S Pen - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Aug 2018 08:10:07 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 ‘एस पेन’ ने घेता येतील फोटो ​आणि हात न लावता चालेल गॅलेक्सी नोट 9, जाणून घ्या या छोट्या डिवाईस चे 5 मोठे फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/5-amazing-feature-of-samsung-galaxy-note-9-s-pen-with-bluetooth-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/5-amazing-feature-of-samsung-galaxy-note-9-s-pen-with-bluetooth-in-marathi/#respond Fri, 10 Aug 2018 08:10:07 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1675 ब्लूटूथ कनेक्टिविटी एस पेन ला अल्टीमेट रिमोट कंट्रोल बनवते ज्यामुळे हा गॅलेक्सी नोट 9 सोबत कनेक्ट करून फोन चा हॅण्डस फ्री यूज केला जाऊ शकतो.

The post ‘एस पेन’ ने घेता येतील फोटो ​आणि हात न लावता चालेल गॅलेक्सी नोट 9, जाणून घ्या या छोट्या डिवाईस चे 5 मोठे फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग ने काल भरपुर प्रतीक्षेनंतर आपला सर्वात ताकदवान डिवाईस गॅलेक्सी नोट 9 जगासमोर आणला. गॅलेक्सी नोट 9 चा लॉन्च ईवेंट न्यूयार्क मध्ये आयोजित करण्यात आला होता. जो भारतातील टेक प्रेमी पण बघत होते. ईवेंट च्या मंचावरून सॅमसंग ने दमदार डिवाईस गॅलेक्सी नोट 9 सोबत दोन शानदार व स्टाइलिश स्मार्ट वॉच पण सादर केले आहेत. या मोठ्या लॉन्च दरम्यान एका खास गोष्टीने लोकांचे लक्ष वेधून घेतले आणि तो आहे गॅलेक्सी नोट 9 सोबत मिळणारा ‘एस पेन’.

एस पेन चे महत्व यावरुन समजते कि कंपनी गॅलेक्सी नोट 9 सोबत बॉक्स वर ‘एस पेन’ चा फोटो लाऊन बाजारात घेऊन येत आहे. एस पेन ला खुप एडवांस करत सॅमसंग ने हा ब्लूटूथ सपोर्ट सह सादर केला आहे. ब्लूटूथ कनेक्टिविटी एस पेन ला अल्टीमेट रिमोट कंट्रोल बनवते ज्यामुळे हा गॅलेक्सी नोट 9 सोबत कनेक्ट करून फोन चा हॅण्डस फ्री यूज केला जाऊ शकतो. आम्ही एस पेन चे 5  शानदार फीचर्स सांगितले आहेत, जे वाचून तुम्ही हैराण व्हाल.

1. एस पेन घेईल सेल्फी
हे फीचर मजेदार असेल असे वाटते आहे की एस पेन ने सेल्फी घेता येईल. आधी सांगितल्याप्रमाणे यावेळी कंपनी ने एस पेन मध्ये ब्लूटूथ कनेक्टिविटी दिली आहे. या कनेक्टिविटी मुळे तुम्ही फोन च्या कॅमेरा वर क्लिक बटन दाबण्याची गरज नाही, फक्त एस पेन वरील बटन प्रेस करताच फोटो क्लिक होईल. म्हणजे तुम्ही फोन लांब ठेऊन त्याला हात न लावता फोटो क्लिक करू शकाल. आता ग्रुप सेल्फी मध्ये फोन लांब ठेऊन, कोणत्याही मित्राला फ्रेम बाहेर न ठेवता शानदार सेल्फी घेता येईल. एस पेन फोन ने 30 फुटांवरून पण फोटो क्लिक करता येईल.

