Samsung Galaxy A82 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 04 Mar 2021 14:01:23 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 स्टाईलची लढाई पुन्हा जिंकेल Samsung, घेऊन येत आहे अनोखी डिजाईन असलेला Galaxy A82 5G फोन https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a82-5g-phone-specs-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a82-5g-phone-specs-leaked/#respond Thu, 04 Mar 2021 14:01:23 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10277 मीडिया रिपोर्टनुसार कथित Samsung Galaxy A82 स्मार्टफोन 2.96गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरवर चालेल तसेच फोन मध्ये ग्राफिक्ससाठी एड्रेनो 640 जीपीयू दिला जाईल.

The post स्टाईलची लढाई पुन्हा जिंकेल Samsung, घेऊन येत आहे अनोखी डिजाईन असलेला Galaxy A82 5G फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने जवळपास दोन वर्षांपूर्वी आपल्या टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करत Samsung Galaxy A80 स्मार्टफोन लॉन्च केला होता. हा मोबाईल रोटेटिंग स्लाईडर पॅनलवर बनला होता ज्यामुळे फोनचा रियर कॅमेरा आणि सेल्फी कॅमेरा एकच होता. बॅक पॅनलवरील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सेल्फीची कमांड देताच वर येईल फ्लिप होत असे. सर्व कॅमेरा सेंसर तसेच फ्लॅश लाईट पुढल्या बाजूस येत होती आणि अश्याप्रकारे फोनचा रियर कॅमेरा सेल्फी कॅमेरा बनत होता. सॅमसंग गॅलेक्सी ए80 च्या यशानंतर आता कंपनी याचा अपग्रेडेड वर्जन Samsung Galaxy A82 घेऊन येत आहे. (Samsung Galaxy A82 5G phone specs leaked)

सॅमसंग गॅलेक्सी ए82 ची माहिती बेंचमार्किंग साइट गीकबेंचच्या माध्यमातून समोर आली आहे जिथे फोन SM-A826S मॉडेल नंबरसह लिस्ट केला गेला आहे. हि लिस्टिंग काल म्हणजे 3 मार्चची आहे ज्यात फोनच्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे. मॉडेल नंबरवरून बोलले जात आहे कि हा फोन गॅलेक्सी ए80 चा नेक्स्ट जेनरेशन डिवायस असेल जो सॅमसंग गॅलेक्सी ए82 नावाने टेक मार्केट मध्ये येईल. विशेष म्हणजे फोनला सिंगल-कोर मध्ये 755 आणि मल्टी-कोर मध्ये 2630 बेंचमार्क स्कोर मिळाला आहे.

Samsung Galaxy A82 5G

फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता गीकबेंचवर हा फोन अँड्रॉइडच्या लेटेस्ट ओएस अँड्रॉइड 11 सह लिस्ट झाला आहे. हा फोन 6 जीबी रॅम सह दाखवण्यात आला आहे तसेच क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हा चिपसेट 5Gला सपोर्ट करतो. मीडिया रिपोर्टनुसार कथित Samsung Galaxy A82 स्मार्टफोन 2.96गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरवर चालेल तसेच फोन मध्ये ग्राफिक्ससाठी एड्रेनो 640 जीपीयू दिला जाईल.

Samsung Galaxy A80

सॅमसंगने Galaxy A80 1080 X 2400 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.7-इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले वर सादर केला आहे. कंपनीने हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरने सुसज्ज केला आहे जो स्क्रीनच्या खाली आहे. सॅमसंग गॅलक्सी ए80 एंडरॉयडच्या सर्वात लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे जो आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट वर चालतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता, या फोनचा रियर कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा एकच आहे. फोनच्या रोटेटिंग स्लाईडर पॅनल वर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये फ्लॅश लाईट सह एफ/2.0 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सोबत फोन मध्ये 8-मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड एंगल लेंस आहे. Galaxy A80 चा तिसरा कॅमेरा सेंसर 3डी डेफ्थ सेंसिंग टेक्नॉलॉजी सह येतो जो एफ/2.2 अपर्चर सह 8-मेगापिक्सलच्या पावरला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : जगातील पहिला MediaTek Dimensity 1100 SoC असलेला आणि सर्वात बारीक 5G फोन Vivo S9 झाला लॉन्च, सोबत वीवो S9e ची झाली एंट्री

सॅमसंग Galaxy A80 एक 4जी फोन आहे जो बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह येतो. सिक्योरिटी साठी या फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी हा फोन सुपर फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी वाल्या 3,700एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. सॅमसंगने Galaxy A80 घोस्ट वाईट, ऐंजल गोल्ड आणि फँटम ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये टेक मंचा वर सादर केला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए80 व्हिडीओ

The post स्टाईलची लढाई पुन्हा जिंकेल Samsung, घेऊन येत आहे अनोखी डिजाईन असलेला Galaxy A82 5G फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a82-5g-phone-specs-leaked/feed/ 0