Rooting - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 03 Oct 2018 14:10:28 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 फोन रूटिंग म्हणजे काय आणि का करू नये फोन रूट https://www.91mobiles.com/marathi/what-is-rooting-of-phone-should-we-root-phone-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/what-is-rooting-of-phone-should-we-root-phone-in-marathi/#respond Wed, 03 Oct 2018 14:10:28 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2353 अनेकजण फोन रूटिंगची मदत घेतात जेणेकरून ते हार्डवेयर आणि सॉफ्टवेयर दोन्ही वर नियंत्रण मिळवू शकतील.

The post फोन रूटिंग म्हणजे काय आणि का करू नये फोन रूट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
एंडरॉयड फोन बद्दल बोलले जाते की हा एक ओपन प्लॅटफॉर्म आहे आणि या ओएस सोबत तुम्ही जे हवे ते करू शकता. तुम्ही स्वतःहून आॅपरेटिंग सिस्टम मोडिफिकेशन करू शकता, आवडी प्रमाणे यूआई, रॅम व मेमरी लिमिट सेट करू शकता. परंतु एंडरॉयड फोन जेव्हा हातात येतो तेव्हा तुम्हाला मर्यादित एक्सेस दिला जातो. तुम्ही फोन मध्ये वॉलपेपर्स, थीम आणि अॅप्सची सेटिंग करू शकता त्यापेक्षा जास्त काही नाही. जास्तीत जास्त म्हणजे तुम्ही अॅप इंस्टॉल किंवा अनइंस्टॉल करू शकाल पण रॅम डिफाइन आणि ओवर क्लॉकिंग इत्यादीचा वापर तुम्ही करू शकत नाही. त्याचे कारण म्हणजे एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम जरी ओपन प्लॅटफॉर्म असले तरी तुमचे फोन निर्माता त्यातील मर्यादा ठरवतात. तेच फोनचा कोर ज्याला तांत्रिक भाषेत रूट पण म्हणतात तो लॉक करतात. त्यामुळे तुम्ही हार्डवेयर सोबत छेड-छाड करू शकत नाही. रॅम आणि प्रोसेसर लिमिट तर सोडाच सेटिंग इत्यादी मध्ये पण तुम्ही जास्त बदल करू शकत नाही. याच कारणामुळे अनेकजण फोन रूटिंगची मदत घेतात जेणेकरून ते हार्डवेयर आणि सॉफ्टवेयर दोन्ही वर नियंत्रण मिळवू शकतील.

पण प्रश्न असा आहे की फोन रूटिंग योग्य आहे का? आपण आपला फोन रूट केला पाहिजे का? जर तुम्ही मला विचारलेत तर मी हेच सांगेन की जर तुम्ही तुमच्या फोन वर भरपूर काही टेस्ट करत असाल तर मग रूट करू शकता पण जर तुम्ही अॅप्सचा वापर जास्त करत असाल आणि कॅमेरा व म्यूजिकचा वापर जास्त करत असाल तर रूट करू नये. कारण त्यामुळे फोनचे खुप नुकसान होऊ शकते. खाली आम्ही याची सविस्तर माहिती दिली आहे पण त्याआधी रूट म्हणजे काय हे जाणून घेऊया.

रूटिंग म्हणजे काय?

एंडरॉयड गूगल द्वारा निर्मित मोबाइल आॅपरेटिंग सिस्टम आहे ज्याचा वापर कोणताही मोबाइल फोन निर्माता करू शकतो. हा एक ओपन प्लॅटफॉर्म आहे त्यामुळे मोबाईल निर्माता गूगल च्या या आॅपरेटिंग सिस्टमला आपल्या नुसार कस्टमाइज करतात अर्थात त्यात बदल करतात. तुम्ही बघितलेच असेल की सॅमसंगच्या फोन मध्ये सॅमसंग एक्सपीरियंस, शाओमी मी यूआई, वीवो फनटच, ओपो कलर ओएस आणि हुआवई इमोशन यूआई चा वापर करते. या सर्व कंपन्या एंडरॉयड ओएस आधारित आहेत पण वेगवेगळ्या यूजर इंटरफेस सह. त्याचबरोबर ते ओएस मर्यादित करतात. त्यामुळे तुम्ही हार्डवेयर किंवा सॉफ्टवेयरचा तेवढाच वापर करू शकता जेवढा तुम्हाला एक्सेस दिला जातो. परंतु फोन रूट केल्याने तुम्ही एक सुपर यूजर बनू शकता. रूट केल्यानंतर तुम्ही त्या गोष्टी एक्सेस करू शकता ज्यावर कंपनीने मर्यादा ठेवल्यात. रूट करण्या आधी फोन च्या आॅपरेटिंग सिस्टमचे व्यवस्थापन निर्मात्याकडे असते पण रूट केल्यानंतर व्यवस्थापनाचे आधिकार तुमच्याकडे येतात.

