Samsung Blast - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 30 Apr 2019 15:19:31 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung Galaxy S10 5G model मध्ये लागली ​आग, यूजरचे झाले मोठे नुकसान https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s10-5g-model-burn-blast-flames-accident/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s10-5g-model-burn-blast-flames-accident/#respond Tue, 30 Apr 2019 15:19:31 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4185 सॅमसंग ने Galaxy S10 5G model पूर्णपणे यूजर्स साठी सुरक्षित असल्याचे सांगितले आहे.

The post Samsung Galaxy S10 5G model मध्ये लागली ​आग, यूजरचे झाले मोठे नुकसान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोन्स मध्ये आग लागणे व ब्लास्ट होण्याच्या घटना अधून मधून समोर येत असतात. या घटनांमधून अनके यूजर सुरक्षित वाचतात तर काही घटना मोठी नुकसान करतात. स्मार्टफोन मध्ये आग लागणे व ब्लास्ट होण्याची गोष्ट जेव्हा समोर येते तेव्हा सॅमसंगचे नाव सर्वात वर येते. तीन वर्षांपूर्वी सॅमसंग ने Galaxy Note 7 बाजरात आणला होता. या डिवाईस मध्ये बॅटरी ब्लास्टचे इतक्या जास्त घटना झाल्या कि सॅमसंगला Galaxy Note 7 मार्केट मधून काढून घ्यावा लागला. या डिवाईसमुळे सॅमसंगला पैशांचे भारी नुकसान झाले होते सोबत कंपनीच्या नावाला पण बट्टा लागला होता. आता पुन्हा एकदा सॅमसंग आरोपीच्या पिंजऱ्यात आली आहे. Samsung Galaxy S10 5G model मध्ये ब्लास्ट झाल्याची बातमी समोर आली आहे ज्यामुळे संपूर्ण टेक विश्वाला धक्का बसला आहे.

सॅमसंग संबंधित हि धक्कादायक बातमी साउथ कोरिया मधून आली आहे. यात सांगण्यात आले आहे कि सॅमसंगचा लेटेस्ट फ्लॅगशिप डिवाईस Galaxy S10 5G दुर्घटनाग्रस्त झाला आहे आणि फोन मध्ये ब्लास्ट झाला आहे. Samsung Galaxy S10 5G model वापरणाऱ्या यूजरने इंटरनेट वर फोन मध्ये झालेल्या ब्लास्टची माहिती दिली आहे. या घटनेची बातमी देण्यासोबत यूजरने आपल्या फोनचे फोटोज पण शेयर केले आहेत ज्यात फोन जळालेला दिसत आहे.

Samsung Galaxy S10 5G model यूजर ली ने ​दक्षिण कोरियातील मीडियाला सांगितले आहे कि त्याने काही दिवसांपूर्वी सॅमसंगचा हा महाग स्मार्टफोन विकत घेतला होता. एके दिवशी तो आपल्या घरी बसला होता आणि त्याचा हा फोन टेबल वर होता. ली ला जळाल्याचा वास येऊ लागला. फोन कडे पाहिल्यानंतर त्याला Samsung Galaxy S10 5G model मधून धूर येत असल्याचे दिसले. घाबरून त्याने फोन टेबलवरून खाली टाकला. ली म्हणतो कि जेव्हा त्याने फोन टेबल वरून टाकला तेव्हा फोन खूप जास्त गरम होता.

ली ने Samsung Galaxy S10 5G मध्ये आग लागण्याच्या घटनेविषयी म्हटले कि त्याने फोन सोबत कोणतीही अशी छेडछाड केली नाही ज्यामुळे त्यात आग लागेल किंवा ब्लास्ट होईल. तर दुसरीकडे या घटनेविषयी बोलताना सॅमसंग ने दावा केला आहे कि त्यांच्या नवीन स्मार्टफोन मध्ये असा कोणताही दोष नाही ज्यामुळे त्यात आग लागेल किंवा ब्लास्ट होईल. सॅमसंग ने Galaxy S10 5G model पूर्णपणे यूजर्स साठी सुरक्षित असल्याचे सांगितले आहे.

सॅमसंग ने Galaxy S10 5G model मध्ये झालेल्या या दुर्घटनेवर स्पष्टीकरण दिले आहे कि त्यांच्या फोन मध्ये कोणत्याही इंटरनल दोषामुळे ब्लास्ट होऊ शकत नाही. ली च्या स्मार्टफोन मध्ये लागलेली आग एखाद्या बाह्य कारणामुळे लागल्याचे सॅमसंग ने सांगितले आहे आणि म्हटले आहे कि Samsung Galaxy S10 5G model सोबत छेडछाड करण्यात आली आहे​ ज्यामुळे कंपनीच्या फोन मध्ये अशी दुर्घटना झाली आहे.