2. यूट्यूब वापरणे झाले सोप्पे
घरात पार्टी चालू असेल किंवा तुम्ही स्पीकर सोबत फोन कनेक्ट करून गाणी ऐकत असाल. ही गाणी तुम्ही यूट्यूब वरून ऐकत असाल आणि जर लागलेले गाणे तुमच्या आवडीचे नसेल तर तुम्हाला तुमच्या जागेवरून उठून फोन पर्यंत जावे लागत होते. पण एस पेन तुमचा हा त्रास वाचवेल. आता तुम्ही दुरूनच एस पेन च्या क्लिक ने यूट्यूब वर चालू असलेली गाणी प्ले व पॉज करू शकता आणि नेक्टस गाण्यावर पण जाऊ शकता. म्हणजे पार्टी यूं ही चालेगी..

3. चुटकीसरशी बनेल स्लाइड प्रेजेंटेशन
आॅफिसचे काम असो वा मुलांच्या शाळेचे प्रेजेंटेशन, एस पेन च्या मदतीने गॅलेक्सी नोट 9 मध्ये हे काम एका झटक्यात. गॅलेक्सी नोट 9 मध्ये फक्त तुम्हाला सब्जेक्ट अनुरूप प्रेजेंटेशन बनवता येत नाही, तर एस पेन मुळे प्रेजेंटेशन व स्लाइड वापरता पण येतील. गॅलेक्सी नोट 9 मोठया स्क्रीन किंवा प्रोजेक्टरशी कनेक्ट करून एस पेन च्या या फीचर लाभ घेता येईल. फक्त छोटासा हा एस पेन हातात घेऊन संपूर्ण स्लाइड प्रेजेंटेशन करता येईल.

4. ड्राइंग व स्मार्ट सिलेक्शन
प्रेजेंटेशन सोबतच एस पेन ने गॅलेक्सी नोट 9 मध्ये तुम्ही कोणतेही स्केच काढू शकता. एस पेन पेंटिंग ब्रश प्रमाणे वापरता येईल आणि विना दिक्कत एस पेन फक्त गॅलेक्सी नोट 9 च्या डिस्प्ले वर वापरून चित्र काढता येईल. गॅलेक्सी नोट 9 ची मोठी स्क्रीन हे काम अजून मजेदार बनवते. तसेच एस पेन मध्ये फोन मधील कोणतेही कटेंट कॉपी व पेस्ट करण्यासाठी स्मार्ट सलेक्शन ची सुविधा पण देण्यात आली आहे.

5. फोन बंद झाल्यावर पण वापरता येईल
एस पेन ने फक्त फोन मध्ये अॅप ओपन असल्यावर ते एक्सेस करता येतील असे नाही तर फोन स्लीप मोड मध्ये असतानाही एस पेन ने फोन मधील अॅप्सना कमांड देता येईल. जसे की एस पेन बटन लॉन्ग प्रेस केल्यास फोन मध्ये आपोआप कॅमेरा ओपन होईल. तसेच डबल क्लिक केल्यास सेल्फी कॅमेरा पण ओपन होईल. तसेच फोन गॅलेरी मधील सेव फोटोज पण एस पेन ने एक्सेस करता येतील. एस पेन वर क्लिक करताच गॅलेरी मधील फोटो मागे पुढे करता येतील.

एस पेन ब्लूटूथ लो एनर्जी कनेक्टिविटी टेक्नोलॉजी वर बनवलेला आहे. सॅमसंग ने सांगितले आहे की ‘एस पेन’ एका चार्ज वर जवळपास 200 वेळा क्लिक करू शकतो. विशेष म्हणजे बॅटरी डिस्चार्ज होताच हा गॅलेक्सी नोट 9 मध्ये टाकताच हा फक्त 1 मिनिटात चार्ज होतो आणि पुन्हा 200 क्लिक पर्यंत चालतो. तसेच बॅटरी नसतानाही एस पेन स्टाइलस प्रमाणे वापरता येईल.

फोटो सौजन्य : engadget.com

The post ‘एस पेन’ ने घेता येतील फोटो ​आणि हात न लावता चालेल गॅलेक्सी नोट 9, जाणून घ्या या छोट्या डिवाईस चे 5 मोठे फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/5-amazing-feature-of-samsung-galaxy-note-9-s-pen-with-bluetooth-in-marathi/feed/ 0