का म्हणतात याला रूटिंग?

तुम्हाला तर माहिती आहे की रूट म्हणजे मूळ आणि रूटिंग मध्ये तुम्ही आॅपरेटिंग सिस्टम चे मुळ अर्थात कोर अनलॉक करता. एंडरॉयड स्मार्टफोन लिनक्स वर आधारित आहे आणि रूट शब्द यूनिक्स/लिनक्स आॅपरेटिंग सिस्टम मधून आला आहे. सर्वात आधी लिनक्स आणि यूनिक्स कंप्यूटर मध्ये उपलब्ध प्रीइंस्टॉल ओएस काढून त्याजागी कस्टम ओएस टाकण्याचा पर्याय देण्यात आला होता. यातून यूजरला सुपर पावर देण्यात आली ज्यातून त्याला आपल्या पीसी मधील सर्व फाइल्स आणि प्रोग्राम मध्ये बदल करण्याचा अधिकार मिळतो.

हेच अधिकार एंडरॉयड स्मार्टफोन मध्ये दिले जातात. फोन रूट करून तुम्ही यात कस्टम ओएस इंस्टॉल करू शकता आणि मग फाइल, फोल्डर, सॉफ्टवेयर आणि यूजर इंटरफेस चा पण कोड बदलू शकता. यात तुम्ही ओएस च्या मुळाशी बदल करू शकता. आणि याचमुळे याला रूट चे नाव देण्यात आले आहे. फोन रूट करताच एडमिनिस्ट्रेटर राइट अर्थात व्यवस्थापन हक्क फोन निर्मात्याकडे न राहता तुमच्याकडे येतात.

रूट नंतर आॅपरेटिंग सिस्टम बदलते का?

वर सांगितल्याप्रमाणे फोन रूट केल्यानंतर तुम्ही यात कस्टम ओएस इंस्टॉल करता. यावरून तुम्हाला प्रश्न पडू शकतो की फोनची आॅपरेटिंग सिस्टम बदलते का? तर लक्षात घ्या की आॅपरेटिंग सिस्टम एंडरॉयडच असते पण यात कस्टम रोम टाकला जातो. कस्टम रोम नेहमीच्या एंडरॉयड आपरेटिंग सिस्टम पेक्षा थोडा जास्त एडवांस असतो. एडवांस यासाठी कारण यात तुम्ही तुमच्या गरजेनुसार फीचर्स सेट करू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पावर बटन वर कॅमेरा आणि वॉल्यूम बटन वर स्क्रीन आॅन आॅफ सेट करू शकता. त्याचबरोबर हाई ग्राफिक्स आणि लो ग्राफिक्स वाल्या गेम मध्ये प्रोसेसर आणि रॅम ची मर्यादा पण वेगवेगळी ठरवू शकता.

रूट करणे योग्य आहे का?

मी आधीच सांगितले आहे की फोन रूट करणे योग्य नाही. याची कारणे अनेक आहेत. सर्वात पहिले कारण म्हणजे रूट करताच फोनची वारंटी संपते. जर फोन मध्ये एखादा बिघाड झाला तर त्याला मोबाईल फोन निर्माता जबाबदार नसतो. रूट करताना तुम्ही आॅपरेटिंग सिस्टम च्या कोर मध्ये काम करत असता त्यात जर थोडी चूक झाली तर तुमचा फोन कायमचा बंद पडू शकतो. तो कोणत्याच कामाचा राहणार आहे. तसेच अनेक मोबाईल निर्माता ओएस आशा प्रकारे मोडिफाई करतात की तुम्ही सहज रूट करू शकत नाही.

पण गूगल आपल्या पिक्सल फोन मध्ये कोड सोप्पा ठेवते ज्यामुळे डेवलपर्स सहज रूट करू शकतात. तसेच वनप्लस आणि एचटीसी सारखे निर्माते पण रूट एक्सस सोप्पा ठेवतात. असे असूनही मी हेच म्हणेन की फोन रूट करण्याचा प्रयत्न करू नये.

The post फोन रूटिंग म्हणजे काय आणि का करू नये फोन रूट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/what-is-rooting-of-phone-should-we-root-phone-in-marathi/feed/ 0