Samsung Flip Phone - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 02 Nov 2018 12:28:00 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 1,82,000 रुपयांचा सॅमसंग फ्लिप फोन, 9 नोव्हेंबरला होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-flip-phone-w2019-to-launch-on-9-november-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-flip-phone-w2019-to-launch-on-9-november-specifications-price-in-marathi/#respond Fri, 02 Nov 2018 12:28:00 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2776 सॅमसंग ने आॅफिशयली अनाउंस केले आहे कि कपंनी येत्या 9 नोव्हेंबरला नवीन फ्लिप एंडरॉयड फोन लॉन्च करणार आहे. सॅमसंगचा हा फ्लिप फोन W2019 (डब्ल्यू2019) नावाने लॉन्च केला जाईल.

The post 1,82,000 रुपयांचा सॅमसंग फ्लिप फोन, 9 नोव्हेंबरला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग ने गेल्या वर्षी एंडरॉयड स्मार्टफोन्सना नवीन लुक देत खूप शानदार फ्लिप फोन डब्ल्यू2018 लॉन्च केला होता. चांगली डिजाईन आणि स्पेसिफिकेशन्स असलेला हा फोन अनेकांना आवडला होता. आता सॅमसंग पुन्हा तेच यश मिळवू पाहत आहे. सॅमसंग ने आॅफिशयली अनाउंस केले आहे कि कपंनी येत्या 9 नोव्हेंबरला नवीन फ्लिप एंडरॉयड फोन लॉन्च करणार आहे. सॅमसंगचा हा फ्लिप फोन W2019 (डब्ल्यू2019) नावाने लॉन्च केला जाईल.

सॅमसंग ने डब्ल्यू2019 च्या लॉन्चचे मीडिया इन्वाईट पाठवणे सुरु केले आहेत. सॅमसंग 9 नोव्हेंबरला चीन मधील शंघाई मध्ये एका ईंवेंटचे आयोजन करणार आहे आणि या ईंवेंटच्या मंचावरून डब्ल्यू2019 टेक विश्वात येईल. आपल्या जुन्या वर्जन प्रमाणे सॅमसंगचा नवीन फ्लिप फोन पण फ्लॅगशिप कॅटेगरी मध्ये लॉन्च होईल. मीडिया रिपोर्ट्स वरून समजले आहे कि चीन मध्ये हा फोन लक्जरी प्रोडक्ट कॅटेगरी मध्ये लॉन्च केला जाईल.

सॅमसंग डब्ल्यू2019 चे स्पेसिफिकेशन्स पाहता चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेना नुसार या फोन मध्ये 4.2-इंचाचा एमोलेड डिस्प्ले देण्यात येईल. ​फोनच्या दोन्ही पॅनल वर समान साईजची स्क्रीन असेल. टेना नुसार सॅमसंगचा हा आगामी फोन क्वालकॉम च्या सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगन 845 वर चालेल. फोन मध्ये पावर बॅकअप साठी 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

​सॅमसंगच्या या फ्लिप फोन मध्ये ​डेडिकेटेड ’बिस्सबे’ बटन देण्यात येईल. सॅमसंग डब्ल्यू2019 रोज गोल्ड कलर मध्ये लॉन्च केला जाईल तसेच अशा आहे कि हा फोन रेड आणि ब्लू कलर वेरिएंट मध्ये पण कंपनी लॉन्च करेल. किंमत पाहता हा फोन सॅमसंग हा फोन जवळपास एक लाख ब्यांशी हजार (1,82,000) रुपयांमध्ये लॉन्च करू शकते. पण फोनची ठोस किंमत आणि स्पेसिफिकेशन्ससाठी 9 नोव्हेंबरची वाट बघावी लागेल.

The post 1,82,000 रुपयांचा सॅमसंग फ्लिप फोन, 9 नोव्हेंबरला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-flip-phone-w2019-to-launch-on-9-november-specifications-price-in-marathi/feed/ 0