कंपनी वरील आरोप खोटे ठरवत सॅमसंग ने ली ला 1,200 यूएस डॉलरची रक्कम देण्यास नकार दिला आहे. विशेष म्हणजे हि किंमत भारतीय करंसीनुसार 83,500 रुपयांच्या आसपास आहे. या घटनेचे पुढे काय होईल सांगता येत नाही. पण याबाबतीती सॅमसंगची चूक असो वा यूजरची, पण टेक बाजार दिग्गज कंपनीला Samsung संशयाच्या नजरेने बघत आहे. सोबत लोकांमध्ये भीती आहे कि Galaxy S10 5G सोबत Galaxy Note 7 सारख्याच दुर्घटना होतील.

The post Samsung Galaxy S10 5G model मध्ये लागली ​आग, यूजरचे झाले मोठे नुकसान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s10-5g-model-burn-blast-flames-accident/feed/ 0
सॅमसंग नोट मध्ये झाला ब्लास्ट, मुंबईच्या रेस्टोरेंट मध्ये उडाला गोंधळ https://www.91mobiles.com/marathi/samsung-note-2-explodes-in-man-pocket-in-mumbai-watch-cctv-video-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-note-2-explodes-in-man-pocket-in-mumbai-watch-cctv-video-in-marathi/#respond Thu, 07 Jun 2018 10:17:16 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=813 सॅमसंग कडून अजूनपर्यंत आगीचे कारण सांगण्यात आले नाही तसेच या घटनेचा तपास चालू आहे.

The post सॅमसंग नोट मध्ये झाला ब्लास्ट, मुंबईच्या रेस्टोरेंट मध्ये उडाला गोंधळ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ती वेळ टेक जग आणि स्मार्टफोन यूजर्स विसरले नसतील जेव्हा सॅमसंग च्या गॅलेक्सी नोट 7 मधील बॅटरीतील दोषामुळे स्मार्टफोंस मध्ये ब्लास्ट होत होते. स्मार्टफोन ब्लास्ट मुळे फक्त सॅमसंग वर डाग लागला नाही तर स्मार्टफोन यूजर्सना पण भीती वाटत होती. सॅमसंग नंतर अनेक ब्रांड्स च्या स्मार्टफोंस मध्ये आग लागण्याच्या आणि बॅटरी ब्लास्ट होण्याच्या घटना समोर आल्या आहेत आणि या घटनांमध्ये अजून एका घटनेचा समावेश झाला आहे. ही घटना मुंबईतली आहे जिथे रेस्टोरेंट जेवण जेवत असलेल्या व्यक्ति च्या पॉकेट मध्ये ठेवलेला फोन ब्लास्ट झाला.

ताजी घटना मुंबईतील आहे. मागच्या सोमवारी 4 जूनला मुंबईतील एका रेस्टोरेंट मध्ये सुनिल कांते नावाचा एक व्यक्ति आपल्या मित्र सोबत जेवत होता कि अचानक त्याच्या शर्ट च्या खिश्यात ठेवलेल्या फोन मध्ये आग लागली. आग लगल्यावर सुनिल यांनी लगेच फोन पॉकेट मधून काढला आणि रेस्टोरेंट च्या बाहेर पळाले. काही क्षणात फोन मधील आग मुळे रेस्टोरेंट मध्ये धूर झाला आणि अचानक झालेल्या या घटनेमुळे तिथे जेवत असलेल्या लोकांमध्ये गोंधळ निर्माण झाला.

न्यूज एजेंसी एएनआई ने या घटनेची सीसीटीवी फुटेज शेयर केली आहे ज्यात फोन मध्ये आग लागल्यापासून रेस्टोरेंट मधील गोंधळ स्पष्ट दिसत आहे. फाइनेंशल एक्सप्रेस च्या रिपोर्ट नुसार सुनिल च्या खिशात जो फोन फुटला तो सॅमसंग चा नोट 2 डिवाईस होता. दुर्घटनेमुळे सुनिल च्या हात, छाती आणि पाया मध्ये जखम झाली आहे. रिपोर्ट नुसार या घटनेमुळे सुनिल इतके घाबरले की त्यांनी आपल्या फोन ची बॅटरी पुन्हा ब्लास्ट होईल म्हणुन तिथेच टाकली.

तर दुसरीकडे या घटनेचे माहिती मिळताच सॅमसंग ने विधान केले आहे की कंपनी ने या घटनेचा तपास केला आहे आणि त्यातून समोर आले आहे की सुनिल फोन सोबत कंपनी च्या आॅरिजनल एक्सेसरीज वापरता नव्हते. सॅमसंग कडून अजूनपर्यंत आगीचे कारण सांगण्यात आले नाही तसेच या घटनेचा तपास चालू आहे.

The post सॅमसंग नोट मध्ये झाला ब्लास्ट, मुंबईच्या रेस्टोरेंट मध्ये उडाला गोंधळ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-note-2-explodes-in-man-pocket-in-mumbai-watch-cctv-video-in-marathi/feed/ 0