Samsung Galaxy F - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 22 Jan 2019 14:11:48 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 सॅमसंगच्या फोल्डेबल फोन आणि गॅलेक्सी एस10 च्या किंमतीचा झाला खुलासा, या दिवशी होतील लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s10-series-and-foldable-phones-price-and-release-details-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s10-series-and-foldable-phones-price-and-release-details-in-marathi/#respond Tue, 22 Jan 2019 14:11:48 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3433 सर्व फोन्स मध्ये गॅलेक्सी एस 10 लाइट सर्वात अफोर्डेबल मॉडेल असेल.

The post सॅमसंगच्या फोल्डेबल फोन आणि गॅलेक्सी एस10 च्या किंमतीचा झाला खुलासा, या दिवशी होतील लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी ने सॅमसंग ने काही दिवसांपूर्वी स्वतःच कन्फर्म केले आहे कि ते सॅन फ्रांसिस्को च्या बिल ग्राहम सिविक ऑडिटोरियम मध्ये 20 फेब्रुवारी 2019 ला एक लॉन्च इवेंटचे आयोजन करणार आहे. या इवेंट मध्ये कंपनी गॅलेक्सी एस10 सीरीजचे स्मार्टफोन लॉन्च करेल.

आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार सॅमसंग या लॉन्च इवेंट मध्ये चार नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी एस10, गॅलेक्सी एस10 लाइट, गॅलेक्सी एस10 प्लस आणि गॅलेक्सी एस10 5जी लॉन्च करू शकते. नावावरून वाटते कि सर्व फोन्स मध्ये गॅलेक्सी एस 10 लाइट सर्वात अफोर्डेबल मॉडेल असेल. तर गॅलेक्सी एस10 (5जी) सर्वात मोठा वेरिएंट असेल. आता इटालीयन साइट टुट्टो एंडरॉयड वर गॅलेक्सी एस10 सीरीजच्या स्मार्टफोन्सची माहिती समोर आली आहे, ज्यात उपलब्धतेची माहिती पण देण्यात आली आहे. याआधी पण या सीरीजच्या किंमतींबद्दल लीक आले आहेत.

रिपोर्टनुसार सॅमसंग गॅलेक्सी एस10 सीरीज मध्ये येणार एंट्री-लेवल गॅलेक्सी एस10 लाइटच्या 6जीबी +128जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत €779 (अंदाजे 63,000 रुपये) असेल. या डिवाइस मध्ये 5.8-इंचाचा इनफिनिटी ओ डिस्प्ले असू शकतो. तर गॅलेक्सी एस10 6जीबी +128जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत €929 (अंदाजे 75,000 रुपये) आणि 8जीबी + 512जीबी वेरिएंटची किंमत €1,179 (अंदाजे 95,000 रुपये) असेल. या डिवाइस मध्ये कर्व्ड 6.1-इंचाचा इनफिनिटी ओ डिस्प्ले असेल. गॅलेक्सी एस10+ मध्ये 6.4-इंचाचा डिस्प्ले असू शकतो.

तसेच याच्या 6जीबी + 128जीबी मॉडेलची किंमत €1,049 (अंदाजे 85,000 रुपये) आणि 8जीबी + 512जीबी मॉडेल ऑप्शनची किंमत €1,299 (अंदाजे 1,05,000 रुपये) असू शकते. त्याचबरोबर लीक मध्ये गॅलेक्सी एस10 5जी मॉडेलच्या किंमतीचा खुलासा झाला आहे. लीकनुसार हँडसेट €1,599 (अंदाजे 1,30,000 रुपये) मध्ये सादर केला जाऊ शकतो. रिपोर्ट मध्ये असे पण सांगण्यात आले आहे कि गॅलेक्सी एस10 मॉडेलची शिपिंग 8 मार्च पासून सुरु होईल.

किंमत आणि उपलब्धतेव्यतिरिक्त सॅमसंगच्या पहिल्या फोल्डेबल स्मार्टफोन बद्दल पण माहिती मिळाली आहे. अशा आहे कि गॅलेक्सी एस10 सीरीज सोबत गॅलेक्सी फोल्ड आणि गॅलेक्सी एफ सादर केले जातील. टुट्टो एंडरॉयड च्या दुसऱ्या रिपोर्ट मध्ये दावा केला गेला आहे कि या फोल्डेबल डिवाइसची किंमत €2,000 (अंदाजे 1,62,000 रुपये) असू शकते, ज्याची शिपिंग मार्चच्या सुरवातीला किंवा एप्रिलच्या शेवटी इटली मध्ये होईल.

