Samsung Galaxy A9 Pro 2018 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 17 Sep 2018 11:41:00 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 11 ऑक्टोबरला लॉन्च होईल सॅमसंग गॅलेक्सी ए9 प्रो (2018), चालेल स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट वर https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a9-pro-2018-snapdragon-710-to-launch-on-11-october-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a9-pro-2018-snapdragon-710-to-launch-on-11-october-in-marathi/#respond Mon, 17 Sep 2018 11:41:00 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2148 आता सॅमसंग ने एका ट्वीट मध्ये यूजरला रिप्लाई करत फोनच्या प्रोसेसर माहिती पण दिली आहे.

The post 11 ऑक्टोबरला लॉन्च होईल सॅमसंग गॅलेक्सी ए9 प्रो (2018), चालेल स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट वर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
11 ऑक्टोबरला लॉन्च होईल सॅमसंग गॅलेक्सी ए9 प्रो (2018), स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट असेल यात. गेल्या आठवड्यात सॅमसंग ने एक ट्वीट करून सर्वांनाच धक्का दिला होता. सॅमसंग ने आपल्या ट्वीट मध्ये ‘4एक्स’ चा उल्लेख केला होता, त्यामुळे टेक विश्वात चर्चा सुरू झाली की ही कोरियन कंपनी आता 4 कॅमेरा सेंसर वाला स्मार्टफोन घेऊन येणार आहे. सॅमसंग ने ट्वीट सोबतच आॅफिशियल केले होते की हा फोन गॅलेक्सी ए सीरीज मधील असेल आणि येत्या 11 ऑक्टोबरला जगासमोर येईल. ताज्या लीक मध्ये सॅमसंगचा हा आगामी फोन गॅलेक्सी ए9 प्रो नावाने समोर आला आहे आणि त्याचबरोबर याच्या स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे.

सॅमसंग ने हे आधीच सांगितले होते की कपंनी येत्या 11 ऑक्टोबरला एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. बातमी अशी आहे की हा फोन गॅलेक्सी ए9 प्रो (2018) नावाने बाजारात येईल. तसेच आता सॅमसंग ने एका ट्वीट मध्ये यूजरला रिप्लाई करत फोनच्या प्रोसेसर माहिती पण दिली आहे. ट्वीटर वर एका यूजर ने प्रश्न विचारला होता की गॅलेक्सी ए सीरीजच्या या नवीन फोन मध्ये स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट असेल का. या ट्वीटला रिप्लाई देत सॅमसंग ने लिहिले की फोन मध्ये स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट असेल.

सॅमसंगच्या या उत्तराने स्पष्ट झाले की गॅलेक्सी ए9 प्रो (2018) क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट सह येईल. विशेष म्हणजे क्वालकॉमचा हा चिपसेट हाईएंड फ्लॅगशिप स्मार्टफोन आणि मीडरेंज स्मार्टफोन च्या मधील आहे. म्हणजे कमी किंमतीत हा चिपसेट मर्यादित स्पेसिफिकेशन्स मध्ये फास्ट व लॅगफ्री प्रोसेसिंग करतो.

लीक्स नुसार सॅमसंग गॅलेक्सी ए9 प्रो (2018) मध्ये ​इनफिनिटी डिस्प्ले देण्यात येईल जो 18.5:9 आस्पेक्ट रेशियोला सपोर्ट करेल. तसेच फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सोबत डुअल रियर कॅमेरा सह फिंगरप्रिंट सेंसर मिळेल. पण जोपर्यंत सॅमसंग कडून इतर माहिती देण्यात येत नाही तोपर्यंत या आगामी फोनच्या स्पेसिफिकेशन्स बद्दल काहीच बोलता येणार नाही त्यामुळे 11 ऑक्टोबरची वाट बघावी लागेल.

The post 11 ऑक्टोबरला लॉन्च होईल सॅमसंग गॅलेक्सी ए9 प्रो (2018), चालेल स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट वर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a9-pro-2018-snapdragon-710-to-launch-on-11-october-in-marathi/feed/ 0