Samsung Galaxy A6s - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 25 Oct 2018 12:55:41 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 शाओमीच्या मॅनुफॅक्चररने बनवला सॅमसंग साठी फोन, 6जीबी रॅम असलेला सॅमसंग गॅलेक्सी ए6एस लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a6s-galaxy-a9s-launched-feature-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a6s-galaxy-a9s-launched-feature-specifications-price-in-marathi/#respond Thu, 25 Oct 2018 12:55:41 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2645 सॅमसंगचा गॅलेक्सी ए9एस चीन मध्ये 3499 युआन म्हणजे जवळपास 37,000 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

The post शाओमीच्या मॅनुफॅक्चररने बनवला सॅमसंग साठी फोन, 6जीबी रॅम असलेला सॅमसंग गॅलेक्सी ए6एस लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंगला भारतात शाओमी कडून चांगलीच टक्कर मिळत आहे. शाओमीला त्यांच्याच घरात मात देत सॅमसंगने आज चीन मध्ये दोन नवीन फोन गॅलेक्सी ए6एस आणि गॅलेक्सी ए9एस लॉन्च केले आहेत. सॅमसंग गॅलेक्सी ए9एस कंपनीने इंटरनेशनल मार्केट मध्ये लॉन्च केलेल्या गॅलेक्सी ए9 चे बदललेले नाव आहे तर गॅलेक्सी ए6एस च्या माध्यमातून सॅमसंगने चीन मध्ये नवींन चाल खेळली आहे. गॅलेक्सी ए9एस सॅमसंगचा महत्वाचा डिवाईस आहे कारण या स्मार्टफोनची निर्मिती सॅमसंगने केली नसून त्या मॅनुफॅक्चरिंग कंपनीने केली आहे जी शाओमीचे स्मार्टफोन बनवते.

सॅमसंग गॅलेक्सी ए6एस चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 18.5:9 आस्पेक्ट रेशियो सह 6-इंचाच्या फुल एचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड ओरियो वर सादर करण्यात आला आहे जो आॅक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो. चांगला अनुभव देता यावा यासाठी कंपनी ने फोन मध्ये एक्सपीरियंस यूआई पण दिला आहे.

गॅलेक्सी ए6एस सॅमसंग ने 6जीबी रॅम सह सादर केला आहे. चीन मध्ये हा फोन दोन स्टोरेज वेरिएंट मध्ये सेल साठी उपलब्ध होईल. यात 64जीबी मेमरी आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता सॅमसंग गॅलेक्सी ए6एस डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर डुअल एलईडी फ्लॅश सोबत एफ/1.8 अपर्चर असलेले 12-मेगापिक्सलचे दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. तसेच सेल्फी साठी हा फोन 24-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

सॅमसंग गॅलेक्सी ए6एस डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटी साठी रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये फेस अनलॉक टेक्नॉलॉजी पण आहे. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,300एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. गॅलेक्सी ए6एस ब्लॅक, ब्लू आणि पर्पल कलर वेरिएंट मध्ये बाजारात आला आहे.

किंमत पाहता गॅलेक्सी ए6एस चा 64जीबी मेमरी वेरिएंट 1799 युआन तसेच 128जीबी स्टोरेज वेरिएंट 2199 युआन मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. या किंमती भारतीय करंसी अनुसार जवळपास 18,990 रुपये आणि 23,200 रुपये आहे. तसेच सॅमसंगचा गॅलेक्सी ए9एस चीन मध्ये 3499 युआन म्हणजे जवळपास 37,000 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए9एस चे स्पेसिफिकेशन्स व फीचर्स जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

The post शाओमीच्या मॅनुफॅक्चररने बनवला सॅमसंग साठी फोन, 6जीबी रॅम असलेला सॅमसंग गॅलेक्सी ए6एस लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a6s-galaxy-a9s-launched-feature-specifications-price-in-marathi/feed/ 0