5 मिलियन पेक्षा पण जास्त वेळा डाउनलोड केला गेला आहे. हैराणीची बाब म्हणजे Jio Meet च्या निर्मितीसाठी जियो टीमला फक्त 2 महिने लागले होते आणि हा भारतातील पहिला क्लाउड सर्वर वर चालणारा ऑनलाईन वीडियो कॉन्फ्रेंसिंग ऍप आहे.

Google Investment : जियो AGM 2020 च्या मंचावरून मुकेश अंबानी यांनी सांगितले आहे कि टेक दिग्गज गूगलने रिलायंस जियो मध्ये 7.7 टक्के गुंतवणूक केली आहे. Jio मध्ये गुंतवणूक केलेल्या या छोट्या शेयरची रक्कम 33,737 कोटी रूपये आहे. Google आणि Jio मिळून देशात ‘डिजीटल इंडिया’ साठी काम करतील.

The post Jio 5G ची झाली घोषणा, मुकेश अंबानींनी पुन्हा केला धमाका, रिलायंस जियो बाबत केल्या या मोठ्या घोषणा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-43rd-annual-general-meeting-announcement/feed/ 0