Samsung Galaxy A22 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 13 May 2021 13:27:25 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung चा स्वस्त 5G फोन Galaxy A22s गुगलवर झाला लिस्ट, यात मिळेल Dimensity 700 SoC https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a22s-5g-google-play-console-launch-soon-with-4gb-ram-dimensity-700-soc/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a22s-5g-google-play-console-launch-soon-with-4gb-ram-dimensity-700-soc/#respond Thu, 13 May 2021 13:27:25 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10919 Samsung वेगाने टेक मार्केटमध्ये आपल्या स्मार्टफोन लाइनअपचा विस्तार करत आहे. अलीकडेच एक रिपोर्ट समोर आला होता, ज्यात दावा केला गेला होता कि कंपनी आपले 6 नवीन फोन्स (4G आणि 5G) भारतात सादर करणार आहे. आता बातमी समोर आली आहे कि कंपनी गॅलेक्सी ए-सीरीजमध्ये एक नवीन आणि अफोर्डेबल 5G स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. सॅमसंगचा एकदम नवीन […]

The post Samsung चा स्वस्त 5G फोन Galaxy A22s गुगलवर झाला लिस्ट, यात मिळेल Dimensity 700 SoC first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung वेगाने टेक मार्केटमध्ये आपल्या स्मार्टफोन लाइनअपचा विस्तार करत आहे. अलीकडेच एक रिपोर्ट समोर आला होता, ज्यात दावा केला गेला होता कि कंपनी आपले 6 नवीन फोन्स (4G आणि 5G) भारतात सादर करणार आहे. आता बातमी समोर आली आहे कि कंपनी गॅलेक्सी ए-सीरीजमध्ये एक नवीन आणि अफोर्डेबल 5G स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. सॅमसंगचा एकदम नवीन 5G फोन गुगल प्ले कंसोल लिस्टिंगवर दिसला आहे. या लिस्टिंगमध्ये फोनचा मॉडेल नंबर SM-A226B दाखवण्यात आला आहे. हा मॉडेल नंबर Galaxy A22 5G चा आहे त्यामुळे बोलले जात आहे कंपनी काही भागांमध्ये हा डिवाइस गॅलेक्सी A22s नावाने सादर करू शकते. चला जाणून घेऊया या लिस्टिंगमध्ये कोणती माहिती समोर आली आहे. (Samsung Galaxy A22s 5g Google Play console launch soon with 4GB RAM Dimensity 700 soc)

Samsung Galaxy A22s चे स्पेसिफिकेशन्स

Google Play Console लिस्टिंगमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार सॅमसंगच्या अपकमिंग फोनमध्ये MediaTek MT633 SoC असेल जे Dimensity 700 SoC चे कोडनेम आहे. फोनमध्ये 4GB की रॅम दिली जाईल. सोबत डिवाइस अँड्रॉइड 11 वर चालेल. आशा आहे कि Android वर OneUI 3.0 ची एक स्किन असेल.

हे देखील वाचा : Infinix Note 10 आणि Infinix Note 10 Pro लॉन्च, हे फोन देतील Xiaomi आणि Realme ला थेट टक्कर

Samsung Galaxy A22s ची डिजाइन

लिस्टिंगमध्ये समोर आलेल्या एका फोटोवरून समजले आहे कि डिवाइसमध्ये एक वाटरड्रॉप डिस्प्ले असेल. डिस्प्लेच्या आसपास बेजल्स पातळ असतील. तसेच यात 1080 x 2009 पिक्सलचा फुल एचडी + रिजॉल्यूशन असेल.

हे देखील वाचा : Xiaomi Redmi Note 10S भारतात लॉन्च, 6GB RAM आणि 64MP कॅमेऱ्यासह आहे 33W 5,000mAh बॅटरी

Galaxy A22 5G

जर डिवाइस खरंच A22 5G चा रीब्रँडेड वर्जन असला तर, फोन 6.5 इंचाच्या डिस्प्लेला सपोर्ट करेल. फोनच्या मागे ट्रिपल-कॅमेरा सेटअप असेल. अफवा पाहता फोनमध्ये 48MP चा प्राइमरी कॅमेरा दिला जाईल. तसेच डिवाइस KRW 200,000 (13,425 रुपये) मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.

भारतात लॉन्च होणारे सॅमसंग फोन

अलीकडेच टिप्सटर Gadgetsdata (Debayan Roy) ने याबाबत खुलासा केला होता कि भारतात लवकरच 6 फोन्स सादर केले जाणार आहेत. टिप्सटरचा दावा होता कि भारतात Samsung Galaxy M62, Galaxy M32, Galaxy A52 5G, Galaxy F22, Galaxy F52 आणि Galaxy A22 लॉन्च केला जाईल. परंतु, कंपनीने अजूनही अधिकृतपणे कोणतीही माहिती दिली नाही.

The post Samsung चा स्वस्त 5G फोन Galaxy A22s गुगलवर झाला लिस्ट, यात मिळेल Dimensity 700 SoC first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a22s-5g-google-play-console-launch-soon-with-4gb-ram-dimensity-700-soc/feed/ 0