The post सॅमसंगच्या फोल्डेबल फोन आणि गॅलेक्सी एस10 च्या किंमतीचा झाला खुलासा, या दिवशी होतील लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s10-series-and-foldable-phones-price-and-release-details-in-marathi/feed/ 0
सॅमसंग घेऊन येत आहे अगदी नवीन ‘गॅलेक्सी एफ’ सीरीज, डायरी प्रमाणे बंद होणार फोल्डेबल फोन या महिन्यात होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-foldable-phone-galaxy-f-series-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-foldable-phone-galaxy-f-series-in-marathi/#respond Fri, 02 Nov 2018 07:29:54 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2766 सॅमसंग फोल्डेबल फोन कसा दिसेल तसेच याचे नाव काय असेल हे अजून आॅफिशियल झाले नाही.

The post सॅमसंग घेऊन येत आहे अगदी नवीन ‘गॅलेक्सी एफ’ सीरीज, डायरी प्रमाणे बंद होणार फोल्डेबल फोन या महिन्यात होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग च्या फोल्डेबल फोनची अनेक वर्षांपासून चालू आहे. आधी लीक्स समोर येत होते ज्यात फोनच्या डिजाईन आणि लुक संबंधित माहिती दिली जात होती. पण गेल्या महिन्यात सॅमसंग फोल्डेबल फोन बद्दल कंपनीचे वरिष्ठ अधिकारी डी जे कोह यांनी विधान केल्यामुळे या फोनची चर्चा अजूनच वाढली आहे. सॅमसंग फोल्डेबल फोन कसा दिसेल तसेच याचे नाव काय असेल हे अजून आॅफिशियल झाले नाही. पण फोल्डेबल फोन संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे ज्यात सांगण्यात आले आहे कि सॅमसंग हा फोल्डेबल फोन ‘गॅलेक्सी एफ’ सीरीज मध्ये लॉन्च करेल.

सॅम मोबाईल ने सॅमसंग च्या फोल्डेबल फोन बद्दल एक्सक्लूसिव बातमी दिली आहे. या रिपोर्ट अनुसार सॅमसंग या फोल्डेबल फोन साठी एक नवीन स्मार्टफोन सीरीज घेऊन येणार आहे जिचे नाव गॅलेक्सी एफ सीरीज असेल आणि या सीरीज अंतर्गत कंपनीचा फोल्डेबल फोन लॉन्च होईल. रिपोर्ट अनुसार या महिन्यात आयोजित होणाऱ्या एसडीसी 2018 मध्ये सॅमसंग आपला हा फोन जागासमोर अनु शकते आणि हा टेक मंचावर सादर करू शकते.

सॅमसंग गॅलेक्सी एफ सीरीजच्या या फोल्डेबल फोनचा मॉडेल नंबर या रिपोर्ट मध्ये एसएम-एफ900यू सांगण्यात आला आहे. रिपोर्ट अनुसार सॅमसंग आपल्या फोल्डेबल फोन साठी एक वेगळा एंडरॉयड यूजर इंटरफेस बनवत आहे जो खूप यूनिक असेल. या एंडरॉयड यूआई साठी सॅमसंग कंपनी गूगल सोबत मिळून काम करत आहे. सॅमसंग फोल्डेबल फोन बद्दल बोलले जात आहे कि फोन मध्ये 512जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात येईल.

सॅमसंग चे वरिष्ठ अधिकारी डी जे कोह यांनी एका इंटरव्यू मध्ये सांगितले आहे कि कंपनीचा फोल्डेबल डिवाईस टॅबलेट आणि फोन दोन्हींचे काम करेल. हा डिवाईस टॅबलेटच्या आकाराचा असेल पण यूजर याला फोल्ड करून म्हणजेच घडी करून एखाद्या फोन प्रमाणे आपल्या खिशात ठेऊ शकतील. कोह यांच्या अनुसार सॅमसंगचा फोल्डेबल डिवाईस यूजर्सना मल्टीटास्क करण्यास खूप उपयोगी पडेल.

सॅमसंग चे म्हणणे आहे कि हा डिवाईस मल्टी टास्किंग सोबतच इजी पॉर्टबिलिटी वाला असेल. म्हणजे यूजर्स टॅबलेट म्हणून यावर त्यांची कामे करू शकतील आणि एखाद्या सामान्य फोन प्रमाणे हा खिशात ठेवता येईल. सॅमसंग काही दिवसांनी होणाऱ्या आपल्या वार्षिक कॉफ्रेंस मध्ये हा फोल्डेबल फोन शोकेस करेल जो पुढल्या वर्षी बाजारात लॉन्च होईल अशी अशा आहे.

The post सॅमसंग घेऊन येत आहे अगदी नवीन ‘गॅलेक्सी एफ’ सीरीज, डायरी प्रमाणे बंद होणार फोल्डेबल फोन या महिन्यात होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-foldable-phone-galaxy-f-series-in-marathi/feed/ 0